Header Ads Widget

ब्लॉग पोस्टचे प्रकार कोणते ? | Types of posts in blogging in marathi.

ब्लॉग लिहायला घेणे अगदी सोपे आहे. पण ब्लॉग जर आकर्षक नसला तर वाचक जास्त वेळ आपल्या ब्लॉगवर राहत नाही, तो निघून जातो. आणि त्यामुळे असे ब्लॉग लिहून आपल्याला काहीही फायदा होत नाही.

आज आपण मुख्य 10 प्रकार बघणार आहोत, ज्या प्रकारे आपण ब्लॉग लिहू शकतो आणि ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ट्राफिक मिळू शकते.

ब्लॉग पोस्टचे प्रकार कोणते ?


१)लिस्ट पोस्ट (List post)

लिस्ट पोस्ट म्हणजे अशा पोस्ट ज्यामध्ये आपण एक लिस्ट वाचकांना देत आहोत.

उदाहरणार्थ

ह्या१० रहस्यमय कथा तुम्हाला विचार करायला परावृत्त करतील.

हे १० मराठी चित्रपट ज्यांनी खुप यश मिळवले.

हे १० हेडफोन ५०० च्या आत मिळू शकतात.

हे ५ किल्ले तुम्ही नक्की बघायला हवे.

सुंदर दिसण्यासाठी 5 टिप्स

झोपण्यापूर्वी ह्या पाच गोष्टी करायला विसरू नका.


२)"कसे करावे" पोस्ट (How to tutorials)

या पोस्टमध्ये आपण लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देतो आणि ती गोष्ट कशी करायची हे सांगतो.

उदाहरणार्थ 

पुस्तक कसे लिहायचे? 

किवर्ड रिसर्च कसा करायचा? 

केस कसे वाढवायचे?

प्राण्यांना चांगल्या सवयी कशा लावायच्या?

लवकर कसे झोपायचे?


खूप जण अशा प्रकारचे ब्लॉग शोधतात या ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या वाचकांना परत दुसऱ्या ब्लॉगवर जावा लागणार नाही याची दक्षता घ्या.


३) प्रोडक्ट रिविव (Product Review)

जसे आपण youtube वर पाहतो जे कोणत्यातरी नवीन प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगतात. त्याचे फीचर्स सांगतात. आणि ते प्रॉडक्ट कसं buy करायचं याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतात.


तसेच तुम्ही एखादा प्रोडक्ट ॲमेझॉन वरून किंवा बाकीच्या अफिलिएट प्लॅटफॉर्म वरून घेऊ शकतात. आणि त्याबद्दल माहिती देऊन त्याची लिंक तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये देऊ शकतात.


असे खूप प्रॉडक्ट्स असतात जे आपल्याला माहितीही नसतात, पण आपल्याला लागत असतात त्यामुळे प्रॉडक्ट ब्लॉग सुद्धा खूप जास्त चालतात.


उदाहरणार्थ.

New Boat headphone review

Grammarly premium review

Electric bike review


४) तुलनात्मक पोस्ट (Comparison Posts)

या पोस्टमध्ये तुम्ही दोन गोष्टींची तुलना कराल आणि कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली किंवा कोणती गोष्ट लोकांनी विकत घ्यावी असं तुम्हाला वाटतं याबद्दल माहिती द्याल.


उदाहरणार्थ.

Boat 131 headphones vs. Boat 141 headphones. Which is better?

What is best for beginners Bloggers or WordPress?


५)प्रश्न आणि उत्तरे post (FAQs post)

यामध्ये नेहमी विचारले जाणारी प्रश्न उत्तर यांचा समावेश असतो आणि या ब्लॉग पोस्ट तुम्ही भरपूर मोठ्या लिहू शकतात मी अशीच एक ब्लॉक पोस्ट येथे सामायिक करते तुम्ही उदाहरणासाठी या ब्लॉगवर जाऊन ती वाचा.


६)ताज्या बातम्या पोस्ट (News post)

यामध्ये चालू घडामोडी जे पण काही ट्रेडिंग चालू आहे किंवा एखादा सण चालू आहे याबद्दल तुम्ही ब्लॉग लिहू शकतात.


उदाहरणार्थ.

जेव्हा क्रिकेट सुरू होते तेव्हा क्रिकेटसाठी खूप सारे ब्लॉग्स आपल्याला दिसतात. 

तसेच दिवाळी सण आल्यावर दिवाळीच्या शुभेच्छा देणारे ब्लॉग्स आपल्याला दिसतात.


७)रिसोर्स पोस्ट (Resource post)

या पोस्टमध्ये आपण एखाद्या विषयाशी निगडित रिसोर्सेस शेअर करतो. जसे की मी या पोस्टमध्ये कोणत्या युट्युबर्सला ब्लॉगिंग साठी फॉलो करावे हे सांगितले आहे. जर तुम्ही ही पोस्ट बघितली नसेल तर नक्की बघा.


८)तज्ञांचा सल्ला पोस्ट (Expert advice post)

या पोस्टमध्ये तुम्ही एखाद्या विषयाशी रिलेटेड जे एक्सपर्ट आहेत त्यांचं नक्की या फिल्ड बद्दल किंवा नवीन विषयाबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल पोस्ट लिहू शकतात.


उदाहरणार्थ जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात असाल. तर डिजिटल मार्केटिंग मधले एक्स्पर्ट chat gpt बद्दल काय म्हणतात, याबद्दल तुम्ही ब्लॉग बनवू शकता.


त्यासाठी त्या एक्स्पर्ट सोबत तुमचं बोलणं हवं. त्यांच्याकडून तुम्हाला ॲडव्हाइस मिळायला हवी. आणि मग तुम्ही ती एका ब्लॉगमध्ये समाविष्ट करून ते लिहा. असच कुणाचंही नाव वापरून काहीही पब्लिश करू नका त्यावर लिगल ॲक्शन होऊ शकते.


९)मुलाखत किंवा केस स्टडी (Interview or case study post)

यामध्ये तुम्ही तुमच्या नीश मधल्या लोकांची मुलाखत घेऊन त्याबद्दल माहिती लिहू शकतात किंवा स्वतःची एक केस स्टडी बनवू शकतात.

केस स्टडीचे उदाहरण द्यायचं झालं तर, 

How I earned 10k$/year with freelancing?


१०)मत पोस्ट (opinion post)

यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीवर स्वतःचे मत मांडतात. मग तुम्ही एखादी इंडस्ट्री न्यूज घेऊ शकतात आणि त्यावर तुम्हाला काय वाटतं याबद्दल लिहू शकतात.

उदाहरणार्थ.

My opinion on boat 131, are they worth it or not?


या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पोस्ट चे दहा प्रकार पाहिले. हे दहा प्रकार वापरून तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट लिहू शकतात. या दहा पोस्टच्या प्रकारापैकी तुम्हाला घरचा अभ्यास म्हणून प्रत्येक प्रकारामध्ये किमान दोन पोस्टचे नाव लिहायचे आहेत. हे लिहिल्याच्या नंतरच पुढचा ब्लॉग वाचा. त्याआधी पुढचा ब्लॉग वाचू नका. पुढील पोस्टमध्ये आपण कन्टेन्ट रिसर्च कसा करायचा हे बघणार आहोत.