Header Ads Widget

मराठीमध्ये चांगले सुविचार | Good Thoughts In Marathi

स्वतःची चिंता न करता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्याशी.


 दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका.

 

 दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.

 

          

खोटा मान खोटी हाईट सोडा म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.

 

न्यायाची मागणी करणाऱ्याने  स्वतः न्यायी असले पाहिजे.


good thoughts in marathi
good thoughts in marathiयशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.

 

 जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते.

 

 सारी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही.

 

 पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात.

 

 पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही एक अर्थ असतो म्हणजे जीवनार्थ पुष्कळ अर्थ असतात.

 

 प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे तर गती हा त्याचा आत्मा आहे.

 

प्रयत्न हाच परमेश्वर.


 प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक.

 

 प्रार्थना म्हणजे मौन साधून, मागणी रहित होऊन केलेले आत्मसमर्पण होय.

 

 प्रार्थना म्हणजे आत्म्याची भुक शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढेच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.

 


जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते तसे पश्चातापाने मन पवित्र होते.


 मनाची परीक्षा डोळ्यानी होते तर डोळ्यांची परीक्षा मनाने होते.

 

 रिकामे मन कु विचाराचे धन.

 

 बुद्धी हे आत्म दर्शनाचे महाद्वार आहे.बुद्धी उघडली तर आत्मा उभाच आहे.

 

भक्त कर्माची उपासना करतो तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो.


मन सत्याने शुद्ध होते.


विश्वासामुळे माणसाला बळ येते.


जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो तसे मन अयोग्य क्रमाने मलीन होते.

 

शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.

 

 सावधपण, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

 

 वाचनासाठी वेळ काढा तो शहाणपणाचा निर्झर आहे.

 

 मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो.

 

 मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका.

 

 लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा.

 


जस गेलेला बाण परत येत नाहीत असे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.


जितके निरीक्षण सूक्ष्म तीतकी समजूत अधिक म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.


 जसे प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत नाहीत तसे विचाराशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही.

 

 विचाराची संपत्ती हे माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.

 

 सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्या बरोबर येणाऱ्या  संकटा सोबत विजयश्री घेऊन येतो.

 


काम साध्य होईपर्यंत अडचणीला तोंड द्यावेच लागते. 


संकट महासत्ता कडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. 


श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा.


वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भूर्जपत्रावर लिहिलेली काव्य होय.


विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे याचेच नाव म्हणजे शिक्षण होय.


विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.


धावताना लोक कडे लक्ष देऊ नका.


नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.


परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.


पैसा बोलू लागतात तेव्हा सत्य गप्प बसते.


जशी रत्ने बाहेरून चमक दाखवतात, तशी पुस्तकेही आतून अंतःकरण उजळतात.


पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.


विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.


 ज्ञान म्हणजे काय इतिहास आणि अनुभवाचे काढलेले सार.

 

कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यास कुचराई करू नका.


गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयांहून अधिक मोलाचा आहे. कारण गरीब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.


 


तिरस्कार आणि विरोध ही समाज सुधारक म्हणून खास मिळालेली बक्षिसे आहेत.

 

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता पिता ही शिक्षक आहेत.


 विजय हाच शौर्याचा अलंकार आहे.

 

 विद्या विनयेन शोभते.

 

अनोळख्याला भाकरी, द्यावी पण उसळी देऊ नये.


निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.


वाचन हे मनाचे अन्न आहे.


विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे.


विद्यालय गरिबाचे धन आणि श्रीमंताचा अलंकार आहे.


मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो.


विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती.


खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.


गरिबांना दुःख अनुभवाने कळते पण श्रीमंतांना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते.


गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.


चित्रही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची कृती आहे.


संकटे पाहून घाबरत नाही तोच खरा माणूस होय.


सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे परंतु सज्जन म्हणून वागणे ही आयुष्यभराची कमाई आहे.हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे, परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे.


स्वताला लपवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो दुसऱ्या वर टीका करणे होय.


सौंदर्य हे वस्तुत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.


समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.


संकटांना भिऊ नका संकटांना संधी म्हणून त्यावर मात करा.


शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेली एक संस्कार केंद्र आहे.


शरीरात चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण.


नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.


स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे.


विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे.


घर ही गोष्ट दगड विटांनी बांधून नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्याने बांधले जाते तेच खरे घर होईल तेथे आळशी आरामात आहे तेथे राम नाही.