Header Ads Widget

संतांचे कार्य आणि संतांची माहिती मराठी

 

            संतांचे कार्य आणि संतांची माहिती मराठी

संतांचे कार्य आणि संतांची माहिती मराठी
संतांचे कार्य आणि संतांची माहिती मराठी


भगवान श्रीमद श्रीधर स्वामी

जन्मगाव :  चिंचोळी(मराठवाडा).  

जन्म :7 डिसेंबर 1908

प्रस्तावना : भगवान श्री मद् श्रीधर स्वामी सर्वांना परिचित आहेत.

परिचय : 

भगवान श्रीम द श्रीधर स्वामी यांच्या आईचे नाव कमळाबाई व वडिलांचे नाव नारायण असे होते. ते रामदास स्वामींचे उपासक होते. त्यांनी रामदास स्वामींच्या अनेक गोष्टी आचरणात आणल्या. दुसऱ्यांना मदत करणे व इतरांच्या सुखासाठी झटणे यातच त्यांना आनंद मिळत  असे.

धार्मिक कार्य व शिकवण : 

श्रीधर स्वामी वस्तीगृहात राहत असताना त्यांची इतरांना मदत करण्याची, इतर जणांची सेवा करण्याची वृत्ती पाहून त्यांना त्यांच्या गुरुजींनी सज्जनगडावर जाऊन आपले जनहित कार्य करण्यास सांगितले.

त्यानुसार त्यांनी सज्जनगडावर जाऊन पूर्ण जीवन समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण केले. ते समर्थ रामदास स्वामींचे सेवेकरी बनले. तेथे त्यांनी लोकांची सेवा केली. पुढे त्यांनी दक्षिण भारतात जाऊन प्रवचने केली. अनेक ग्रंथ लिहिले.

लोकांनी सदैव सुखी राहावे, आनंदी असावे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. समाजातील दुष्ट प्रवृत्तीं चा नायनाट व्हावा यासाठी ते सतत झटले. धर्मप्रसारासाठी ते संपूर्ण भारतभर  हिंडले.

सामाजिक कार्य :

 श्रीधर स्वामींनी सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह घेतला. समाधीस्थळावर येणाऱ्या भाविकांची ते मनापासून सेवा करत असत. विद्यार्थीदशेत असताना ते इतर विद्यार्थ्यांना मदत करत असत. यातच त्यांना आनंद वाटत असे.

आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस दुःख मुक्त व्हावा असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांनी (समाजाचा आपल्या प्रवचनातून कोणाशीही वाईट वागू नका ,दृष्ट प्रवृत्तींचा) नायनाट करा अशी शिकवण दिली.

भगवान श्रीमद श्रीधर स्वामी यांना श्री .समर्थ रामदास स्वामींनी  'भगवान 'ही पदवी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतश्री निवृत्तिनाथ

जन्मगाव : आपेगाव

प्रस्तावना : आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात अनेक थोर संत होऊन गेले; त्यापैकी निवृत्तीनाथ हे एक संत होत.

परिचय : 

संत निवृत्तीनाथांच्या जन्म  'आपेगाव' येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते. संत ज्ञानेश्वर ,संत मुक्ताबाई व सोपानदेव ही त्यांची भावंडे होती.

संत   निवृत्तिनाथ हे एकदा ब्रह्मानगरीला गेल्यावर त्यांना एका गुहेत श्री गहिनीनाथांचा आशीर्वाद मिळाला व त्यांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली.

आई-वडिलांच्या नंतर त्यांनी आपल्या भावंडांचा सांभाळ केला. संत श्री ज्ञानेश्वर हे संत निवृत्तीनाथांना आपल्या गुरुस्थानी मानत होते. 

त्यावेळी समाजातील लोकांना खऱ्या धर्माची, सत्याची ओळख करून देण्याची गरज होती. म्हणून संत निवृत्तीनाथांनीच ज्ञानेश्वरांना समाजाचा उद्धार करण्यासाठी 'भगवद्गीता' हा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिण्यास सांगितले.

धार्मिक कार्य व शिकवण : 

त्यांनी अनेक अभंग लिहिले. त्यांनी शिवभक्ती बरोबरच कृष्णभक्ती करण्यास सांगितले. तसेच शिव व हरी दोन्ही एकच आहेत .'आपल्या अभंगातून समाजापर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

संत निवृत्तीनाथ म्हणतात की,'गुरुकृपा झाल्यानंतर साधकाला काहीच अशक्य नसते. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कोणालाही ईश्वर प्राप्ती होत नाही. गुरूने दाखवलेला मार्ग स्वीकारला तर आपले जीवन सफल होते. देवाला सर्वजण समान आहेत. '

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 संत श्री नरहरी सोनार

श्री नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील एक थोर संत.

जन्मगाव : पंढरपूर.            

जन्मसाल : इ .स.1313

परिचय : श्री नरहरी सोनार हे शंकराचे परम भक्त होते . शिव भक्तीचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडूनच त्यांना मिळालेला होता. त्यांचा पिढीजात सोनाराचा व्यवसाय होता.

धार्मिक कार्य :

 संत श्री नरहरी सोनार यांनी अनेक अभंगरचना केल्या. त्यांच्या अभंगात शिवभक्ती ओतप्रोत भरलेली  आहे.

सामाजिक कार्य  व शिकवण : 

श्री नरहरी सोनार हे भक्तिमार्ग चळवळीतील संत होते. देव एकच आहे, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. प्रत्येक काम ईश्वराचे आहे असे समजून नि:स्वार्थपणे करा, हा संदेश त्यांनी समाजाला दिला. 

गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कोणालाही देवापर्यंत जाता येत नाही, गुरूंनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब केला तर भक्ताचे जीवन सफल होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 इतर कार्य : 

पंढरीत राहून कधीही ते पांडुरंगाच्या देवळात गेले नाहीत; कारण ते शिवभक्त होते .एके दिवशी एक सावकार त्यांच्या दुकानात आला. त्याने पांडुरंगाच्या कमरेचे माप घेऊन एक करदोडा तयार करण्यास सांगितले.

 तेव्हा नर्हरी सोनारांनी डोळ्यांवर पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन कर्दोडा बनवला व सावकाराला दिला. सावकाराने पूजेच्या दिवशी करदोडा विठ्ठलाला घातला तर तो चार बोटी आखूड झाला. 

स्वतः नर्हरी सोनार डोळ्यांवर पट्टी बांधून तो करदोडा घालण्यास देवळात गेले. तर त्यांच्या हाताला शंकराची पिंड लागली. त्यांनी डोळ्याची पट्टी सोडली तर पांडुरंगाची मूर्ती दिसली. तेव्हा त्यांना जाणवले ,की दोन्ही देव एकच आहेत .म्हणून ते म्हणतात देव एकच आहे;

 मनापासून भक्ती करा, म्हणजे तो आपल्याला भेटतो, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संचय करू नये, गोरगरिबांना मदत करा, अशी शिकवण संत श्री दामाजीपंत यांनी समाजाला दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 संत श्री सेना महाराज

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैकी एक संत श्री सेना महाराज होत.

जन्मगाव : बांध वगड.              

जन्म साल : इ.स.1379

परिचय : संत श्री सेना यांना लहानपणापासूनच परमेश्वर भक्तीची आवड होती. ते व्यवसायाने नाभिक होते. काम करता करता ते पांडुरंगा चे भजन-किर्तन करत .रामानंद स्वामी हे त्यांचे गुरू होते.

धार्मिक कार्य :

 संत श्री सेना यांनी रचलेली अनेक भजने प्रसिद्ध आहेत. त्यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी  दिल्या. पुढे आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाने त्यांचे देहभान हरपून गेले.

सामाजिक कार्य व शिकवण : 

घरी येणाऱ्या साधुसंतांची ते सेवा करत. त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी भक्तिमार्ग चळवळीत सामाजिक समता आणण्याचे कार्य केले .सामाजिक विषमता , जातीभेद - अंधश्रद्धा , अनिष्ट परंपरा व रुढींना त्यांनी कडाडून विरोध केला . सतत ईश्वराचे नामस्मरण करण्याचा संदेश त्यांनी दिला.

इतर कार्य : 

संत श्री सेना बादशहाकडे नोकरीला असताना एक दिवस पांडुरंगाची पूजा करत असताना असता बादशहाने त्यांना तीन-चार वेळा  बोलावणे पाठवले पण ते आले नाहीत. 

क्रोधित बादशहाने संत श्री सेना यांना शिक्षा देण्याचे ठरविले, तेव्हा पांडुरंगाने  नाभी का चे रूप घेऊन बादशहाची हजामत करून  भक्ताची मदत केली ,अशी कथा आहे. ते पंढरपुराला आले.

त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. नंतर आपल्या बांधवगड या मायभूमीत आल्यावर शांत अंत :करणाने इ .स .1448 मध्ये ते समाधिस्थ  झाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री नामदेव

संत नामदेव हे सर्वांना परिचित असणारे महाराष्ट्रातील थोर संत.

जन्मगाव: नरसी बामणी (हिंगोली).  

जन्म: कार्तिक शुद्ध एकादशी शके 1192

समाधी: आषाढ बद्दल त्रयोदशी, शके1272(इ.स.1350)

परिचय: 

 संत नामदेवांची आई बानाई व वडील दामाशेठ हे दोघेही पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. 

आपल्या आईवडिलांकडून त्यांना विठ्ठल भक्तीचा वारसा मिळाला. 

वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा 'राजाई' नावाच्या मुलीशी विवाह झाला. संसारात त्यांचे मन रमले नाही. 

विसोबा खेचर हे त्यांचे गुरू होते.

धार्मिक कार्य व शिकवण:

 प्रेम व भक्ती यांचा उपदेश त्यांनी केला. भक्तीशिवाय देवापर्यंत पोहोचता येत नाही. संपूर्ण मानव जातीला भक्तीचा अधिकार आहे, अशी शिकवण त्यांनी दिली.

त्यांचे अनुयायी महाराष्ट्र व पंजाब मध्ये आहेत. मूर्तिपूजा त्यांना अमान्य होती. उपवासाची गरज नाही असे त्यांचे मत होते.मराठी व हिंदी मध्ये त्यांनी अभंग रचले आहेत.

सामाजिक कार्य:

 पंजाब मध्ये 'घुमान'या ठिकाणी त्यांचे विशाल स्मृति मंदिर बांधले आहे.

'गुरु ग्रंथ साहिब' या शिखांच्या पवित्र ग्रंथात मध्ये संत श्री नामदेवांची अनेक वचने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सर्व जातींना समान मानणारे श्री नामदेव हे महान संत होते. त्यांनी अनेक लोकांना भक्तिमार्गाला लावले व सर्वांभूती परमेश्वर आहे, हे समजावून सांगितले. 

त्यांनी सामाजिक विषमता दूर केली .उच्च-नीच भेदभाव   मोडले. तसेच प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, एक्य , मैत्री, व सद्भावना जागृत केल्या. भारत भर्जन भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री एकनाथ

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील थोर संत म्हणून ओळखले जातात. 

आपल्या थोर कार्यामुळे हे संत लहानथोर सगळ्यांना परिचित आहेत.

जन्मगाव:  पैठण.                

जन्म: इ.स.1533

मृत्यू: फाल्गुन वैद्य षष्टी इ.स.1599.                                 

परिचय: 

महाराष्ट्रातील पैठण या गावी संत एकनाथांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी. त्यांनी महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचा प्रचार केला. भगवंत भक्तीचा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला. संत एकनाथ हे कृष्णभक्त होते.

धार्मिक कार्य: 

संत श्री एकनाथांनी 'भागवत पुराण, भावार्थ रामायण आणि रुक्मिणीस्वयंवर' हे ग्रंथ लिहिले. त्यांनी रचलेली भारूडे प्रसिद्ध आहेत. आपल्या भारुडांतून अंधश्रद्धा व जुन्या चालीरीती यांवर त्यांनी टीका केली. अनेक ओव्या, अभंग देखील लिहिले. समाजाला समजेल अशा मराठी भाषेतून प्रचंड लिखाण केले.

सामाजिक कार्य व शिकवण: 

संत श्री एकनाथ यांना जात, उच्च-नीच अजिबात मान्य नव्हते .त्यांनी समाजप्रबोधनाचे अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य केले. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय भक्ताला देवापर्यंत जाता येत नाही ,संसारात राहून देव भक्ती करता येते ,हे त्यांनी लोकांना पटवून दिले .प्राणीमात्रांवर दया करा, श्रीमंत-गरीब हा भेदभाव करू नका ,त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

 इतर कार्य: 

संत श्री एकनाथ आपले गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे हिशोब  ठेवण्याचे काम करत असताना रात्रभर जागून त्यांनी एक पैची चूक शोधून काढली. तहानलेल्या गाढवाला पाणी पाजले. वारंवार मारणाऱ्या विंचवाला जीवनदान देऊन प्राणीमात्रांवर दया करावी ,हे कृतीतून पटवून दिले. भारुड ,गवळण ,पदरचना ,यामधून त्यांनी जनतेला समता ,बंधुता ,ममता व प्रेम यांची शिकवण  दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री गोरा कुंभार

गोराकुंभार म्हणजे महाराष्ट्रातील थोर संत.

जन्मगाव: तेर- ढोकी(उस्मानाबाद). 

 जन्म: शके1189(इ.स.1267)

मृत्यू: इ.स.1317

 परिचय: 

संत श्री गोरा कुंभार यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावात झाला. त्यांचे मूळ नाव गोरोबा. त्यांना विठ्ठल भक्तीचा वारसा लहानपणापासून मिळालेला होता. मातीची भांडी, गाडगी, मडकी ,रांजण, पण त्या ,बनवणे हा त्यांचा व्यवसाय होता. पंढरीचा पांडुरंग हे त्यांचे आराध्य दैवत होते.

धार्मिक कार्य: 

संत गोरा कुंभारानी अनेक कीर्तने केली. त्यांची भजने सुद्धा प्रसिद्ध आहेत. संत मुखी देवाचे नाव घेण्याची शिकवण त्यांनी दिली. भगवद् भक्तीचा प्रसार केला.

सामाजिक कार्य व शिकवण: 

संत श्री गोरा कुंभार हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. उच्च-नीच असा भेदभाव करु नका ,सर्वांना समानतेची वागणूक द्या. अशी शिकवण संत श्री गोरा कुंभार यांनी आपल्या आचरणातून समाजाला दिली. त्यांनी आपल्या कथा प्रवचन कीर्तन याद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी विठ्ठल भक्ती करा असा संदेश दिला.

इतर कार्य: 

संत श्री गोरा कुंभार आपल्या कामालाही विठ्ठल नामाची जोड देत असत. 'हाती काम मुखी विठ्ठल नाम' घेता घेता त्यांचे देहभान हरपून जात असे.

 एकदा गाडगी, मडकी तयार करण्यासाठी चिखल तुडवीत असताना विठ्ठलाच्या अभंगात ते इतके रंगून गेले, की त्या  चिखलात त्यांनी स्वतःच्या पोराला कधी तुडवले तेच त्यांना कळले नाही. 

एकदा नकळत पत्नीला स्पर्श केल्याने आपण विठ्ठलाची आण मोडली म्हणून गोरोबांनी आपल्या हात तोडून घेतले. तेव्हा असेच कीर्तन करत असताना प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना त्यांचे हात परत दिले. आणि त्यांच्या पत्नीला मुलंही परत मिळाले ,अशी आख्यायिका आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत सावता माळी

महाराष्ट्रातील थोर संतांची पैकी एक संत श्री सावता माळी.

जन्मगाव : अरणभेंडी (सोलापूर ).       

जन्म : इ.स.1250

मृत्यू : आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 (इ.स.1295)

परिचय : 

श्री सावता माळी मूळचे माळी कुटुंबातील होते .पंढरपूर येथील विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाला होता. मळ्यात भाजीपाला पिकवणे आणि तो बाजारात नेऊन विकणे हा त्यांचा व्यवसाय होता.

धार्मिक कार्य : 

संत श्री सावता माळी यांनी अनेक अभंग रचले. त्यांनी रचलेले अभंग आजही गायले जातात. त्यांच्या अभंगात विठ्ठल भक्ती ओतप्रोत भरलेली आहे.

सामाजिक कार्य व शिकवण : 

संत श्री सावता माळी यांनी आपले दैनंदिन जीवन जगताना भक्तिमार्गाचा अवलंब करा. असा उपदेश केला ,देव हा सर्वत्र आहे, देवाला सारे समान आहेत, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. समाजातील विषमता दूर करून त्यांनी राष्ट्रीय कार्यास हातभार लावला.

इतर कार्य : 

संत श्री सावता माळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करायचे. हाताने काम मुखाने विठ्ठल नाम असा त्यांचा दिनक्रम होता .संत श्री सावता माळी यांच्या मते ,भगवंत हा अवघ्या चराचरांत म्हणजे शेतातल्या धान्यात आहे ,शेतातून वाहणाऱ्या पाण्यात, वाऱ्यावर डोलणाऱ्या  पानांत ,इतकेच नव्हे तर घामाच्या थेंबातून पिकणाऱ्या, फुलणाऱ्या, तरारून वर येणाऱ्या कांदा ,मुळा या साऱ्यांत आहे.

   एके दिवशी हाती काम  व मुखी विठ्ठल नाम चालू असताना स्वतः विठ्ठल धावत येऊन त्यांना म्हणाले," अरे सावतोबा ,संत जन मला पकडून नेण्यासाठी येत आहेत, तेव्हा मला लपायला जागा दे." असे म्हटल्यावर संत सावता माळी यांनी आपल्या छातीवर  विळा चालवला व विठ्ठलाला लपावयास जागा दिली, अशी आख्यायिका आहे .

 कितीही निस्सीम भक्ती!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री  ज्ञानेश्वर

संत श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संत.

जन्मगाव:  आव गाव श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७(इ .स.१२७५ )

समाधी: कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८(इ .स.    1296 )


परिचय: 

संत श्री ज्ञानेश्वरांचा जन्म गोदावरी तीरावरच्या 'आपे' गावी झाला . महाराष्ट्रामध्ये त्यांनी भागवत धर्माचा पाया घातला. निवृत्ती ,सोपान व मुक्ताबाई ही त्यांची तीन भावंडे. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघेही ईश्वर भक्त होते.

धार्मिक कार्य व शिकवण:

 वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेवर 'ज्ञानेश्वरी 'हा ग्रंथ लिहिला.

 हिंदू धर्मातील बहु देव वाद, कर्मकांड , इत्यादी प्रवृत्तींना त्यांनी प्रखर विरोध केला. 'महाराष्ट्रीयन प्राकृत' भाषेतून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली.

सामाजिक कार्य: 

संत श्री ज्ञानेश्वर हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे परम भक्त होते. दरवर्षी ते पंढरपूरला जात असत. त्यांची ज्ञानेश्वरी ,चांगदेव पासष्टी, अभंग गाथा, व अमृतानुभव हे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरांचे लोकप्रिय 'पसायदान' अजरामर ठरले.

इतर कार्य: 

ज्ञानेश्वरांनी पैठणच्या धर्मपंडितांनी पुढे रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले आणि ईश्वर सर्व ठिकाणी आहे ,याची साक्ष पटवली. सर्वसामान्य लोकांना भक्तीची ,मुक्तीची वाट दिसावी म्हणून त्यांनी हरिपाठाचे 28 अभंग लिहिले .त्यांनी आपल्या अभंग-ओव्यांतून प्रत्येकाच्या मनात श्रद्धा ,भक्ती व बंधूभाव जागवण्याचे काम केले. 

मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी परमेश्वराकडे पसायदान मागितले. त्यांच्या अंगी असलेल्या दया, प्रेम आणि करुणा यामुळे भक्तजन त्यांना 'माऊली' म्हणतात. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून इ.स .1296 ते पुढे जवळ'/ आळंदी' येथे  समाधी घेतली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री रामदास

महाराष्ट्रातील थोर संत प्रभू राम चंद्र यांचे दास म्हणून संत श्री रामदास आपणा सर्वांना परिचित आहेत.

जन्मगाव: जांब (औरंगाबाद) 

जन्म: शके1530(इ.स.1608)

मृत्यू: माघ वद्य नवमी शके 1603( इ.स.1681)

परिचय: 

संत रामदासांचा जन्म गोदावरी नदीकाठच्या 'जांब' या गावी राम नवमीच्या दिवशी झाला .त्यांचे नाव नारायण असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव राणूबाई. रामदास श्री रामाचे भक्त होते. ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. ते शेवटपर्यंत अविवाहित होते. संसारात राहून मुख्य ध्येय गाठता येत नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली.

धार्मिक कार्य: 

श्री रामदासांनी श्रीराम व बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे महाराष्ट्रात स्थापन केली. त्यांनी 'दासबोध 'ग्रंथ व मनाचे श्लोक लिहिले. हिंदू समाजातील एकजुटीचे कार्य त्यांनी केले.

सामाजिक कार्य व शिकवण: 

श्री रामदासांनी लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकविले .संघटित होऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. मनाच्या श्लोकातून सद्विचार व सद्वर्तनाचे शिकवण दिली. 'दासबोध' या ग्रंथात लोकांना मोलाचा संदेश दिला.

इतर कार्य: 

संत श्री रामदासांनी टाकळी या गावी राम नामाचा 13 कोटी जप केला. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी संत श्री रामदास यांनी मोलाची मदत केली. लोकांच्या मनातील आत्मविश्वास जागा केल्या. 

धर्माबद्दल आदर निर्माण केला गेला. लोकांच्या मनात देशभक्ती तसेच देशभक्ती जागविली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या उपदेशाचे पालन केले .शिवाजीमहाराजांच्या मनावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री तुकाराम

महाराष्ट्रातील थोर संत म्हणून संत श्री तुकाराम यांना ओळखले जाते.

जन्मगाव: देहू.            

जन्म: माघ शुद्ध पंचमी शके 1530

वैकुंठ गमन: फाल्गुन वद्य दृतीया शके 1571 (इ .स.1649 )

परिचय: 

पुणे जवळ देहू येथे संत श्री तुकारामांचा जन्म झाला होता. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले. तुमच्या वडिलांचे नाव बोल्होबा. देहू गावात यांचे घर होते. थोडी जमीन होती. वाण्याचे दुकान होते. तुकावाणी म्हणूनच ते प्रसिद्ध होते, गावात दुष्काळ पडल्यानंतर त्यांचे दुकान ,शेतीवाडी, घरदार सारे गेले. 

त्यानंतर त्यांचे मन संसारात कधीच रमले नाही. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठल भक्तीचा वारसा मिळाला होता. त्यातच फिरू लागले .दरवर्षी ते पंढरीच्या वारीला जात असत. ते निस्सीम विठ्ठल भक्त होते.

धार्मिक कार्य व शिकवण: 

श्री तुकारामाच्या वाणीतुन निघालेले रसाळ अभंग लोकांना आवडू लागले. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा व रुढींना कडाडून विरोध केला. लोकांना दया,-क्षमा-,शांती यांची शिकवण दिली. श्री तुकाराम महाराजांच्या रसाळ अभंगरचना 'श्री तुकाराम गाथा 'या ग्रंथात आहेत.

सामाजिक कार्य: 

श्री तुकारामांनी लोक जागृती ,लोक शिक्षण, लोक उद्धाराचे, समाज सुधारण्याचे कार्य केले. आपल्या कीर्तनातून समतेचा उपदेश केला.

"जे का रंजले गांजले! त्यांसी म्हणे जो आपुले!

तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!! "

हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. श्री तुकारामांनी आपल्या कीर्तन अभंगाद्वारे समाजातील विषमता ,वाईट रूढी यावर टीका केली. सर्वांना समजेल अशी शिकवण दिली .त्यांनी चालू केलेली पंढरीची वारी अजूनही चालू आहे . पुष्कळ लोक देहूहून पंढरपूरला चालत जातात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत कान्होपात्रा

महाराष्ट्रातील सर्व परिचित असणारी थोर स्त्री संत कानोपात्रा होय.

जन्मगाव: मंगळवेढा.            

जन्म:  इ.स.1454

परिचय: संत कान्होपात्रा दिसायला रूपवान होत्या.

 लहानपणापासूनच नृत्य, संगीत कलेची आवड , आणि त्या कलेत त्या प्रवीण झाल्या. एके दिवशी त्यांच्या समोरून वारकरी पंढरपूरला जात होते. त्यांच्या तोंडून विठ्ठलाचे वर्णन ऐकल्यावर त्यापण वारीला जाण्यास निघाल्या व तेव्हापासून त्यांना विठ्ठल भक्तीचे वेडच लागले.

धार्मिक कार्य: 

त्यांनी अनेक भजने , अभंग लिहिले , त्या विठ्ठलाची भजने गातागाता नाचत असत. भजनात रममान होत असत.

सामाजिक कार्य व शिकवण: 

उच्च-नीच असा भेदभाव करू नका. सर्वांना समानतेची वागणूक द्या. अशी शिकवण त्यांनी दिली.

समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सगळ्यांनी भक्तिभावाने देवाची प्रार्थना करावी. देव एकच आहे. त्याची मनापासून प्रार्थना केली तर तो भक्तांसाठी धावून येतो. असा संदेश श्री संत कान्होपात्रा यांनी समाजाला दिला.

इतर कार्य: 

संत कान्होपात्रा यांच्या अभंगांतून विठ्ठल भक्तीचे दर्शन घडते. संत कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी. आपण असे आहोत, म्हणून श्री विठ्ठल आपला अंगिकार करणार नाही, असे त्यांना वाटे; पण त्यांची भक्ति अनन्य साधारण होती. त्या श्री विठ्ठलाला पूर्णपणे शरण गेल्या. श्री विठ्ठ लाने त्यांना दर्शन दिले.

एके दिवशी बादशहाची माणसे त्यांना न्यावयास आली असता त्यांनी पंढरपूरच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाची अंत:करणापासून प्रार्थना केली आणि ती श्री पांडुरंगाने ऐकली. त्या महान संत कान्होपात्रेला भगवंतांनी आपल्या चरणी विलीन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत जनाबाई

संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातील थोर स्त्री संत होत्या.

जन्मगाव: गंगाखेड (परभणी).    

मृत्यू: आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 सालं (इ.स.1350)

परिचय: एक महान संत कवयित्री, संत नामदेवांच्या दासी म्हणून ओळखल्या जातात. त्या संत नामदेवाच्या घरी दळण कांडण करत. श्री पांडुरंगाच्या त्या निस्सिम भक्त होत्या.

धार्मिक कार्य:

 संत जनाबाईचे नामदेव चरित्र, हरिश्चंद्र आख्यान, सेना न्हावी चरित्र, प्रल्हाद चरित्र, ज्ञानेश्वर स्तुति ,कृष्ण जन्म ,बाल क्रीडा व काला पदे असा जवळ जवळ 350 रचना व अभंग प्रसिद्ध आहेत. संत जनाबाईच्या जात्यावरील ओव्या ही प्रसिद्ध आहेत.

सामाजिक कार्य व शिकवण: 

स्त्रीच्या जीवनात दैनंदिन काम करताना ज्या अडचणी येतात . त्यांचे काव्यात्मक वर्णन संत जनाबाई यांनी आपल्या अभंगांतून केले आहे . दरवर्षी त्या पंढरपूरला जात असत . जातिभेद, सामाजिक विषमता ,अंधश्रद्धा यांवर त्यांनी आपल्या ओव्यांमधून टीका केली आहे.

त्यांच्या मुखात सतत श्री विठ्ठलाचे नामस्मरण चाली असे .संत जनाबाईंनी संत-सहवासाचे महात्म्य मोठे आहे .असे म्हटले आहे देवाला सर्व सारखेच असतात .अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली.

इतर कार्य:

 ' वैकुंठीचा हरी' या अभंगातील ओवीतून श्री कृष्णाच्या लीला चे सुंदर वर्णन त्या करतात. बाळाच्या नाजूकशा पायात पैंजण ही आहेत व हातात वाळेही आहेत. हातामध्ये लोण्याचा गोळा आहे. असा  प्रत्यक्ष हरी जिच्या घरी वाढतो आहे. अशी ती यशोदा माता धन्य होय. त्या मातेच्या चरणांवर मी नतमस्तक होते. अशा  उत्कटतेने श्रीहरी बदल त्यांनी आपल्या ओवीतून प्रेम व्यक्त केले आहे.

संत जनाबाईंची विठ्ठल भक्ती अनन्य साधारण होती. प्रत्यक्ष विठ्ठल तिच्यासोबत दळणकांडण करीत होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री रोहिदास

हे उत्तर भारतातील महान संत असले तरी महाराष्ट्रातील संत ना मावळ्यात त्यांचा उल्लेख आढळतो.

जन्मगाव: काशी जवळ गोवर्धन पूर

संत रोहिदास सर्वांना परिचित असणारे महाराष्ट्रातील थोर संत.

परिचय: संत रोहिदास हे परम विष्णू भक्त होते .पायांतील जोडे साधण्याचा त्यांचा व्यवसाय होता. व्यवसाय करत असताना ते श्रीविष्णूचे सतत नाम स्मरण करत असत.

धार्मिक कार्य : 

संत श्री रोहिदासांचे अनेक अभंग भजने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भजनात विष्णु भक्ती ओतप्रोत भरलेली दिसून येते.

इतर कार्य : 

भक्ताचे अंतकरण निर्मळ असेल तर त्याच्यातच भगवंत राहत असतो. असे संत रोहिदास यांचे मत होते. देवाची भक्ती करताना उच्च-नीच भेद कोणीही करू नये. सर्व भक्तांसाठी देव हा समान आहे , असे त्यांचे म्हणणे होते.

सामाजिक कार्य व शिकवण : 

संत रोहिदास यांनी देवाचे सतत नाम स्मरण करा, जातिभेद पाळू नका. सगळीकडे देव एकच आहे. सर्वांना समानतेची वागणूक द्या. असा संदेश समाजाला दिला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत श्री दामाजीपंत

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत म्हणून ओळखले जाणारे संत श्री दामाजीपंत  एक होत.

जन्म : इ .स. 1456

परिचय : संत श्री दामाजीपंत मंगळवेढा यांचे रहिवासी. ते बिदरच्या बादशहाच्या घरी काम करीत होते. ते मंगलवेढा गावाचे अधिकारी होते. ते सतत श्री पांडुरंगाचे नामस्मरण व भजन करीत असत.

धार्मिक कार्य :

 संत श्री दामाजीपंत यांनी रचलेली भजने, तसेच अनेक अभंग रचना सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभंग रचनेतून विठ्ठला बद्दल ची भक्ती, आस्था व प्रेम या गोष्टींचे दर्शन घडते.

सामाजिक कार्य व  शिकवण : 

संत श्री दामाजी पंत यांना जातिभेद मान्य नव्हता. देवाला सर्व भक्त सारखेच असतात .अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. भक्तिमार्ग चळवळीतून त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. दानधर्म करा, दुसऱ्याला त्रास देऊ नका, ईश्वराचे नामस्मरण करा .देवाची मनापासून भक्ती केली तर संकटकाळी तो नक्कीच आपल्याला मदत करतो, असा संदेश त्यांनी आपल्या कार्यामधून समाजाला दिला.