Header Ads Widget

हावडा ब्रिज ची माहिती मराठी | Howrah Bridge History In Marathi

Howrah Bridge History In Marathi 


हावडा ब्रिज हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा पूल कोलकाता शहराला हावडा ह्या उपनगरासोबत जोडतो. 

कोलकात्यामधील सर्वात लोकप्रिय खुणांपैकी एक असलेला हावडा पूल इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान बांधला गेला. जगप्रसिद्ध बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या आदराप्रिथ्यर्थ १९६५ साली हावडा पूलाचे नाव बदलून रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावडा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. 

रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ५ लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात.


 हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक ह्या पूलाच्या पश्चिम टोकाजवळच स्थित आहे. ह्यामुळे हावडा पूलाला कोलकत्याचे प्रवेशद्वार असेही संबोधतात.

 हावडा स्थानकाहून कोलकत्याला जाण्यासाठी केवळ हावडा पूलाचाच वापर केला जातो.

१९४२ साली बांधून पूर्ण झालेल्या या पुलाची खासियत अशी आहे की या पुलाच्या बांधणीत एकही नट-बोल्ट वापरला गेलेला नाही. तसेच या पुलाला नदीपात्रात एकही खांब नाही.

 नदीच्या दोन्ही तटांवर ‘कँटीलिव्हर’ पद्धतीने या पुलाची उभारणी केली गेलेली आहे.

(What is special about Howrah Bridge?)

पुलाच्या बांधणीसाठी त्याकाळी जमशेटजी टाटांच्या ‘टाटा स्टीलने’ लोखंडाचा पुरवठा केला होता.जवळपास २६.५ हजार टन लोखंड वापरून उभारलेल्या या पुलाची लांबी १५२८ फूट तर रुंदी ६२ फूट आहे. नदी पात्रात जवळपास २८२ फूट उंचीवर विराजमान हा पूल त्याकाळातील जगातला तिसऱ्या क्रमांकाचा पूल होता.


आजही लांबीच्या बाबतीत हावडा ब्रिज जगात सहावा क्रमांक राखून आहे. संपूर्णतः लोखंडी खिळ्यांनी बनलेला हा पूल आजही इतका मजबूत आहे की दररोज जवळपास १.५ लाख वाहने आणि ५ लाख पादचारी या पुलाचा नियमित वापर करतात.

२००४ मध्ये, ६.५ दशलक्ष खर्च करून पुलाचे नूतनीकरण आणि पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली. त्यांनी पुलाच्या पायथ्याशी असलेले खांब फायबरग्लासने झाकले होते जेणेकरून मानवी थुंकीमुळे ते गंजू नये. 

कोलकाता पोर्ट ट्रस्टने नदीतील बोटीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पुलाखाली कॅमेरे देखील ठेवले आहेत आणि पुलाच्या ७०५-मीटर-लांब संरचनेवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्च-तंत्रनिरीक्षण कॅमेरा स्थापित केला आहे. यामुळे पुलाच्या देखभालीसाठी मदत होते. 


अनेक ऐतिहाससिक घटनांचा आणि क्षणांचा हा पूल साक्षीदार आहे. १९४२ मध्ये पूल बांधून पूर्ण झाला तेव्हा दुसरे महायुद्ध जोरावर होते. याच कारणास्तव ‘हावडा ब्रिजचे’ कधीही औपचारिकरीत्या उदघाटन झाले नाही.


Howrah Bridge History In Marathi