Header Ads Widget

मराठी मध्ये Blog कसा Start करावा ? | How to start a blog in Marathi?

 मला लिहिण्याची आवड होती आणि मला नेहमीच quora सारख्या प्लॅटफॉर्म वर उत्तरे लिहायला आवडत असे. 

तेव्हा वाटले नव्हते की लिखाण करून आपण पैसे कमवू शकतो. पण आता मात्र माझा ब्लॉगिंगवर पूर्ण विश्वास आहे.

ब्लॉगिंग शिकताना सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे प्रत्येक गोष्ट एका जागेवर न मिळणे. आणि हाच अडथळा दूर करण्यासाठी मी हा ब्लॉग लिहीत आहे. ज्यामध्ये ब्लॉग कसा सुरु करायचा, कोणकोणते टूल्स वापरायचे, तुमची पहिली ब्लॉग पोस्ट कशी लिहायची, आणि ट्रॅफिक कशी मिळवायची या सगळ्यांबद्दल मी माहिती देणार आहे. जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा ही विनंती.

या ब्लॉगमध्ये आपण बारा स्टेप्स बघणार आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करू शकतात.

How to start a blog in Marathi?
How to start a blog in Marathi?


 पायरी 1: तुम्हाला काय आवडते?

तुम्ही कशाबद्दल बोलणे थांबवू शकत नाही आणि तुमचे सर्व मित्र तुम्हाला त्या विषयासाठी "व्यक्ती" म्हणून ओळखतात?


 पायरी 2: मी कशाबद्दल ब्लॉग करावा?

तुमची आवड कशामध्ये आहे आणि कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला लिहायला आवडेल आणि त्या गोष्टीबद्दल किती लोकांना वाचायला आवडेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ब्लॉगचा विषय निवडावा.


 पायरी 3: डोमेन विकत घ्या.

कोणत्या नावाचे डोमेन विकत घ्यायचे आणि आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काळजी घ्यायची हे मी या भागात सांगितले आहे.


पायरी 4: होस्टिंग योजना निवडा

तुमची होस्टिंग ही सगळ्यात जास्त वेगवान आणि विश्वासार्ह असली पाहिजे. होस्टिंग हे घरासारखे आहे, त्यामुळे योग्य घर निवडणे गरजेचे आहे.


पायरी 5: वर्डप्रेस चालू करा

वर्डप्रेस हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे व्यासपीठ आहे. सगळे यशस्वी ब्लॉगर्स वर्डप्रेस वापरतात.

 

 पायरी 6: तुमच्या नवीन ब्लॉगवर लॉग इन करा

तुमच्या नवीन WordPress ब्लॉगच्या डॅशबोर्डशी ओळख करून घ्या.


 पायरी 7: ब्लॉगची थीम निवडा.

तुमच्या वेबसाइटला वैयक्तिक स्वरूप आणि अनुभव देण्यासाठी हजारो विनामूल्य आणि सशुल्क थीम आहेत. 


पायरी 8: तुमची पहिली ब्लॉग पोस्ट लिहा.

तुमचा ब्लॉग आणि स्थान स्थापित करण्यासाठी 3 ते 4 पिलोव पोस्ट तयार करा.


पायरी 9: स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि जलद पुढे जा.

जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी ई-पुस्तके आणि अभ्यासक्रमांमध्ये गुंतवणूक करा.


पायरी 10: तुमचा ब्लॉगला ट्रॅफिक मिळवा आणि वाढवा.

तुमच्या ब्लॉगला ऑनलाइन आणि ऑफलाइन एससीओ करा आणि ट्राफिक मिळवा.


पायरी 11: तुम्हाला तुमच्या ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे आहेत ते ठरवा. स्वतःसाठी योग्य मार्ग निवडा.


पायरी 12: ब्लॉग सुरू करण्यासाठी वेळ कसा शोधायचा?

माझ्याकडे ब्लॉगिंग सुरू करायला वेळ नाही हे मी बऱ्याचदा ऐकते आणि मी स्वतः सुद्धा हे खूप वेळा बोललेली आहे. पण सध्या मी कमी वेळ देऊन सुद्धा ब्लॉगिंग करू शकते आणि याबद्दलच मी हा ब्लॉग मध्ये सांगणार आहे.


हा ब्लॉग कोणासाठी आहे?

ज्यांना लिहिण्यात आवड आहे आणि ज्यांना दिवसातून दोन ते तीन तास लिहून पैसे कमवण्याचा मार्ग शोधायचा आहे.

ब्लॉग सुरू करणे जास्त कठीण नाही तुम्ही एका तासामध्ये तुमचा स्वतःचा ब्लॉग सेट करू शकतात.

यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीतच असल्या पाहिजे असेही नाही सुरुवातीला तुम्ही कमी माहितीतदेखील सुरुवात करू शकतात. आणि हळूहळू ब्लॉगिंग बद्दल जास्त माहिती गोळा करू शकतात.


चला सुरू करुया!


तुम्ही ब्लॉगिंग हा पर्याय का निवडावा?

ब्लॉगिंग हाईट पॅसिव्ह इन्कम चा सोर्स आहे. खूप जण फुल टाइम ब्लॉगिंग सुद्धा करतात. ब्लॉगिंग मधून दर महिन्याला एक लाखाहून अधिक कमाई होऊ शकते. मी असे अनेक लोक बघितले आहेत, जी महिन्याला चार ते पाच लाख ब्लॉगिंग मधून कमावतात. तुमची ब्लॉगिंग मधून इन्कम किती होईल हे पूर्णपणे तुमच्या कामावर अवलंबून आहे.


पण एक महत्वाची गोष्ट : 

कोणीही ब्लॉगिंगच्या पहिल्या महिन्यापासून कमवायला लागत नाही आणि जर कोणी तुम्हाला हे सांगत असेल किंवा युट्युब वर व्हिडिओ टाकत असेल. तर ते तुम्हाला चुकीची माहिती देत आहे.


गुगल एडसेन्स मिळाल्यानंतरही किमान सहा महिन्यांनी तुम्ही दहा ते वीस हजारापर्यंत पोहोचाल.


म्हणून सुरुवात करताना ब्लॉगिंग हे पार्ट टाइम करा पूर्ण वेळ ब्लॉगिंगला न देता एक पार्ट टाइम जॉब पाहून मग ब्लॉगिंग करा. किंवा शाळेत असाल कॉलेजमध्ये असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. 


 पायरी 1: आपण कशाबद्दल ब्लॉग करावा?

तुम्हाला कशाबद्दल बोलायला आवडते?  तुम्हाला कशाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे? तुम्ही रात्री उशिरापर्यंत काय करता?

तुम्हाला नेमका ब्लॉग कशावर लिहायचा आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. तुम्हाला त्यामध्ये तज्ञ असण्याची गरज नाही. पण तुम्ही हळूहळू लिहिताना माहिती मिळवाल आणि त्यामध्ये तज्ञ व्हाल. असा विषय शोधा ज्यावर तुम्ही दीर्घकाळ बोलू शकाल.


फायदेशीर विषय कसे शोधायचे?

लोक तुम्ही निवडलेल्या विषयावर पैसे खर्च करत आहेत की नाही हे शोधण्यासाठी एक सिम्पल टेक्निक आहे.

तुम्ही ॲमेझॉन वर जा आणि ज्या विषयावर तुम्हाला ब्लॉग करायचा आहे तो विषय सर्च करून पहा. त्या विषयावर किती पुस्तके लिहिली गेली आहेत, कोणकोणती पुस्तके विकत घेत आहेत आणि ते किती प्रसिद्ध आहे याविषयी माहिती मिळवा.

तसेच तुम्ही गुगलवर सुद्धा तुमच्या विषयाबद्दल शोधू शकता. जेव्हा तुम्ही विषय टाईप करतात तेव्हा google किती सर्च वोल्युम दाखवतं हे पहा.

 

तुम्हाला ज्याबद्दल ब्लॉग करायचा आहे त्यासाठी वाचक आहेत का?

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही असा विषय निवडला ज्याचा सर्च वोल्युम जास्त आहे, तर त्याला स्पर्धाही जास्त असेल. परंतु जर तुमच्याकडे एखादा अनोखा विषय आहे, ज्याबद्दल सर्च वोल्युम कमी आहे, पण तुम्ही लिहू शकतात तर तुम्ही त्या विषयाबद्दल लिहा. कारण तुम्ही पहिले असाल  जे त्या विषयावर लिहाल, त्यामुळे तुमची साईट लवकर रँक करेल.

याचाही विचार करावा...

तुम्ही कशाबद्दल खूप उत्कट आहात?  आपण कशाबद्दल बोलणे थांबवू शकत नाही?  आता, दुसरे म्हणजे, तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयावर इतर लोकांनी पैसे खर्च केले आहेत का?

उदाहरणार्थ मला ब्युटी प्रॉडक्ट आवडतात आणि मी नवनवीन ब्युटी प्रॉडक्ट्स ट्राय करते. तर मी ब्युटी प्रॉडक्ट्स वर ब्लॉग लिहू शकते. ज्यामध्ये मी प्रॉडक्ट रिव्ह्यू करू शकते.

आपण सगळेच कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी ती आपल्या त्वचेसाठी कशी आहे याबद्दल यूट्यूब व्हिडिओ बघतो किंवा ॲमेझॉन वर रिव्ह्यूज बघतो किंवा गुगल वर सर्च करतो. अशा वेळेस तुम्ही जर त्या प्रॉडक्ट बद्दल ब्लॉग लिहला असेल तर तुमचा ब्लॉग सगळ्यात वर दिसेल.


पायरी 2: तुमचा विषय निवडा.

समजा जर ब्युटी प्रॉडक्ट या विषयावर मी लिहायचे ठरवले. तर ब्युटी प्रॉडक्ट मध्ये फेस क्रीम्स फेस ओईल फेस टूल्स असे अनेक प्रकार येऊ शकतात.

तुमच्या विषयावर खोलवर अभ्यास करा आणि लॉंग टेल कीवर्ड निवडा. आणि मग त्यावर टॉपिक सर्च करा.

समजा मी ब्युटी प्रॉडक्ट मध्ये ब्युटी टूल्स निवडले आणि ॲमेझॉन वरील ब्युटी टूल्स वर रिव्ह्यूज लिहिले तर जो कोणी माझ्या लिंक ने प्रोडक्ट विकत घेईल त्यातील काही परसेंटेज मला मिळेल. 


पायरी 3: चांगले डोमेन विकत घ्या.

आता ब्लॉग कशावर लिहायचे हे एकदा तुम्हाला कळाले की तुम्हाला डोमेन कोणते घ्यायचे याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. 

डोमेन अगदी सोप्प आणि लक्षात ठेवण्याजोगे असावा.

तुमच्या ब्लॉगसाठी योग्य नाव मिळवण्यावर जास्त ताण देऊ नका . तुम्ही निवडलेल्या नावापेक्षा तुम्ही काय लिहिता ते जास्त महत्त्वाचे आहे.

आणि जरी तुम्ही खूप छान नाव निवडले तरी, एक दिवस असा येईल की तुम्हाला ते जास्त आवडणार नाही - माझ्या बाबतीत असे घडले आहे!

मला अनेक सुरुवातीचे ब्लॉगर माहित आहेत जे आठवडे या पायरीवर अडकतात.  असे कृपया करू नका!  

सोपे आणि सामान्य ब्लॉग नाव निवडा आणि ब्लॉगिंग सुरू करा!  तुम्हाला खरोखर हवे असल्यास तुम्ही काही महिन्यांत नवीन ब्लॉग नाव खरेदी करू शकता.


तुमच्या नवीन ब्लॉगसाठी लोगो तयार करा.

एकदा तुमच्या ब्लॉगला नाव मिळाले आणि ते चालू झाले की, तुम्ही एक सुंदर लोगो डिझाइन करून तुमच्या ब्लॉगचे ब्रँडिंग करण्याचे काम सुरू करू शकता.  तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लोगो डिझाईन करू शकतात. त्यासाठी अनेक ॲप्स आणि सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला लोगो डिझाईन करून घ्यायचा असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकतात मी काही ग्राफिक डिझायनर्स ची नावे तुम्हाला सांगू शकते.


पायरी 4: होस्टिंग निवडा.

होस्टिंग साठी बऱ्याचशा साईट्स आहेत ज्या तुम्हाला वेगवेगळ्या पैशात वेगवेगळ्या गोष्टी पुरवतात.

लक्षात ठेवा जसा जसा तुमचा ब्लॉग वाढतो तस तसा तुम्ही होस्टिंग चेंज करू शकतात. आता तुम्ही जी होस्टिंग निवडली तीच तुम्हाला आयुष्यभरासाठी वापरावी लागेल असे गरजेचे नाही. त्यामुळे त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करा. प्रत्येक गोष्ट परफेक्टच व्हावी यामागे लागू नका. सध्या सुरुवात करा आणि हळूहळू त्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवा. 

मी माझ्या काही साईटससाठी होस्टिंगर वापरते. आणि होस्टिंगर ही अधिकारी वापरली जाणारी होस्टिंग साईट आहे.


चरण 5: वर्डप्रेस चालू करा.

मी आधी सांगितल्याप्रमाणे होस्टिंग सेवा ही तुमची घर मालक आहे आणि वर्डप्रेस हे तुमचे अपार्टमेंट आहे. 

होस्टिंगर सोबत वर्डप्रेस विनामूल्य आहे.

होस्टिंगरच्या सी पॅनल मध्ये जाऊन तुम्ही वर्डप्रेस सुरू करू शकतात.


पायरी 6: तुमच्या नवीन ब्लॉगवर लॉग इन करा

आता तुम्ही निवडलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरा आणि खाली तुमच्या साइटवर लॉग इन करा.


 

पायरी 7: थीम निवडा.

आपल्याला वर्डप्रेसवर खूप थीम्स विनामूल्य भेटतात थीम्स चेंज करण्यासाठी Dashboard मधून Appearance मध्ये जा.

Astra ही एक लोकप्रिय थीम आहे.


पायरी 8: तुमची पहिली ब्लॉग पोस्ट लिहा.

आता तुम्ही तुमची पहिली ब्लॉग पोस्ट लिहायला सुरू करू शकतात.

ब्लॉक पोस्ट किमान 800 ते 1000 शब्दांची असू द्या. यापेक्षा जास्त असेल तर अतिउत्तम गोष्ट आहे.

तुम्ही कधीही तुमच्या पोस्टवर परत येऊन पाहू शकतात. आणि त्यामध्ये सुधारणा करू शकतात. 

ब्लॉक पोस्ट पब्लिश करण्यापूर्वी पुढील गोष्टी केलेल्या आहेत हे तपासून घ्या. 

 3-5 pillow पोस्ट

 ब्लॉग मेनू

 चांगला प्रोफाईल पिक्चर

 About me page

 Home page

 Contact us page

 Privacy policy page

 Terms and conditions page

 Social media links


आता तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू कसा करायचा हे शिकलात आणि आता तुम्ही तुमचे पहिले ब्लॉक पोस्ट लिहायला तयार आहात.

तुम्हाला पोस्ट लिहिताना ट्राफिक पोस्ट आणि पैसे कमावणाऱ्या पोस्ट वेगवेगळ्या लिहाव्या लागतील. त्याच एक सोपे उदाहरण पुढील प्रमाणे : 

तुमची ट्राफिक पोस्ट असू शकते, "चेहऱ्याचा व्यायाम कसा करावा?" 

तुमची पैसे कमावणारी पोस्ट असेल, चेहऱ्याचा व्यायाम करण्यासाठी वापरण्यात येणारे टूल्स."

तुम्ही वरील उदाहरणावरून पाहू शकता की तुम्ही एकाच विषयावर बोलत असले तरीही, प्रत्येक ब्लॉग पोस्टचे एक वेगळे ध्येय असते.


ब्लॉग हा नेहमी लोकांसाठी लिहिला जातो. ब्लॉग लिहिताना लोकांना त्यापासून फायदा व्हावा यासाठी ब्लॉग लिहा. जास्तीत जास्त मदत करा. जेवढे तुम्ही मदत कराल तेवढेच लोक तुम्हाला रँक व्हायला मदत करतील.

जेव्हा एखादी व्यक्ती पोस्ट स्किम करत असते, तेव्हा ते त्यांच्यासाठी त्यात काय आहे ते शोधत असतात. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल आणि प्रवासाबद्दल थोडे शेअर करू शकता, परंतु नेहमी तुमच्या वाचकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करा.


 पायरी 9: स्वतःमध्ये गुंतवणूक करा

भरपूर जण youtube वरून ब्लॉग बनवणे शिकतात. मी ही सुरुवात तशीच केली होती. परंतु युट्युब वर खूप जास्त माहिती आहे आणि ही सगळी माहिती ब्लॉग सुरू करताना माहीतच असली पाहिजे हे गरजेचे नाही. त्यामुळे जर तुम्हाला कमी दरामध्ये काही चांगले कोर्सेस मिळत असतील किंवा पुस्तकं मिळत असतील तर नक्की विकत घ्या.

पण खूप असेही लोक आहेत जे कोर्सेसच्या नावाखाली फक्त पैसे घ्यायला बसलेले आहेत त्यामुळे कोर्सेस विकत घेताना पूर्ण खबरदारी बाळगा.


पायरी 10: ब्लॉगवर ट्रॅफिक कशी मिळवायची?

जेव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कंटेंट लिहाल आणि पोस्ट करा तसतसे तुम्हाला काही अजून गोष्टी कराव्या लागतील.

ज्याला आपण बॅकलिन्स निर्माण करणे सुद्धा म्हणतो.

तुम्ही pinterest, facebook, instagram, quora,youtube सगळ्यांवरून ब्लॉगसाठी ट्रॅफिक गोळा करू शकतात.


पायरी 11: ब्लॉग लिहून पैसे कमवा.

तुम्ही ब्लॉग कसा सुरू करायचा हे शिकत असताना, तुम्हाला तुमच्या नवीन ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

 तुम्ही विनामूल्य ब्लॉग साइट वापरण्याऐवजी स्वत: होस्ट केलेल्या ब्लॉगमध्ये गुंतवणूक केली आहे.  नक्कीच तुम्हाला यातून पैसे कमवायचे आहेत!  ब्लॉगिंगसाठी खूप काम करावे लागेल आणि तुमचा वेळ मौल्यवान आहे. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कमाई करू इच्छिता, बरोबर?


ब्लॉगिंग हा घरबसल्या पैसे कमवण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे.

पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुम्ही कोणाशी मैत्री केली. तर त्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास ठेवायला काही दिवस लागतात. त्याला तुमच्या सोबत वेळ घालवावा लागतो. आणि मग तो तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. तसेच तुमचे वाचक हे त्या व्यक्तीसारखे आहे. आणि तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांना चांगली माहिती पुरवावी लागेल, जर तुम्ही चांगले ब्लॉग लिहाल. त्यांना ते आवडतील. त्यांना ते काम येतील तर त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल.

बरेच लोक सुरु करताना हा विचार करून चालतात की त्यांना पहिल्याच महिन्यामध्ये 100 डॉलर हवेत, असं होत नाही. जर तुम्ही पैसे कमवण्यासाठी ब्लॉगिंग सुरू करणार असाल. तर तुम्हाला सफल व्हायला खूप जास्त वेळ लागेल. पण जर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तुमची ब्लॉगिंग मध्ये आवड आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॉगिंग सुरू करणार असतील तर पैसे स्वतःहून तुमच्याकडे येतील. 

सुरुवातीचा ब्लॉगर म्हणून, तुमचा आदर्श "सेवा करा, मदत करा आणि द्या" असा असावा.  तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केल्यास, तुमच्याकडे लवकरच वाचक तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडून कला शिकून घेण्यासाठी येतील.


 ही झटपट श्रीमंत होण्याची योजना नाही.  ब्लॉगिंग मध्ये फक्त एकच रुल चालतो,  जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर अशी माहिती पुरवा जी लोकांना हवी असेल आणि त्यांची त्यापासून मदत होईल.

1000 लोकांना मदत करण्यापूर्वी हार मानू नका. तुम्ही ब्लॉक कसा सुरु करायचा हे शिकत असताना तुम्ही एक ध्येय ठेवा, की तुम्हाला किमान 1000 लोकांना मदत करायची आहे. जेव्हा तुम्ही दिवसाला 1000 लोकांना मदत कराल म्हणजे तुम्हाला दिवसाला 1000 लोकांचे ट्राफिक मिळेल, तर तुमचे ध्येय साध्य होईल आणि त्यातून कमाई व्हायला सोपे जाईल.

ध्येय ठेवून काम केल्याने सफलता लवकर मिळते असं माझं मत आहे त्यामुळे तुमचे ध्येय आजच निश्चित करा.


पायरी 12: ब्लॉगसाठी वेळ कसा शोधायचा

जर तुम्ही आत्तापर्यंत हा ब्लॉग वाचत असाल तर तुम्ही थोडेसे भारावून गेला असाल.

बापरे किती या गोष्टी आणि कितीही माहिती?

याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. सुरुवातीला सगळ्यांनाच असंच वाटतं. जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी एक चांगलं टाईम टेबल बनवलं, तर तुम्हाला रोज तेवढा वेळ देणार सोपे जाईल.

 एक योजना आहे

 दिवसाला 3 ते 4 तास ब्लॉगिंग साठी द्या.

या तासांमध्ये ब्लॉगिंगचा आणि विषय निवडणे किंवा रिसर्च करणे यासाठी अर्धा तास द्या.

आणि दोन तासात ब्लॉग लिहा.

त्यानंतर एक तास त्या ब्लॉगसाठी बॅकलिंक्स तयार करा.

जर तुम्ही एक हप्ता ही गोष्ट केली, तर तुम्हाला या गोष्टीची सवय होऊन जाईल.

आपण असंही सोशल मीडियावर तासंतास घालवतो. Reels,  youtube Shorts पाहत पाहत आपला दिवस निघून जातो. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही ब्लॉगिंग मधून कमाई करू शकतात.

आणि पैशांपेक्षा कोणत्याही सुख मोठा नाही हे नेहमी लक्षात ठेवा. 

दैनिक उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट असू शकते:

तुमच्या माझ्या बद्दल पेज लिहा.

नवीन ब्लॉग पोस्टसाठी 1,000 शब्द लिहा.

5 नवीन पिन प्रतिमा तयार करा आणि पिन करा.

भविष्यातील ब्लॉग पोस्ट कल्पनांसाठी 10 विषयांवर कीवर्ड संशोधन करा.


ब्लॉगिंग म्हणजे केवळ 2000 अधिक शब्द लिहिणे नव्हे, तर तुमचे वाचक दररोज तुमच्याशी कसे कनेक्ट होतात? आणि तुम्ही त्यांना कशी मदत करतात हे आहे.

कधी कधी सोशल मीडियावर अपडेट करूनही तुम्ही तुमच्या ब्लॉग बद्दल लोकांना माहिती देऊ शकतात.

 रोज पोस्ट लिहिणे गरजेचे नाही पण एक वेळ ठरवून रोज त्या वेळेमध्ये ब्लॉगिंग विषयी काही ना काही करणे महत्वाचे आहे.

या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पाहिले की आपण ब्लॉग कसा तयार करू शकतो? कसा लिहू शकतो? आणि दिवसामध्ये किती वेळ आपल्याला ब्लॉगला द्यायचा आहे?

मी अजून काही ब्लॉग पोस्टमध्ये ब्लॉगिंग बद्दल माहिती सांगेल, तर माझ्या साईटला भेट देणे विसरू नका आणि आजच ब्लॉगिंग करायला सुरुवात करा.