Header Ads Widget

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती | Chhatrapati Shivaji Maharaj History in Marathi

shivaji maharaj essay in marathi

                                         (Chhatrapati Shivaji Maharaj History in Marathi)
नमस्कार मित्रांनो, 

 आज सुद्धा आपल्याला दुरून कुठून तरी किंकाळी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज कि... तर कधी आपल्या तोंडून जय बाहेर पडतं हे आपलं आपल्याला देखील समजत नाही. महाराष्ट्रातल्या तथा हिंदुस्थानच्या या जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव नसून ते एक दैवत आहे. 

ज्यांचं नाव घ्यावं आणि छाती अभिमानाने फुलून यावी, असे हे थोर व्यक्तिमत्व!! 

त्यांचे धैर्य, शौर्य, साहस, धाडस, सास, अभिमान, स्वाभिमान, सगळं काही अद्वितीय. आज साडेतीनशे वर्षे उलटून गेली तरी सुद्धा आपण या राजाला विसरू शकत नाही. चला तर जाणून घेऊया आजच्या या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती. 

 चला तर जाणून घेऊ शिवाजी महाराज भाषण मराठी :- शिवाजी महाराज भाषण मराठी 2021 :- 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी च्या कुशीत एका असामान्य बालकाचा जन्म झाला, शिवाई देवी मुळे, मुलाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. 

आदिलशाहीचा सेवेत असणाऱ्या शहाजीराजांना कधी वाटलंही नसेल की हा मुलगा पुढे जाऊन सवाईच निपसणार आहे. शिवाजीराजांच्या आई मासाहेब जिजाऊंनी लहानपणापासूनच त्यांना रामायण-महाभारताच्या कथा ऐकवल्या. देश प्रेरणेने जागृत होऊन महाराज शास्त्राचे देखील शिक्षण घेऊ लागले.

 त्याचबरोबर शस्त्रांचे बाळकडू दादोजी कोंडदेव यांनी दिले. बघता बघता ना-ना कला ना ना विद्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तेज तर्रर्र-तरबेज झाले. घोडेस्वारी,भालाफेक, तलवारबाजी, इत्यादीमध्ये महाराज निपून झाले. अपनी धरती अपना राज, छत्रपती शिवाजी का एक ही सपना हिंदवी स्वराज !!! 

 Shivaji Maharaj Information in Marathi. 
shivaji maharaj information in marathi




 त्यावेळेस हिंदुस्तानच्या या धर्तीवर मुघलांचं काळं आभाळ पसरलं होतं. दक्षिणेत आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही तर समुद्रावर पोर्तुगीजांच राज्य होतं. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीत उच्च पदावर कार्यरत होते. बऱ्याच वेळा लढाईच्या दौऱ्यामुळे शहाजीराजे हे बाहेर असायचे, म्हणून लहानपणी शिवाजी राजांचा सांभाळ जिजाऊ व दादोजी कोंडदेव यांनी केला. तो असा काळ होता ज्या वेळेस हिंदू राजाचं राज्य स्थापन करण्याची कल्पना देखील शक्य नव्हती. 

 पण शिवाजीराजांनी हे शक्य करून दाखवलं, जिजाऊंनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यामध्ये उतरवलं. याची सुरुवात झाली ती म्हणजे बारा मावळातील मावळ्यांना आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन. शिवरायांनी लहानपणापासूनच अनेक सवंगडी सोबती तयार केले, आणि वय वर्ष 15 असतानाच, भोर येथील रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कोणतही राज्य स्थापन करण्यासाठी किल्ल्यांची महत्त्वता किती आहे हे महाराज जाणून होते. 

वयाच्या 15- 16 व्या वर्षीच काही मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि चालू झाली हिंदवी स्वराज्याची खरी कहाणी. यानंतर एकामागून एक किल्ले महाराज घेत सुटले. चाकणचा किल्ला, कोंढाणा, त्याचबरोबर आबाजी सोंडदेव यांच्या मदतीने, महाराजांनी ठाणे, भिवंडी व कल्याण येथील किल्ले जिंकले. ही गोष्ट जेव्हा आदिलशहाला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. की शहाजीचा मुलगा शिवाजी एक एक करून आपले किल्ले घेत चालला आहे. (shivaji maharaj story)

 शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी त्यांनी शहाजी राजांना तुरुंगात टाकलं. आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी महाराजांनी युक्ती वापरली, पुढची सात वर्षे आदिलशाही वर आक्रमण केले नाही. सात वर्षांचा हा भलामोठा काळ महाराजांनी आपले सैनिक वाढवण्यावर आपली सेना बळकट करण्यावर भर दिला.

 शिवाजी महाराजांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. आणि म्हणूनच महाराजांना रोखण्यासाठी विजापूरच्या बडी बेगमने अफजल खानाला 10000 सैन्यासोबत महाराष्ट्रात पाठवले. नास्तिक अफजल खान त्याच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता. सात फूट उंच, आडव्या हाडाचा, दोन हाताने लोखंडी पोलाद वाकवणारा अशी त्याची ख्याती होती.

 महाराष्ट्र मध्ये येताच त्याने शिवाजीराजांना उपसण्यासाठी अनेक मंदिरे उध्वस्त केली, स्त्रियांची अब्रू लुटली. महाराजांनी आपले धैर्य न गमावता, गनिमी काव्याने युद्ध चालू ठेवले. त्यावेळेस महाराज प्रतापगडावर होते. शेवटी तो प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन ठेपला. 

महाराजांनी त्यांला भेटायची विनंती केली, ही विनंती मान्य करून तो महाराजांना भेटण्यासाठी तयार झाला. दिवस ठरली वेळ ठरला आणि ठरल्याप्रमाणे, महाराज आणि अफजल खान हे एकमेकांच्या समोर आले. अफजल खानाने महाराजांना पहिली मिठी मारली, पण यानंतर दगा केला,व पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे प्रयत्न केला.

 पण दूरदृष्टी असलेले महाराज आधीपासूनच सावध होते. चिलखतामुळे अफजल खानाचा वार वाया गेला. पण यानंतर महाराजांनी लपवलेल्या वाघनखांनीं अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. शिवाजी राजांचा विजय झाला.

 अफजल खान सारखा मातब्बर सरदार रणांगणी हरला, हे ऐकून विजापूर तसेच, दिल्लीचं तख्त सुद्धा हादरलं. यानंतर एक से बढकर एक मातब्बर सरदार आदिलशाही, कुतुबशाही, मुघलांनी, स्वराज्यावर पाठवले. पण शिवाजीराजांपुढे कोणाचाही टिकाव लागला नाही. 


 महाराजांना शह देण्यासाठी 1660 मध्ये आदिलशाहीने, मातब्बर सरदार सिद्दी जौहर यास पाठवले. महाराज तेव्हा पन्हाळा किल्ल्यावर होते. सिद्दीच्या सैन्याने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. महाराज अडकून पडले. बरेच महिने हा किल्ला महाराजांनी लढवत ठेवला.

 आणि जेव्हा पावसाळा चालू झाला तेव्हा पावसाचा फायदा घेऊन एका रात्री महाराज दीड ते दोन हजार मावळ्यांसह किल्ला सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे समजल्यावर लगेचच सिद्दीच्या सैन्याने महाराजांचा पाठलाग केला पण घोडखिंडीत छातीची ढाल करून 75 वर्षाचा बाजीप्रभू सिद्दीजोहरला नडला. 

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत एक इंच सुद्धा या मावळ्याने शत्रूला पुढे सरकू दिले नाही. प्राणांची शर्थ करून त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले . यानंतर विजापूरची महाराणी बडी बेगमने औरंगजेबाला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी विनंती केली. औरंगजेबाने दीड लाख सैन्यासह त्याचा मामा शाहिस्तेखान ला महाराष्ट्रात पाठवले. 


shivaji maharaj full information in marathi



सैन्यबळ जास्त असल्यामुळे तीनच दिवसात त्याने पुण्यावर कब्जा केला व शिवाजी महाराजांचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या लाल महालातच तळ ठोकला. पण शिवाजी महाराजांनी चलाखीने, वेष बदलून लग्नाच्या वरातीतून आपल्या मोजक्या मावळ्यांसह, लाल महालात प्रवेश मिळवला. महाराजांची चाहूल लागताच शाहिस्तेखान सैरावैरा पळत सुटला, महाराजांनी त्याचा पाठलाग करून एक जोरात वार केला. यात शाहिस्तेखान तर वाचला पण त्याला त्याची तीन बोटे गमवावी लागली.

 या प्रसंगाने त्याच्या मनात एवढी भीती निर्माण केली की त्याला पुणे सोडून पळावं लागलं. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर हार झाल्यानंतर पुरंदर सह महाराजांना तेवीस किल्ले द्यावे लागले. व औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावे लागले. तिथे औरंगजेबाने त्यांच्यासोबत धोका करून त्यांना नजरकैदेत ठेवले. पण इथुन सुद्धा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटले व थेट महाराष्ट्रात आले. 

 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराज “छत्रपती "झाले. रायगडावर हा देखणा सोहळा पार पडला. तबबल 50 हजार लोकं या सोहळ्याचे साक्षीदार झाले. चार किल्ले आणि मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्थापन केलेलं स्वराज्य आता 350 किल्ले वं दीड लाख मावळ्यांचे झालं होतं. 

 शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक देखील होते, त्यांनी कधीच स्त्रियांचा अनादर केला नाही, धर्मावरून, जातीवरून कोणाला हिनवले नाही. किल्ल्यांचा योग्य वापर,गनिमी कावा व नौदलाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. तीव्र तापामुळे 3 मार्च 1680 रोजी वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.