Header Ads Widget

Book Summary of "The subtle art of not giving a fuck" in Marathi

 1)What's wrong about giving a fuck?

 


जर तुम्हाला वाटलं की तुमच्यात काही कमतरता आहे तर तुम्ही ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी तुम्ही पुस्तके खरेदी करतात.
"How to win friends and influence people" सारखी पुस्तके आपण वाचतो. कारण प्रत्येकाला स्वतःला आधीपेक्षा चांगलं बनवायचं असतं.
पण खरंतर हे आहे की आपण कितीही प्रयत्न केला तरी कुठेतरी कमतरता जाणवतेच. माणूस कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि जसजसं आपण आपली कमतरता पूर्ण करतो तसतसं आपल्याला कळतं की आपल्याला अजून खूप काही करायचं आहे.मी अमुक करून जास्त चांगला होऊ शकतो,किंवा मी तमुक करून तर अजूनच चांगला होईल.
यामुळे आपण नेहमीच असंतुष्ट राहतो. जेव्हा आपल्याला स्वतःला चांगलं बनवायचं असतं तेव्हा आपला मनोमनी विचार झालेला असतो की आपण कुठेतरी कमी पडत आहोत.आणि त्यामुळे आयुष्यात जास्त नकारात्मकता येते.
ह्याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊ,आता कल्पना करा की तुम्ही ग्राहक आहात.
जोपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं की मार्केटमध्ये ही नवीन वस्तू आहे तोपर्यंत ती वस्तू नसतांनाही तुम्ही आनंदी होते.
आता त्या कारबद्दल विचार करा जी तुम्हाला घ्यायची आहे.जोपर्यंत ती कार बाजारात नव्हती तोपर्यंत तुम्ही त्या कारविनाही सामान्य जीवन जगत होते, सुखी होते. पण जेव्हा तुम्हाला कळालं की ती कार बाजारात आली आहे तेव्हा ती कार विकत घेण्याचे विचार तुमचे मन करू लागले. आणि आता ती कार तुमच्याकडे नसल्याचं तुम्हाला दुःख व्हायला लागलं.आता काही दिवसांनंतर तुम्ही ती कार विकत घेतली. आणि काही महिन्यांनंतर बाजारात परत कोणती नवी कार आली तेव्हा परत त्याच भावना,तीच लालसा, तेच दुःख आणि हे चक्र नेहमीच चालू राहतं.
पण जर हेच चालू राहीलं तर तुम्हाला जगातील प्रत्येक कार खरेदी करावी लागेल.जे अशक्य आहे,तसेच बुद्धीला पटणारं नाही.मग अश्या गोष्टींनी दुःखी होण्यात काय अर्थ?

2)When you dont have problems your mind invents them.


आपल्या मनाला एक सवय असते,जेव्हा आपल्या आयुष्यात काहीच अडचणी नसतात,आपलं मन आपोआप आपल्यासाठी काही अडचणी निर्माण करतं.
प्रेयसी नसणं, आपल्याजवळ चांगला मोबाईल नसणं,चांगले कपडे नसणं अश्या छोट्या मोठया नकली अडचणी आपलं मन आपल्यासमोर उभं करतं, कारण सध्या त्याच्याकडे कोणत्याही खऱ्या अडचणी नसतात. आपल्याला आपल्या मनाच्या ह्या सवयीची माहिती असणं गरजेचं असतं आणि जेव्हापण आपल्याला लक्ष्यात येईल की आपलं मन आपल्याला सतावण्यासाठी परत अडचणी निर्माण करत आहे,त्याचक्षणी त्या अडचणीला दूर सारून आपण आनंदी राहिलं पाहिजे.

3)You have limited fuck to give.


आपण नेहमी लक्ष्यात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. आणि एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे. मग ही वेळ छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वाद करण्यात घालवायची की आयुष्य सुखाने जगण्यात घालवायची? त्यामुळे अश्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्या खरोखर गरजेच्या आहेत.

4)Don't love the result, love the process instead.


आपण नेहमी निकालांबाबत(परिणामांबाबत) जास्त विचार करतो,कारण आपण त्याला यशाशी जोडतो. आपण खूप संघर्ष करतो आणि खूप दुःखही झेलतो कारण आपल्याला प्रबळ इच्छा असते की आपल्याला हवा तो निकाल मिळावा.
अभ्यासाच्या बाबतीत हे खूप वेळा होतं. आपण त्या फिल्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो जिथून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळणारी नोकरी मिळेल. आपण त्या जास्त पैसे मिळतील अश्या नोकरीच्या कल्पनेत स्वतःला झोकतो, ज्याची आवड आपल्या मनात नसते. पण कधीकधी प्रक्रियेपेक्षा परिणामांबद्दल विचार करणं आपल्याला महागात पडू शकतं. याचं चांगलं उदाहरण म्हणजे पहिल्या दिवशी उत्साहात जिमला जाणारी लोकं काही दिवसानंतर जिमला जाणं बंद करतात. ती आपल्या सुदृढ, पिळदार शरिराबद्दल खूप स्वप्न पाहतात पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत,जे कष्ट लागतात त्यावर लक्ष देत नाही.
परिणामांची अपेक्षा बाळगणं आपल्याला दुःखी करतं, आपल्याला वाटतं की आपल्याला आयुष्यात हा परिणाम मिळाला तर आपलं आयुष्य सुखात जाईल. पण मनुष्याचं मन सहजासहजी कधीही आनंदी होत नाही.आपल्या गरजा कधीही संपणाऱ्या नाहीत.म्हणून आपण परिणामावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपण अश्या अडचणी शोधायला हव्या ज्या सोडवून आपल्याला आनंद होईल.

आपण ते करूयात ज्यात खरोखर आपली आवड आहे,आणि तेव्हाच आपण प्रक्रियेवर प्रेम करणं शिकू. जेव्हा आपल्याला प्रक्रिया आवडते तेव्हा आपण तिच्याशी जोडले जातो आणि मग आपण ते काम नेहमी नेहमी करू शकतो आणि कोणतंही काम नेहमी केल्याने आपण त्या कामात तज्ञ बनतो.
जरा विचार करा,तुमचे जिमला जाण्याचे कारण सुदृढ, पिळदार शरीर नसून,तुम्हाला व्यायाम करायला आवडतो हे आहे.
जर तुम्हाला व्यायाम करायला आवडतं तर तुम्ही नेहमीच व्यायाम करत राहाल आणि यामुळे आपोआप तुमचं शरीर सुदृढ बनेल.

5) Not giving a fuck about who you are?


हा मुद्दा आपल्या अहंकाराशी निगडित आहे. जेव्हा तुमचा अहंकार वाढायला लागतो तेव्हा तुमची वाढ होणं थांबतं.जर तुम्ही असा विचार करत की तुम्ही खूप महान मानव आहात, ज्याला सगळं माहीत आहे तर तुम्ही दुसऱ्यांकडून ऐकणं कमी कराल. जर कोणी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही न ऐकताच त्याचे बोलणे नाकाराल.
त्यामुळे तुम्ही कितीही शिकलेले,मानलेले असले तरी त्याबद्दलचा अहंकार बाळगणं चुकीचं. आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून जर तुम्ही असा विचार केला की आता तुम्ही खूप कमी जाणतात, अजून तुम्हाला खूप काही गोष्टी या विश्वातून शिकायच्या आहेत तेव्हाच तुम्ही यश मिळवू शकतात.

6) Taking responsibility for your problems.


असं कधीच होऊ शकत नाही की आयुष्यात अडचणी येणार नाहीत,हे आपण सगळेच जाणतो. अश्यावेळेस आपल्या अडचणींबद्दल विचार करून रडत बसण्यापेक्षा, आपल्या अडचणींनी आपल्याला नियंत्रित करण्यापेक्षा आपण आपल्या अडचणींना नियंत्रित करण्याची जबाबदरी घेतली पाहिजे.जर कोणती अडचण तुमच्या मार्गात आडवी येत असेल तर तिची तक्रार करत बसण्यापेक्षा ती कशी सोडवावी यावर आपण लकसबी केंद्रित करायला हवं.असं केल्याने आपल्या हातात सामर्थ्य तर येईलच पण ह्यामुळे आपण जास्त बुद्धिमान बनू.
जसं रोजरोज गणितं केल्याने आपला मेंदू गणना करण्यात सामर्थ्यवान होतो तसेच आयुष्यातल्या अडचणी सोडवल्याने रोजच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊन तल्लख बनतो.