Header Ads Widget

ब्लॉग सेटअप कसा करायचा? | How to setup a blog in marathi?

ब्लॉग सेटअप करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात.

Domain
Hosting

Domain

डोमेन म्हणजे आपल्या ब्लॉगचे नाव होय. जसे ॲमेझॉनचे नाव www.amazon.com आहे. तसे तुमच्या ब्लॉगचे एक नाव असेल.

Hosting

हॉस्टिंग म्हणजे ब्लॉगचा ऍड्रेस. जसे कोणतीही फाईल, व्हिडिओ जेव्हा आपण डाउनलोड करतो किंवा शेअर करतो तेव्हा ते आपल्या मोबाईल मध्ये जमा होते. तसेच जेव्हा आपण इमेजेस फाइल्स ब्लॉगला अपलोड करतो, तेव्हा ते होस्टिंग मध्ये जमा होतात.

सुरुवातीला हॉस्टिंग मध्ये पैसे घालवण्याची गरज नाही. आपण ब्लॉगर या फ्री माध्यमातून ब्लॉग सुरू करू शकतो.


डोमेन कसे निवडावे?

  • डोमेन हे छोटे असले पाहिजे.
  • जर तुम्ही खूप मोठे नाव निवडले तर ते लक्षात ठेवायला खूप जास्त कठीण जाईल. त्यामुळे नाव अगदी छोटे असावे. 
  • ते लक्षात राहण्यासारखे असावे. जसे गुगल, फेसबुक हे लगेच लक्षात ठेवू शकतो आणि ती आपल्या जास्तीत जास्त वेळ पर्यंत लक्षात राहतात. असे छोटेसे आणि लक्षात राहण्याजोगे नाव निवडावे.
  • नाव निवडताना त्यामध्ये सिम्बॉल नंबर्स नसावे.
  • नाव निवडताना ते तुमच्या ब्लॉगच्या टॉपिकशी रिलेटेड असावा.

 समजा तुम्ही पेट्स (pets)वर ब्लॉग लिहीत असाल तर त्याच्याशी रिलेटेड ब्लॉग टॉपिक निवडा.

 

 मग डोमेन कसं निवडायचं किंवा कसं सर्च करायचं? 

यासाठी पुढील टूल वापरा : टूल      

या टूलमध्ये तुम्ही तुमचा विषय टाकून नक्की कोणतं नाव सध्या बाजारात चालू आहे किंवा तुम्ही कोणत्या निवडू शकता त्याबद्दल माहिती मिळवू शकतात.

 



.com की .in डोमेन वापरावे?

.कॉम हे पूर्ण जगात चालण्यासारखं डोमेन असतं. .इन हे इंडियाशी रिलेटेड डोमिन असतं.

जेव्हा कोणी सर्च रिझल्ट मध्ये सर्च ओन्ली इंडिया टाकतात, तेव्हा .इन डोमेन आणि इंडियन सर्वरवर होस्टेड डोमेन्स जास्त दिसतात.

रँकिंगमध्ये .कॉम आणि .इन यांमुळे काही जास्त फरक पडत नाही फक्त डॉट कॉम हे जास्त लक्षात राहण्यासारखं असतं.

सगळ्यात आधी .कॉम साठी जा. पण जर तुम्हाला डॉट कॉम मिळत नसेल, तर .इन तुम्ही घेऊ शकतात. 

खाली दिलेले पर्याय मी स्वतः वापरते, त्यामुळे तुम्हीही ते वापरू शकतात आणि त्यामधून तुम्हालाही फायदा होऊ शकतो. 

Domain : Namecheap
Hosting : Blogger