Header Ads Widget

भारतातील महान संगीतकार,गीतकार आणि गायक | Information of Famous Musicians, Lyricists and Singers from India.

भारतातील महान संगीतकार,गीतकार आणि गायक. 

[ Famous Musicians, Lyricists and Singers from India]


संगीत सृष्टीत अनेकांनी आपले नाव उंच शिखरांवर रुजवले आहे. अश्याच काही महान संगीतकार,गीतकार आणि गायक यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

पंडित तन्ना मिश्र (मिया तानसेन)

पद्मविभूषण श्रीमती गंगुबाई हनगल

उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब

आमीर खुश्रू

पंडित जितेंद्र अभिषेकी

सवाई गंधर्व

 बालगंधर्व

पंडित कुमार गंधर्व

 पंडित भीमसेन जोशी

लकी अली

देवकी पंडित

श्रेया घोषाल

जावेद अख्तर

पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा (संतूर वादक )

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ (सनई वादक )

आर .डी .बर्मन

अनु मलिक

 बप्पी लाहिरी

ए. आर. रहमान

शंकर - जयकिशन     

 

 

पंडित तन्ना मिश्रा (मिया तानसेन)  [ Tansen information in marathi ]

Miya Tansen Information in Marathi
Miya Tansen Information in Marathi


भारतीय संगीताच्या इतिहासातील मुकूटमणी, तेजस्वी सूर्य असे वर्णन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे करता येईल अशी व्यक्ती म्हणजे तानसेन. संगीत सृष्टीत आजपर्यंत एवढी अफाट लोकप्रियता कोणत्याही गायक कलाकारास लाभली नाही. मध्यप्रदेशांतील ग्वालेर शहराजवळ 'बेहट' नावाचे गाव आहे. तेथे मकरंद पांडे नावाचा बुद्धी संपन्न संगीतज्ञ ब्राह्मण रहात होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्या काळात बालेर येथे महान सिद्धी प्राप्त असलेले' मोहम्मद गौस' नामक फकिर रहात होता. त्यांच्या आशीर्वादाने मकरंद पांडे यांना 1520 ते 30 यादरम्यान पुत्ररत्न प्राप्त झाले. निश्चित जन्मसाल सापडत नाही. काही जागी तर 1506 जन्मसाल पण सांगितले जाते. बाळचे नाव तन्नामिश्रा ठेवण्यात आले. हेच मिया तानसेन.

         लहानपणीच अत्यंत कुशाग्र बुद्धी होती. अंगी खोडकरपणा पण होता. पशुपक्ष्यांच्या व इतर आवाजांचे हुबेहूब नक्कल करण्याची परमेश्‍वरी देणगी त्याला प्राप्त झाली होती. तानसेनच्या काळांतील एक महान गायक स्वामी हरीदास तानसेन ज्या जागी रहात असे त्या भागातून हिंडत असताना यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज झाडीतून आला. प्रत्यक्ष वाघच जवळपास झाडामागे कुठेतरी आहे अशी त्यांची खात्री झाली. शोध घेतल्यावर त्यांना कळले की तो आवाज खऱ्या वाघाचा नव्हता तर झाडीत लपलेल्या छोट्या बालकाने तो आवाज काढला होता. त्यांना नवल वाटले व त्यांनी तानसेनच्या वडिलांची गाठ घेतली व त्यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यासाठी शिष्य म्हणून तानसेनची मागणी केली. परवानगी घेतल्यावर ते तानसेनला आपल्याबरोबर घेऊन गेले. स्वामी हरीदास यांनी त्याला आपले शिष्य बनवले.

     संगीताच्या आवाजाची जन्मजात ईश्वरी देणगी असलेल्या बालकास हरिदासासारखा गुरू लाभला व भारतीय संगीतात एक अनमोल रत्न घडविले गेले. जवळजवळ दहा वर्षांपर्यंत तानसेन गुरूपाशी गुरुसेवा करून संगीत विद्या घेत होता. व गुरु त्याला घडवित होत. त्यांनी विद्या घेतली.

        तानसेन एक महान गायक बनून घरी आला. त्याच्या गायनाने सर्वजण प्रभावित झाले. त्याच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना. ज्या फकिराच्या आशीर्वादाने तानसेन जन्मला त्या फकिराच्या दर्शनाला त्यांनी तानसेनला नेले. त्या फकीरा समोर (महंमद गौस) त्याने गायन केले. तानसेनचे गायन ऐकून खूष झालेल्या त्या फकिराने आपल्या तोंडातील विड्याचे पान प्रसाद म्हणून तानसेनच्या तोंडात घातले. मुसलमान व्हावे लागले व तेव्हापासून त्यांना मिश्राचा मिया तानसेन झाला.

       तानसेन प्रथम रीवा संस्थाच्या राजा राजाराम यांच्या दरबारात होता. राजा राजारामने हे रत्न दिल्लीपती अकबर बादशहाला नजर केले. अकबर बादशाह तानसेनच्या गाण्यावर इतका खुश झाला कि अकबर आणि तानसेनला त्याच्या नवरत्न दरबारात मानाचे स्थान दिले.

     तानसेन धृपद शेलीचे गायन अत्यंत प्रभावीपणे करीत असे. तानसेन हा मूळचा गौड ब्राह्मण असल्याने त्याच्या धृपद गायन शैलीस 'गोडिया धृपदबानी 'असे नाव पडले.  

आपल्या गायनाने दीप पेटविणे, पशुपक्ष्यांना मोहीत करणे, पाऊस पाडणे, असल्या चमत्कार केल्याच्या गोष्टी आपण आजही ऐकतो, त्या खऱ्या का खोट्या या वादात न पडता एवढाच निष्कर्ष काढता येईल की तानसेनच्या गाण्याचा प्रभाव त्या काळातील समाजावर प्रचंड प्रमाणात होता.

       तानसेनला गुरु हरिदास स्वामी यांचेकडून अनेक राग रागिनी याचे अभूत पूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते. दरबारी कानडा, मियौकी सारंग, मिया मल्हार इत्यादी रागांचे जनकत्व तानसेन कडे जाते. त्याचे सर्व पुत्र पण संगीतज्ञ झाले. त्यापैकी विलास खान यांनी जास्त नाव मिळविले. विलासरावांनी तोडी ही त्यांनीच संगीताला दिलेली देणगी आहे

          इ .स.1585 च्या फेब्रुवारीत तानसेन यांचा दिल्ली येथे मृत्यू झाला. त्यांचा देह ग्वाल्हेरला आणून फकीर महंमद गौस यांच्या कबरी शेजारी तानसेन ची समाधी बांधली गेली.

 

पद्मविभूषण श्रीमती गंगुबाई हनगल  [ Gangubai Hangal information in Marathi ]

Gangubai Hungal Information in Marathi
Gangubai Hungal Information in Marathi

गंगुबाई हनगल, परमेश्वराकडून त्यांना खडा आवाज प्राप्त झाला होता. आवाज खडा असला तरी त्या आवाजात भावना व्यक्त करण्याची जबरदस्त ताकत होती.

       आपल्या ख्याल गायगीत, कलाकृतीचे समन्वयक दर्शन घडवत असत. किराणा घराण्याच्या जगांतील सर्व श्रेष्ठ पैकी त्या एक गायिका होत्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या गुरुनी जे घराण्याचे संगीताचे ज्ञान आपणास दिले आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत होत्या आणि ती जबाबदारी पार पाडण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. जबाबदारी त्यांनी प्रेमाने व भक्तिभावाने अंगावर घेतली व तसे प्रयत्न केले.

       गंगुबाईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि पारदर्शी होता. आपल्या गुरु मातेच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडे जास्त लक्ष दिले. कर्नाटक संगीतात त्यांना रस नसावा असे दिसून येते. त्यांच्या आई पण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत प्रेमी होत्या. गंगुबाई वर गाण्यांचा पहिला संस्कार त्यांच्या मातोश्रींनी केला, त्याबरोबरच कर्नाटक संगीतातील त्यांचे गुरु' होल गुरु कृष्णा माचारी' हे होते. आणि पुढचे संगीताचे शिक्षण सवाई गंधर्व यांचेकडून त्यांना मिळाले. गंगुबाई त्या वेळी हुबळीला होत्या व सवाईगंधर्व कुंदगोळला. त्याकाळात वाहनांची सोय नव्हती. खडतर प्रवास होता तरी सुद्धा एकही दिवस न चुकवता सवाईगंधर्वाकडे रोज शिकायला जात. सवाई गंधर्व पलटे बांधून त्यांना शिकवीत ते इतके कि एक पलटा एक एक तास घोटून गीत आणि मग सर्वार्थाने राग त्याच्या गळ्यावर चढवित असत.

      यानंतर गंगुबाई संगीत क्षेत्रात कीर्तीच्या शिखरावर पोहोचल्या. संगीतात दिगंत कीर्ती प्राप्त केलेल्या गंगुबाईचा जन्म कर्नाटकातल्या एका लहान खेड्यात इ .स.1913 रोजी झाला. त्यांच्या घरात संगीत पहिल्यापासून होते. परंपरेने आलेला हा वारसा गंगुबाईना मिळाला.

         या सांगितिक प्रवासात त्यांना अनेक सन्मान मिळाले. वाराणसी नागरी प्रचारिणी सभेतर्फे त्यांना  'भारतीय कंठ पुरस्कार  ' दिला गेला.

        आलाहाबाद संगीत समितीने  'स्वर शिरोमणी 71'. संगीत अकादमी पुरस्कार त्यांना दिला. परदेशातील 'तानस'

पुरस्कार त्यांना मिळाला.

         कर्नाटक विद्यापीठाने 'डॉक्टरेट' पदवी देऊन सन्मानित केले व भारत सरकारतर्फे मानाचा समजला जाणारा  'पद्मविभूषण 'हा सन्मान दिला गेला.

            वयाची नव्वदी पार करून शतायुषीकडे झेपावणाऱ्या गंगुबाई या किराणा घराण्याच्या सध्याच्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध ,तपोवृद्ध गायिका होय.

      सवाई गंधर्व महोत्सवात पहाटे आपल्या कानावर हात ठेवून कधी  'मी या की तोडी' कधी अभोगी तर कधी 'भैरव' भरभरून ऐकवणारी सर्वांचे कान तृप्त करणारी त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येते. 1962 सालि सवाई गंधर्व महोत्सवात दुसऱ्याच रात्रीच्या पहाटे त्यांनी गायलेला 'अहिर भैरव ' अध्याप विसरता येत नाही. त्यांना उत्तम साथ करणाऱ्या त्यांच्या कन्या कृष्णाबाई हनगल तबला साथ करणारे त्यांचे बंधू श्री शेषगिरी हंगल म्हणजे त्यांचे सर्व घरातच संगीताचे वातावरण असलेले होते असे म्हणायला हरकत नाही.

       त्यांनी आपल्या गाण्याची सुरुवात, वयाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात केली. त्यावेळी त्या वयाने लहान होत्या. तारुण्यात नुकताच प्रवेश केला होता. म्हणजे गंगुबाई 16-17 वर्षाच्या असताना प्रथम त्यांनी विघ्नहर्ता गणेश च्या समोर आपली गाण कला प्रथम सादर केली.

 

उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब [ Ustad Abdul Karim Kha Saheb  information in Marathi ]

 

Ustad Abdul Karim Khan Information in Marathi
Ustad Abdul Karim Khan Information in Marathi

संगीताचे मोहनीय रुप त्यातील स्वरसौंदर्यावर आधारित आहे. त्या सात स्वरांच्या सर्वात्मक सर्वेश्वर पदाला पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब, संगीतातील दिलदार उस्ताद.

     त्यांचा जन्म 19/9/1872 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खाँसाहेब काले खान. काले खान साहेबांनी आपल्या तिन्ही मुलांना गाण्याची तालीम दिली. एस एस संगीतातील स्वर सम्राट, मधुर सूरलापीचे मालक होते तेवढेच ते वृत्तीने थोर, दानशूर आणि अध्यात्मवादी होते.

      आपल्या किराणा घराणा गायकीचे आपल्या शिष्यांना मुक्त हस्ते व मुक्तकंठाने दान करीत होते. आपल्या मैफलीच्या वेळी ते आपल्या बरोबर शिष्यांचा ताफाच घेऊन बाहेर पडत असत, मैफलीची बैठक चालू असताना ते रागरागिन्यांचे प्रयोग दिग्दर्शन मार्गदर्शन करीत असत. त्यांनी मुंबईला 'आर्य संगीत विद्यालयामध्ये 'कित्येक वर्ष संगीताचे कार्य नंतर त्यांनी पुण्यात वर्ग घेतले आणि आपला शिष्य वर्ग तयार केला. कपिलेश्वरी बंधू, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, वसंतराव देशपांडे, कृष्णा हनगल वगैरे त्यामुळे किराणा गायकीचा झपाट्याने प्रसार झाला.

       खाँसाहेबांची ठुमरी 'जमुना के नीर 'किंवा 'गोपाला करू ना क्यों नही आए' या ध्वनिमुद्रिका ऐकल्यावर अंतकरण भरून येते. डोळे पाणावतात. खान साहेबांच्या तोंडून ज्यांनी 'पिया मिलन की आस ' हा 'जोगिया ' ऐकला ते घडाघडा रडले आहेत. त्यांना एकदा मैसूरच्या राजे साहेबांचं बोलावण आलं.निमंत्रण स्वीकारून ते मैसूरला आले. राज दरबारी, राजेसाहेबांनी खान साहेबांचे प्रभावी गायन ऐकल्यावर, त्यांची अक्षरशः स्वरसमाधी लागली. त्या स्वरसम्राटाला काय द्यावे. शेवटी त्यांनी अस्सल नवरत्नांचा हार खाँसाहेबांच्या गळ्यात घातला व  'संगीत रत्न ' हा किताब बहाल केला. दरबारी गायक म्हणून नोकरी करावी हे स्वराला परमेश्वर मानणाऱ्या श्रेष्ठ गायकाला रुचले नाही. पण पुढे अनेक वर्ष दसऱ्याला मैसूरला जाऊन ते दरबारात गात असत.

        संगीताची अखंड सेवा आणि संगीताचा प्रसार हेच त्यांचे जीवन ध्येय होते. खाँसाहेबांची साधु संत अवलिये यांच्यावर खूप श्रद्धा होती. मिरजेच्या दर्ग्यामध्ये गाण्यासाठी ते कुठेही असले तरी उरुसाच्या वेळेला मिरजेला परतत असत आणि आपली स्वर निष्ठ सेवा रुजू करीत. मिरजेच्या दर्ग्यामध्ये 'ख्वाजा शमन मीरा' त्यांच्या सेवेला त्यांनी श्रद्धेतून वाहून घेतले होते.खाँसाहेब सतार ,बिन ,सनई , तबला, ताशा, शिंग अशी अनेक वाद्ये वाजवीत असत.

          अशा या सात स्वरांच्या सर्वात्मक सर्वेश्वर पदाला पोहोचलेल्या गायकाने वयाच्या सहाव्या वर्षी आपले पहिले गाणे गायले होते.

        दौऱ्यावर असताना मद्रासच्या पुढच्या स्टेशनपर्यंत गाडी जाते न जाते तोच त्यांच्या छातीत कळ आली. तेथेच त्यांना कळून चुकले आपली शेवटची घटका आली. त्याच स्टेशनवर उतरून शिष्यांना तंबोरे लावावयास सांगितले. आणि दरबारी कानडी रागात खर्ज स्वरात 'लाईलाही इलल्ला' ही प्रार्थना म्हणत त्यांनी प्राण सोडला तो दिवस होता 27 ऑक्टोबर 1937. त्यादिवशी ते नादब्रह्मात विलीन झाले.

 

आमीर खुश्रू  [ Amir Khushru  information in Marathi ]

 

Amir Khushru Information in Marathi
Amir Khushru Information in Marathi

भारतीय संगीत परंपरेत आमीर खुश्रू या गायकाला महत्वाचे स्थान आहे. आमिर खुश्रू यांच्या जन्मकालासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी इ .स.1234 ते 1253 या कालांत उत्तर प्रदेशातील  ' एटा ' जिल्ह्यात यांचा जन्म झाला. अनेक संदर्भात 1253 हे त्यांचे जन्मसाल सांगितलेले आहे.

       लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धी असल्याने अनेक शास्त्रांत अल्पावधीत त्यांनी पुण्य प्राप्त करून घेतले. संगीत शास्त्रातही ते एक श्रेष्ठ दर्जाचे संगीतातील जाणकार तज्ञ म्हणून ओळखले जात होते.

       अमिर खुश्रू जन्मजात कवी आणि संगीतकार होते. सुरुवातीपासून ते दिल्ली दरबारी बादशहाच्या पदरी श्रेष्ठ सेवक म्हणून होते. दिल्लीपती अल्लाउद्दीन खिलजीने इ .स.1294 मध्ये दक्षिणेतील देवगिरीच्या राज्यावर स्वारी केली ते खुश्रू स्वारीबरोबर देवगिरीच्या आले. देवगिरीच्या राजाच्या दरबारात 'गोपाल नायक 'नावाचे महान गायक होते. त्यांच्या गायनाने आमीर खुश्रू प्रभावित झाले. अल्लाउद्दीनने देवगिरीचे राज्य जिंकून तेथून दिल्लीस परत जाताना खुश्रूने गोपाल नायकास दिल्लीस नेले व त्यांच्याकडून खुश्रूने गायन विद्येतील महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्या. ख्याल गायकीचा जन्मदाता आमिर खुश्रू यांना मानले जाते.

       आमीर खुश्रू एक विद्वान व श्रेष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक नवे राग, नव्या रचना संगीतात प्रसारित केल्या. त्यांनी काही नवे ताल प्रचारांत आणले.

       कव्वाली सारखा नवीन गायन प्रकार खुश्रू ने  रुढ केला. त्या काळातील भारतीय राग संगीत व परशियन संगीत यांचा संयोग (फ्युजन) करून नवे राग, खुश्रू साहेबांनी निर्माण केले. आमिर खुश्रू यांच्या लेखनातून असे अनेक पुरावे मिळतात, की या पुराव्यांच्या आधारे  खुश्रू हे संगीतप्रेमी होते. त्याच बरोबर पर्शियन आणि हिंदुस्तानी पद्धतीचे जाणकार होते. संगीताचे वेगळे युग सुरू करणारे एक संगीत श्रेष्ठ खुश्रू वयाच्या 72 व्या वर्षी पैगंबरवासी झाले.

 

पंडित जितेंद्र अभिषेकी [ Pandit Jitendra Abhisheki information in Marathi ]

 

 

Pandit Jitendra Abhisheki Information in Marathi
Pandit Jitendra Abhisheki Information in Marathi

निसर्गरम्य गोव्यातील मंगेशी या देवालयाचे पुजारी भिकाजी उर्फ बाबू बुवा यांचे सुपुत्र. वडील नावाजलेले कीर्तनकार त्यामुळे वडिलांच्या मागे उभे राहून कीर्तनात साथ करण्याची  पंडितजींना सवय होती. मा दीनानाथांशी नातेसंबंध असल्यामुळे नाटकाची आवड, घरी येणारे प्रवचनकार, कीर्तनकार, गायक यामुळे संगीताचे आणि नाटकाचे अप्रत्यक्षपणे संस्कार झालेले.

       पंडित जितेंद्र अभिषेकीनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ते ग्वालेर घराण्याचे शंकर बुवा गोखले यांच्याकडून तालीम घेऊन त्यांच्या 700 वर बंदिशी मुखादेगत होत्या. लहानपणी वडिलांकडे त्यानंतर अत्रोली आणि आग्रा घराण्याचे अजमत हुसेनखान, आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित. जयपूर घराण्याचे गुलुभाई जसदनवाला त्यांच्याकडे वेगवेगळ्या घराण्याची तालीम घेत असताना प्रत्येक घराण्यातील चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. अनेकांकडून विद्या घेतली पण कोणत्याही घराण्याचा शिक्का त्यांनी स्वतःच्या सांगितीक व्यक्तिमत्त्वावर उमटू  दिला नाही. पंडित अभिषेकी यांची गायन शैली पौरुषयुक्त, आक्रमक आणि अत्यंत इमानदार शैली हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांची प्रकृती अभ्यासकाची आणि संशोधकाची असल्याने त्यांच्या गायनात त्यांची स्वतंत्र शैली आढळते. पंडित अभिषेकी बुवा स्वतः उत्तम शिष्य तसे उत्तम गुरुपण होते। मोजक्याच शिष्यांना निरक्षेप वृत्तीने त्यांनी विद्यादान केले. शिष्याला शिकवताना त्यांच्या आवाजाची देन, पट्टी, बौध्दिक क्षमता ,दोष यांचा विचार करून ते शिकवत. गायनाचे उच्चार शास्त्र ,भाव याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. सकाळच्या वेळी, मन शरीर ताजेतवाने असते त्यामुळे लवकर एकाग्र होता येते हे ते शिष्यांना सांगत असत. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, राजा काळे, विजय कोपरकर  हे त्यांचे नावाजलेले शिष्य.

       तालीम देताना पंडितजी आपल्या शिष्यांना आवर्जून सांगत की ताल व लय ही दोन मूलतत्त्वे आहेत. स्वराला सुद्धा लयीनेच आकार दिला आहे. लई तर निसर्गात आहे.

       दिवस-रात्र जीवनमान संक्रमणात आहे. सर्वाभूती आहे. लय संपते तेथे प्रलय सुरू होतो. पंडित जितेंद्र अभिषेकी गायक तर होतेच पण उत्तम संगीतकार संगीत दिग्दर्शक होते. जवळजवळ पंचवीस नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली गाजलेली नाटके मत्स्यगंधा आणि देवयानी, हे बंद रेशमाचे, कट्यार काळजात घुसली. मीरा -मधुरा, लेकुरे उदंड झाली या नाटकाला संगीत देताना नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची संगीत बांधणी केली आहे. उडत्याचाली देताना परदेशी ठेका व धून वापरली व पाश्चात्य सुरावटीचा वापर केला. या नाटकासाठी साऊंड ट्रॅकचा वापर गोव्यातील  थिएटर 'त्रीयात्र ' मधील मुक्त गीतांची जुळणारी गीते लेकुरे मध्ये असल्याने रिदमला प्राधान्य देऊन मुक्तछंदातले संवाद सादर करणे याचा प्रयोग केला व तो यशस्वी ठरला. ज्या काळात पंडितजी वावरत होते त्या काळात नाट्यसृष्टी उजाड , मृत प्राय व मरगळ असा आलेला काळ होता. अशा वेळी नाट्यसंगीतास नवचैतन्य देण्याचे काम पंडितजीने केले. संगीत दिलेल्या नाटकांतील चालींचा विचार केल्यास काही मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात.

     1) प्रचलित रागात नवचैतन्य निर्माण करणे उदाहरण देवाघरचे (यमन ), नको विसरू (मुलतानी ) यतीमन (तिलक कामोद)

 2) ललित शैलीतून अनवट राग वापरणे उदाहरण घेई छंद (साल गवराळी ) या भवानातील गीत (पटबिहाग ) प्रेम वरदान (गावती) इत्यादी.

  3) सेमी क्लासिकल पद्धतीची स्वररचना करणे. उदा. गुंतता हृदय का धरिला परदेस, लागी करेजवा कटार इत्यादी.

   4) भावगीतात्मक स्वररचना तवभास अर्थ शून्य भासे, इत्यादी नाट्य संगीताबरोबरच भारतीय अभिजात संगीताचा विचार मांडताना त्यांनी स्वतः गायक म्हणून बैठकीत गायलेली स्वानंदी, सालगवराळी, जोगकंस, बिभास, मनोरंजनी, आनंद भैरव हे राग अविस्मरणीय.

      त्यांचा आवाज थोडासा ढाला होता पण स्वतंत्र शैलीने ते बैठक रंगवीत असत.

       पद्मश्री, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, गोवा कला अकादमीचे सल्लागार होते. पंडित जी समर्थ गुरू एक विशिष्ट पद्धतीने शिष्य निर्माण करणारे, शिष्य संगीताशी एकनिष्ठ, शिस्त शीर हवा, गाणे हे सर्वप्रथम मेहनत आणि शिस्तीचे काम आहे, हे शिष्यांना पटवून देत असत. डोळसपणा, शब्दांचे सांगीतिक उच्चारण, स्वर व्यंजनाचे महत्व, श्वास कुठे आणि कसा घ्यावा याचे मार्गदर्शन. स्वरांचे लगाव, स्वरांचे लयीशी संबंध या सर्व प्रकारच्या मार्गदर्शनातून शिष्याचे व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करणारे महान गुरू.

       1962 सालापासून सवाई गंधर्व महोत्सवात त्याची हजेरी होती. 7/11/1998  रोजी महान गायकाने संगीतकाराने जगाचा निरोप घेतला.

 

सवाई गंधर्व [ Savai Gandharv information in Marathi ]

 

 

Savai Gandharva Information in Marathi
Savai Gandharva Information in Marathi

19 जानेवारी 1886 रोजी हुबळी जवळच्या कुंदगोळ या खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातले नाव रामचंद्र आणि संपूर्ण नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर.

     उस्ताद अब्दुल करीम खाँ हे त्यांचे गुरू, त्यांनी रामचंद्र उर्फ सवाई गंधर्वांना शास्त्रीय संगीताची आठ वर्ष तालीम दिली व उत्तम गान संस्कार देऊन घडविले.1908 साली रामभाऊ रंगभूमीकडे वळले. प्रथम त्यांनी ह .ना .आपटे ह्यांच्या 'संत सखु 'या नाटकात काम केले, ती भूमिका खूप गाजली. त्यांना नाव लवकिक मिळाला. या भूमिकेनंतर त्यांनी सुभद्रा ,तारा , द्रोपदी ,मीरा  अशा अनेक भूमिका केल्या व रसिकांना वेडे केले. अमरावतीमध्ये सौभद्र नाटकाचा प्रयोग होता. दादासाहेब खापर्डे त्या प्रयोगास उपस्थित होते. सुभद्रेची अप्रतिम गाणी ऐकून त्यांनी रामभाऊंना सवाईगंधर्व या बिरदावलीने सन्मानित केले व तेव्हापासून रामभाऊ सवाई गंधर्व या नावाने ओळखले जाऊ लागले. 1828 साली गोविंदराव टेंबे यांच्या 'तुलसीदास  'नाटकातील  'राम रंगी मन रंगले  'हे पद अत्यंत गाजले.

       नाटक व नाट्यगीता बरोबरच सवाई गंधर्व आपल्या बैठकीतून ख्यालाबरोबरच ठुमरी ,भजन ,नाट्यसंगीत आवर्जून म्हणत असत.

        1940 ते 1945 या काळात शंकरा ,भैरवी , देसकार मिया मल्हार ,सुर मल्हार, अडाणा  , तिलंग ,पुरीयाधनाश्री या विविध रागांतील ,त्यांच्या ध्वनिमुद्रिका फार मोठ्या प्रमाणात गाजल्या, लोकप्रिय झाल्या.

      ते ठुमरी गात असत ती अतिशय भावपूर्ण आणि आशयपूर्ण, त्यांनी गायलेल्या ठुमऱ्यातील मोजक्यांचा उल्लेख करायचा झाला तर,"पाणी भरेली कौन अलबेली(गारा)' सजन तुम काहे का नेहा लगाये (तिलंग)' बिल देखे परे नही चैन (भैरवी) ह्यांचा उल्लेख करायला हवा ही शेवटची भैरवीची ध्वनिमुद्रिका सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांच्या गाणे सांगता झाल्यावर ऐकवली जाते. ते स्वर कानात साठवूनच सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता होते.

       सवाई गंधर्वांनी आयुष्यभराचा प्रत्येक श्वास गाण्यासाठीच घेतला व पुढच्या पिढीला त्यांनी भरभरून दान विद्या दिली. पुढची पिढी तयार केली.

     श्रीमती गंगूबाई पंडित फिरोज दस्तूर, पंडित भीमसेन जोशी, पंडित संगमेश्वर गुरव यांची नावे व या सर्वाचे संगीत क्षेत्रातले कर्तुत्व प्रसिद्ध आहे. ताई गंधर्वांनी तयार केलेल्या या शिष्यांनी पण फार मोठे नाव कमावलेले आपणास ज्ञात आहे.

    सवाई गंधर्वांनी या आयुष्यात यश ,कीर्ती ,मानसन्मान मिळवले पण त्यांचे पाय जमिनीवर होते. अहंपणाचा स्पर्श न होऊ देता त्यांनी देता येईल तेवढी गानविद्या शिष्यांना दिली.

      सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ किराणा घराण्याचे गायक. किराणा घराण्याची पताका देशा-विदेशात त्यांनी फडकवत ठेवली. त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे यांनी सवाई गंधर्वाच्या गाण्याचा वारसा पुढे चालू ठेवला.

        सवाई गंधर्वाच्या नावानेच पुण्यात दरवर्षी संगीत महोत्सव होतो. तीन दिवसांच्या या महोत्सवात जुन्या गायिका बरोबर नव्यांनापण आमंत्रित करून आपली गायकी पेश करण्याची संधी दिली जाते. संगीताबरोबरच एक दिवस 'नृत्य' ही सादर केले जाते. गेली पाच दशके पुण्यात हा महोत्सव गुरूच्या स्मरणार्थ होत असतो.

 

बालगंधर्व [ Bal Gandharv information in Marathi ]

 

 

Bal Gandharva Information in Marathi
Bal Gandharva Information in Marathi

बालगंधर्व हे मूळचे नाव नाही तर 1898 साली टिळकांनी दिलेला बहुमान आहे. गानक्षेत्रांतील सन्मान आहे. मूळ नाव श्री नारायण श्रीपाद राजहंस. या राजहंसाचे किंवा बालगंधर्वाचे वर्णन कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे, ते म्हणतात,

      

                   रतीचे रुप जया लावण्या शोभे |

       कूलस्त्री जसे हास्य ओठांत शोभे |

        सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे  |

       असा बालगंधर्व आता न होणे |

18 व्या शतकाच्या अखेरपासून तो 19 व्या शतकाच्या सहा सात दशके महाराष्ट्राच्या नाट्य संगीतावर त्यांचे अधिराज्य होते. जवळजवळ चारशेच्यावर त्यांच्या रेकॉर्ड ध्वनी मुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

      अभिनय आणि गाणे या दोन्हींच्या उत्कृष्ट मिलाफाने ते गात. रसिकांना त्यांनी आपल्या गाण्याने वेडे केले होते.

       नाट्यसंगीताला उपशास्त्रीय संगीत म्हणावयास हरकत नाही. 'संगीत स्वयंवर 'हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक या नाटकाला भास्करबुवा बखले यांनी वेगवेगळ्या रागबंदिशांवर आधारित चाली दिल्या व नकळत शास्त्रीय संगीताची सुरावट घरोघरी पोहोचली.

      स्वयंवर नाटकातील 'नाथ हा माझा 'यमन रागावर 'मम आत्मा गमला बिहाग राग, सुजन कसा मन-भूप राग 'स्वकुल तारकसुता-भीम पलास राग, नरवर कृष्णासमान पहाडी ही झाली काही उदाहरणे.

       नाट्यसंगीत बसवून घेताना भास्करबुवा प्रथम त्या गाण्याचा ' राग 'बालगंधर्वाच्या गळ्यावर चढवित असत. राग शिकवतांना तो रस आविष्कार सह चढवित असत. आणि त्यानंतर पदे नाट्यगीते म्हणतांना शास्त्रीय संगीत माहीत असणे महत्त्वाचे ठरत असे.

      बालगंधर्वांनी-मानपमानांतील भामिनी रंग व तानाजी नाट्य गीते गायली आहेत. उदाहरण नयने लाजवित राग झिंजोटी, मला मदन मासे, नाही मी बोलत, घनराशी जाता राग पिलू, झाले युवती मना, शूरा मी वंदिले ही गीते गाजली.

      विद्याहरणातील देवयानी व त्यातील देस रागातील मधुकर सवल हे नाट्यगीत.

    स्वयंवरातील रुक्मिणी आणि ते नाटक रंगभूमीवर आले आणि खऱ्या अर्थाने गंधर्वयुगास सुरुवात झाली. एकच प्याला व त्या नाटकांतील रेवती व तीची गीते संशय कां मनी आला, मजवरी तयांचे प्रेम खरे, हृदयी धरा हा सौभद्र नाटकांतील सुभद्रा व  तिने गायलेली गीते आज पर्यंत गायली जातात.बालगंधर्वाचा स्वर म्हणजे अमृत स्वर होता.

       अशा या रूप सुंदर नटाचा जन्म 26/6/1888 मध्ये झाला. नाट्य गीतांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत घराघरांत पोहोचवण्याचे काम बालगंधर्वांनी केले. नाटकांत त्यावेळी स्त्रिया काम करीत नसत. बालगंधर्वांनी सर्व स्त्री भूमिका केल्या. सर्व नाट्यगीते स्त्री गायिका गाईल त्या ढंगाने, त्या नखर्याने, गायिली आहेत.

    या थोर गायक नटाचा मृत्यू 15/7/1967 रोजी झाला.

  नाट्य गीतांवर आजही त्यांचा ठसा उमटलेला आहे. तरुण गायिका त्याच ढंगाने गाणे म्हणायचा आटोकाट प्रयत्न करीत असतात.

 

पंडित कुमार गंधर्व [ Pandit Kumar Gandharv information in Marathi ]

 

 

Panidt Kumar Gandharva Information in Marathi
Pandit Kumar Gandharva Information in Marathi

पंडित कुमार गंधर्व हे नाव त्यांना सन्मानाने दिले. परंतु या थोर गायकाचे खरे नाव 'शिवपुत्र सिद्ध रामय्या कोमकली' हे आहे.

       इ .स.1924 मध्ये कर्नाटकातल्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला.

       ऑल इंडिया म्युझिकल कॉन्फरन्स 1935 साली अलाहाबाद येथे भरली होती. त्यावेळी दहा वर्षाच्या वयात त्यांनी गीत सादर केले होते. त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या जीना हॉलमध्ये जाणकार प्रेक्षकांच्या समोर कुमारांनी गाऊन आपले संगीताचे ज्ञान सिद्ध केले होते. प्रा . बी. आर देवधर हे कुमारांचे संगीत क्षेत्रातील गुरु. नामवंत गायकांच्या गाण्याची नक्कल करून त्यांनी आपल्या गान प्रवासास  प्रारंभ केला. नंतर मात्र त्यांनी आपली स्वतःची गान शैली निर्माण केली. त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. कुमार यांनी अथक प्रयत्न अभ्यास व कष्ट करून संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.

       कुमार गंधर्व म्हणजे विसाव्या शतकांतील एक चिंतनशील, बुद्धिवादी, प्रज्ञावंत गायक हे कोणीही मान्य करील. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरार्धापर्यंत कुमार गंधर्व या नावाचा सिल्सिला चारी दिशांना दरवळत होता.

     कुमारांच्या जीवनात आपत्ती बऱ्याच आल्या पण त्या आपत्तींना सामोरे जातांना आपल्या गान प्रतिभेला धक्का लावू न देता त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. 1961 सालांत भानू ताईचे निधन झाले. फार मोठा आघात त्यांच्यावर झाला होता. याप्रसंगी निसर्गाने त्यांना सावरले, नुसतेच सावरले नाही तर त्यावेळी त्यांचा मुक्काम देवासला होता. एका अनोख्या क्षणी कुमार क्षिप्रेकाठी उदास होऊन बसले होते. तेथे कुमारांना निसर्गाने अलगद स्पर्श केला. पाळण्यातील आंब्याच्या झाडावर फुललेला मोहोर यांनी पाहिला आणि फेर आई मोरा अंबुवा पे'ही बागेश्री रागांतली बंदिश त्यांना स्फुरली आणि या बंदिशी बरोबरच त्यांच्या जीवन प्रवाहाला क्षिप्रेबरोबरच वाट दिसली. तिथल्या परिसरातली बोलीभाषा 'मालवी' ती कुमारांनी आत्मसात केली.

      गीत हेमंत, गीत वर्षा, गीत वसंत यासारख्या लोक गीतांच्या रचनेतून त्यांनी केलेल्या स्वररचना आजही रसिकांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत.

    कुमार आणि त्यांच्या ' अनुपराग विलास' या ग्रंथात बराच शाळा प्रचलित रागांवर आधारित साधारण 17 स्वतःच्या बंदिशी प्रकाशित केल्या आहेत. त्यातून कुमारांची प्रतिभा कळते. त्यांची  शैली कळते. काही उदाहरणे पाहू या.

    लगन गंधार: बाजे ले मोर झांझरवा | भूप रागांतील गुर्नजन , हमीरराग, बागेश्री , कानडा, गौरी बसंत , धनबसंती ,मालवती इत्यादी जुन्या पिढीतील सर्वांना नव्या रागांच्या बंदिशी माहिती आहेत पण नव्या पिढीला माहीत होणे गरजेचे आहे. कुमारांची प्रत्येक बैठकी एक नवा प्रयोग म्हणून ते मांडीत. त्यांच्यात खेळाचे ऐकू येणारे प्रत्येक आवर्तन उत्कंठा वाढविणारे असे. त्यांची तान तेज व विलक्षण अद्भुत असे. रागाची निवड व बंदिशीची डोलदार मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये म्हणायला हरकत नाही. ते गात असताना एखाद्या अक्षरावर ते इतक्या काही आवेशाने येत इतकी श्रोता चक्रावून जावा.

       कुमार आणि आपल्या घराण्याची परंपरा मोडून त्यांची बंडखोर आक्रमक गायकी पुढे आणली व संगीताला एक नवे चैतन्य मिळाले असे म्हणणे योग्य ठरेल. त्यांना जे पुरस्कार प्राप्त झाले त्यात 1) पद्मभूषण 2) संगीत नाटक अकादमी ची फेलोशिप इत्यादी अशा प्रज्ञावंत गायकाचा मृत्यू 12 जानेवारी 1992 मध्ये झाला.

 

पंडित भीमसेन जोशी [ Pandit Bhimsen Joshi information in Marathi ]

 

 

Pandit Bhimsen Joshi Information in Marathi
Pandit Bhimsen Joshi Information in Marathi

1 फेब्रुवारी 2002,  रथसप्तमी यादिवशी 81 व्या वर्षात पदार्पण करणारा हा किराणा घराण्याचा मानदंड शारीरिक दृष्ट्या थकला असला तरी आठ दशके गळ्यात असलेला सूर मात्र आज पण तरुण आहे.  ताजा आहे.

     पंडित भीमसेन जोशी मुळांत कमी बोलणारे, बोलणे जेवढे टाळता येईल तेवढे ते टाळत असत. एकदा ते म्हणाले होते की,' गायकाने गायचे असते, बोलायचे नसते. गायक बोलू लागला की त्याचे गाणे कमी झाले असे समाजावे'  ज्यांना ज्यांना गाण्याची आवड आहे अशा अगदी सामान्य रसिक आणि पासून ते गाण्यातले मर्मज्ञ म्हणजे  दर्दी ,जाणकार ,सगळेच त्यांच्या गाण्याच्या बैठकीला उत्सुकतेने गर्दी करतात .प्रत्येकाला सुखावणारे त्यांचे गाणे असते.

     बैठकीत येऊन बसल्यावर तानपुरे (तंबोरे) सुरांत लावतानाची भावमुद्रा डोळ्यांत  साठवावी अशी असते. बैठक कुठे व केव्हा आहे याचा अभ्यास करून त्या समजानुरूप व प्रेक्षकांनुरूप रागाची निवड करणे व गाणे हे त्यांचे वेगळेपण आहे.

   गाण्याच्या सुरुवातीला पहिला षडज लावताना समोरच्या श्रोत्यांना ते जिंकून घेतात.

     तबला, तिची साथ करणारे कलावंत आणि मागे बसून तानपुऱ्याची साथ करणारे त्यांचे शिष्य या सर्वांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्या नजरेने ते त्यांच्याशी संवाद साधतात.

    पंडितजींचा स्वभाव शांत आहे. व्यक्तिमत्व धीरगंभीर आहे. पंडितजींचा स्वर निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ आहे. मोकळा आणि भरीव आहे. त्यांचा स्वर बुलंद तर आहेच पण गोल आयुक्त आहे. त्यांच्या स्वरांतील दमसास, सुरेलपणा आर्तता या सर्वांचा अनुभव प्रेक्षक ,जाणकार आजही घेतात.

     पंडित जी मैफिलीत गाताना स्वरांची आस टिकवीत एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाताना तंत्र अंगाचे वैशिष्ट्ये ते जपतात. तीनही सप्तकांत सहजगत्या जाणारी त्यांची तान ही तर त्यांच्या अंगभूत गायिकेचा एक अविभाज्य भाग आहे. बैठक गीते जो राग सादर करतात त्या त्या रागाचे गांभीर्य ते जपतात.

    ठुमरी असो अथवा एखादे पद असो ते जेव्हा आपल्या गळ्यातून उतरवितात तेव्हा त्या पदात अथवा आठवणीत प्रासादिकता व  आर्तता याचे दर्शन घडते. पंडितजी किराणा घराण्याचे असले तरी त्या घराण्यांच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतलेले नाही. आपल्या स्वरप्रतिमेने गायकीचे विकसन करित किराणा घराण्याचे एक वेगळे परिमाण त्यांनी प्राप्त करून दिले आहे.

     संतवाणी हा त्यांचा कार्यक्रम श्रोत्यांनी अक्षरश डोक्यावर घेतला. सन्तवाणी मधील अभंग जेव्हा ते गाऊ लागतात तेव्हा जुन्या श्रोत्यांना बालगंधर्वाचे स्मरण होते.

      पंडित जी गाण्याच्या निमित्ताने भारत भर हिंडले, त्या त्या ठिकाणच्या विविध घराण्यातील गायक गायिका वादक, नर्तक यांना भेटल्याशिवाय परतत नसत. गेल्या अर्धशतकातील पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या केंद्र स्थानी होते. पंडित भीमसेन जोशी आपल्या गान गुरुचे इतके उचित् स्मरण पाच दशके करून, भारतभरातल्या नव्या, जुन्या कलाकारांचा शोध घेऊन ते या महोत्सवात त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करीत असत. गायकाला ह्या मंचावर गायला मिळणे हे तो त्याचे भाग्य समजत असे. दक्षिणेतील एका संगीताशी निगडित असलेल्या या संस्थेने पंडित भीमसेनजींना एक मानपत्र दिले. ते मानपत्र संस्कृत भाषेत दिलेले आहे. त्याचे वाचन करतांना त्यातील एक सुवचन पंडित यांची खरी ओळख करून देते. ते म्हणजे

                यत्र यत्र संगीत: तत्र तत्र भिमसेन:


लकी अली [ Lucky Ali information in Marathi ]

Lucky Ali Information in Marathi
Lucky Ali Information in Marathi


सिनेसृष्टीतील खळखळून हसविणारा विनोदी नट, मेहमूद यांचा नंबर दोनचा मुलगा 'लकी अली' .

    वडील एक नामवंत विनोदी नट होते तर लकी अलीची मावशी म्हणजे सिनेसृष्टीतील एकेकाळची गाजलेली अभिनेत्री मीनाकुमारी. यांच्या घरात जन्मलेल्या या मुलाचे प्राथमिक शिक्षण' बॉम्बे स्कॉटिश स्कूल'तर पुढचे शिक्षण मसुरी येथे झाले. सतत हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे आई-वडिलांचा सहवास फार असा नव्हताच. त्यातही 1960 ते 70 या दहा वर्षाच्या काळात मेहमूद शूटिंगमध्ये बुडलेला होता. पत्नी आणि मुलांसाठी वेळ देणे शक्यच नव्हते. कधीमधी पाहुण्यासारखे घरी येणे. एक गमतीदार घटना अशी लकी अली पाच वर्षाचा असेल. हॉस्टेल मधुन घरी येणार्‍या मुलाला आणण्यासाठी विमानतळावर आई आणि वडील बरोबर गेले. भेट झाल्यावर लकी अलीने आई बरोबर आलेल्या माणसाला ओळखले पण चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय विनोदी नट म्हणून. नंतर आईकडून त्याला कळले, ते आपले वडील आहेत. आनंद आणि धक्का दोन्ही एकदम. सहवास असेल तर नात्यांचे अर्थ कळतात हे यावरून समजते.

      वयाच्या 13 वर्षापासून 'लकी अली 'उत्तम गिटार वाजवित असत, स्वरांची परमेश्‍वरी देणगी त्याला मिळाली होती. गिटार वाजवायला कुणा गुरुकडे जायची त्याला गरज पडली नाही. उपजतच हे ज्ञान त्याला मिळाले होते. गिटार वादना बरोबर अभिनयाचे क्षेत्रपण त्याला आवडत होते. त्या क्षेत्रातही काही काळ लकी अली रमला. संगीत हेच कार्यक्षेत्र त्यांनी निवडले 'सुनो 'या अल्बमच्या निमित्ताने लकी अली यांनी हिंदुस्थानी संगीतात पहिले पाऊल टाकले. आणि ह्याच अल्बमने  'लकी अली  'ला नामवंत 'पॉप सिंगर 'हा किताब मिळवून दिला. प्रस्थापित पॉप सिंगर म्हणून लकी आली ओळखला जाऊ लागला.

       या अल्बमने संगीत क्षेत्रातले मोठे समजले जाणारे बरेच सन्मान त्याने मिळवले. उदाहरण सर्वोत्कृष्ट  पोप मेल गायक,1996  हे अवॉर्ड मिळाले. चॅनेल प्रेक्षकांनी उत्तम म्हणून हा अल्बमला मते दिली. आणि 1997 चे प्रेक्षक पसंती अवॉर्ड दिले गेले. या अल्बम मधले  'ओ सनम 'राग आल्याने त्यांना उत्तम संगीत गायक म्हणून मान्यता मिळाली व त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. जनमाणसात पॉप गायक म्हणून त्यांना स्थान मिळाले.

    ' लकी अली ' चा दुसरा अल्बम प्रसिद्ध झाला पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीसुद्धा त्यांतील गीतांची ओळख गीतांना दिलेल्या संगीताची नोंद रसिकांनी घेतलेली दिसते. दुसऱ्या अल्बम नंतर तिसरा आणि चौथा अल्बम प्रसिद्ध झाले. दोन्ही अल्बम लोकांना आवडले. दुश्मन दुनिया का या चित्रपटापासून लकी अली पार्श्वगायक म्हणून रसिकांच्या समोर आले. त्यांनी गायलेले गाणे.' नशा नशा 'या सिनेमाचे एक वेगळेपण असे होते की, पाच सिनेमाचे डायरेक्शन केले होते लकी अली यांच्या वडिलांनी, प्रमुख भूमिकेत होते त्यांचे बंधू हा सिनेमा फारसा चालला नाही. पण लकी अली यांना मात्र पार्श्वगायनाची संधी मिळाली.

     पुढे 'कहो ना प्यार है 'हा सिनेमा रिलीज झाला या सिनेमाद्वारे 'ऋतिक रोशन 'यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. या सिनेमात 'ना तुम जानो ना हम 'आणि 'एक पल का जीना 'ही दोन गाणी लकी अली  यांनी गायलेली आणि दोन्ही गाणी खूप गाजली. गाण्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली आणि लकी अली ह्यांना उत्तम पुरुष पार्श्वगायकाचे अवॉर्ड मिळाले. पुरस्कार प्राप्त गाणे होते 'ना तुम जानो ना हम '

      लकी अली यांची मावशी म्हणजे हिंदी सिनेमा जवळजवळ दीड तप गाजवलेली अभिनेत्री मीनाकुमारी.  आईकडून आलेला अभिनयाचा वारसा आणि वडीलतर सिनेसृष्टी गाजवलेले विनोदी नट.  त्यामुळे आली यांनी अभिनय क्षेत्रात पण काही काळ घालविला असे दिसून येते.

     1977 मध्ये रिलीज झालेला ' ये हे ना जिंदगी '1979 मध्ये रिलीज झालेला 'हमारे तुम्हारे 'आणि 1985 मध्ये रिलीज झालेला शाम बेनेगल यांचा ' त्रिकाल 'त्यानंतर मात्र लकी अली सृष्टी पासून दूर राहिले एकदम 2002 मध्ये संजय गुप्ता यांच्या  'काटे 'या सिनेमात ते दिसले. महान नट अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्या बरोबर.

     लकी अली यांचा सुरुवातीपासूनच प्रवास जर पाहिला तर त्यात विविधता दिसून येते.

       गिटार वादन हा त्यांचा पहिला आवडता छंद होता. नंतर ते संगीताकडे वळले. काही अल्बम निघाले. संगीतात स्थिर होतील असे वाटत असताना ते पोप संगीताकडे वळले. नंतर अभिनय क्षेत्राकडे वळवाट म्हणून रसिकांच्या समोर आले. राहता राहिला दूरदर्शनचा छोटा पडदा ते तेही त्यांनी 2002 साली  'जरा हटके 'या मालिकेत काम केले. अशाप्रकारे विविध कला क्षेत्रांचा अनुभव त्यांनी घेतला तरी पण देशात आणि परदेशात त्यांची ओळख आहे ती उत्तम 'पॉप सिंगर' म्हणूनच.

     लकी अली यांचा आवाज घोगरा आहे पण त्या आवाजात मनाला भेटणारा गोडवा आहे. भरदारपणा आणि त्यामुळे रसिकप्रिय आहे.

     लकी अली यांच्या भटक्या वृत्तीने त्यांना कुठे कुठे नेले. ते कळणे म्हणजे गंमत वाटते.

 

देवकी पंडित [ Devaki Pandit information in Marathi ]

 

Devki Pandit Information in Marathi
Devki Pandit Information in Marathi

  संगीताची सौंदर्य अनुभूती यायला एखादा क्षणही पुरेसा असे म्हणणारी देवकी पंडित संगीत गायिका म्हणून नव्या पिढीची आवडती आहे. तशीच हिंदुस्तान शास्त्रीय संगीतामुळे संगीत जाणकारांची पण आवडती आहे. खासकरून मालिकांच्या शीर्षकगीतांमुळे ती जास्त लोकप्रिय झालेली आहे.

      मुले ज्या वयात फक्त आई किंवा नातेवाईकांना कळतील असे बोबडे बोल बोलतात त्याच वयात देवकीची स्वरांशी ओळख झाली. दोन पिढ्यांचा संगीत वारसा तिला लाभला. आई श्रीमती उषा पंडित यांच्याकडे तिने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गायनाचे शिक्षण घेतलं. त्यानंतर पंडित वसंतराव कुलकर्णी, स्व. पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरी अमोणकर अशा मान्यवरांच्याकडे ती शिकली. पंडित बबनराव हळदणकर यांचेही मार्गदर्शन तिला लाभले. वयाच्या नवव्या वर्षी तिने पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात गाणे म्हटले. बाराव्या वर्षी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दुरदर्शनासाठी गाण्याची संधी तिला दिली. तसेच पॉलीडॉर कंपनीतर्फे तिची बालगीतांची रेकॉर्डही निघाली. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्ती गीत, सिनेसंगीत फ्युजन अशा सर्व प्रकारचे गायन करायला तिला आवडते आणि या क्षेत्रांत तिला लोकप्रियता मिळाली आहे. देवकी इनर सोल संदेश, बंदिष, अष्टोप्रहर असे शास्त्रीय संगीताचे कृष्ण भजन आराधना महाकाली श्याम रंग वृंदावन, उपनिषद, अमृत असे भक्ती संगीतातील अल्बम प्रकाशित झाले आहेत.

     हलका नशा, हिअर, कृष्ण उत्सव असे नियोजनचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. 1986 मध्ये तिने ऐश्वर्य गायन केलेल्या'अर्धागी' या पहिल्याच चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट पार्श्व गायनाचे पारितोषिक मिळाले. आणि त्यानंतर झी मराठीच्या सा-रे-ग-म-प चा उत्कृष्ट परीक्षक म्हणून ही सन्मान मिळाला.

      त्रिलोक गुरटू, पंडित हरिप्रसाद चौरशिया यांच्याबरोबर फ्युजनसाठी तसेच विविध संगीत समारोहांमध्ये तिने परदेशात व आपल्या देशात अनेक ठिकाणी गायन करून श्रोत्यांची दाद मिळविली आहे.

       तिने गायलेल्या रामदास स्वामींच्या रचना समाजात लोकप्रिय झालेल्या आहेत. कभी हा कभी ना, बेताबी, साज, दायरा, गिद्ध, गुड्डू, अशा अनेक चित्रपटांसाठी ही तिने ऐश्वर्य गायन केलेले आहे व श्रोत्यांची दाद मिळविली आहे.संगीत रचनाही केल्या आहेत.

      झी टीव्हीवरील आभाळमाया मानसी, वादळवाट, अधुरी एक कहाणी, अशा मालिकांच्या शीर्षक गीतांसाठी ती प्रसिद्ध आहे. घराघरात पोहोचली आहे.

        झी सा रे ग म प  या टॅलेंट हंट कार्यक्रमात परीक्षक म्हणून त्यांच्या गाण्याविषयी केलेले अचूक विवेचन आणि योग्य मार्गदर्शन श्रोत्यांच्या ही ज्ञानात भर टाकणारे असते. गाणे ऐकावे कसे हे कळणे हे पण महत्वाचे असते. सामान्य श्रोत्यांना गाणे कसे ऐकावे यांचे मार्गदर्शन उत्तम प्रकारे केले जाते त्यासाठी स्वतःला गाणे उत्तम समजावे लागते. गायन क्षेत्रातील कुठलाही प्रकार आणि निविद्ध नाही असे तिचे मत आहे.

       गाणे कोणतेही असो त्या गाण्याला शास्त्रीय संगीताची जाण असणे जास्त महत्त्वाचे असते. कारण सुरांचा पक्केपणा येण्यासाठी शास्त्रीय संगीत समजणे योग्य असते. ध्वनिमुद्रिका ऐकून त्याप्रमाणे नक्कल करता येते पण असे गाणे आपले गाणे होत नाही.

      तासभराच्या बैठकीच्या गाण्यातून रसिकांना आपलं करता येते. आनंद देता येतो. त्या प्रमाणे अर्ध्या मिनिटाच्या शीर्षक गीतातून सुद्धा देता येते.


श्रेया घोषाल [ Shreya Goshal information in Marathi ]

 

Shreya Ghoshal Information in Marathi
Shreya Ghoshal Information in Marathi

 श्रेया घोषाल हिचा जन्म 12 मार्च 1984 ला भारतातील राजस्थान मधल्या एका गावात झाला. तिचे जन्मगाव फारच लहान आहे. ही बंगाली घरात जन्माला आली.

       शैक्षणिक दृष्टीने पाहिले तर बुद्धिमान कुटुंब आहे उच्चशिक्षित घर आहे. श्रेयाचे वडील 'भाभा आटोमॅटिक रिसर्च सेंटर' याठिकाणी पावर प्लांट इंजिनियर म्हणून काम करतात. तर आईने साहित्यातील मास्टर पदवी संपादन केलेली आहे.

       आई हार्मोनियम वाजवत असताना तिच्याजवळ बसून संवादिनी वाजविण्याचा प्रयत्न वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रेया करत असे. संगीताची आवड आहे कळल्यावर तिच्या पालकांनी तिचे नाव संगीत क्लासमध्ये घातले आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची शिकवणी सुरू झाली. संगीत शिक्षा देणारे तिचे गुरू होते महेश चंद्र शर्मा, ते कोट्याला राहात असत.

        लहान वयात श्रेया घोषाल झी टीव्ही वर सारेगमा ही स्पर्धा होती त्या स्पर्धेतील यशस्वी झाली व तिने त्या (children special ) मुलांच्या खास भागाचे पारितोषिक मिळवले. या रियालिटी शोचे पाहुणे होते आजचे आघाडीचे तरुण पार्श्वगायक 'सोनू निगम' आणि कल्याणजी हे परीक्षक होते.

      सोनू निगम आणि कल्याणजी ह्यांनी तिच्या पालकांना पटवून दिले की त्यांनी आपल्या मुलीच्या पुढच्या प्रगतीचा विचार करावा व मुंबईला जावे.

       जवळजवळ अठरा महिने श्रेयाने त्यांच्याबरोबर शिक्षण घेतले आणि नंतर मुंबईत असलेल्या मुक्ता भिडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले श्रेया पदवीधर आहे.

     2000 मध्ये सा रे ग म पा ची दुसरी स्पर्धा जाहीर झाली. श्रेयाने त्यात भाग घेतला. या वेळेची स्पर्धा लहानांसाठी नव्हती. अठराच्या पुढची होती. स्पर्धेतील तिच्या गाण्याने प्रख्यात सिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा आवाज सादरीकरणाचा ढंग, संगीताची जाण व सुरेलता सगळेच वाखाणण्यासारखे वाटले. आणि एका प्रख्यात आणि यशस्वी दिग्दर्शकाने त्यांच्या देवदास या चित्रपटातील अति महत्त्वाची असलेल्या मध्यवर्ती भूमिकेसाठी गाण्याची संधी दिली. पारोच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या रॉय होती. श्रेयाने पाच गाणी गायली. संगीत दिग्दर्शक ' इस्माईल दरबार' तो सिनेमा भारतातच नव्हे तर जगभर गाजला. श्रेयाचा आवाज जगाने ऐकला आणि एका रात्रीत श्रेया घोषाल ही अल्का याग्निक, सुनीती चव्हाण, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती ह्यांच्या रांगेत गेली. उत्तम पार्श्वगायिकांत तिचा समावेश झाला. त्याच वेळी या गाण्यांनी तिला उत्कृष्ट पार्श्वगायक यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिले. आर. डी .बर्मन यांचे अवॉर्ड पण तिने मिळविले. देवदास पासून तिच्या संगीतातल्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आणि त्यानंतर तिने अनेक संगीतकारांच्या बरोबर काम केले. उदाहरण ए .आर .रहमान ,अनु मलिक ,हिमेश रेशमिया ,मनी शर्मा, नदीम-श्रवण ,प्रीतम ,विशाल-शेखर. दक्षिणेकडील सिने व्यवसाय (North and south film industry )अनेक सन्मान मिळविले.

     भुलभुलैय्या यामधील गाणे मेरे ढोलना है तुफान गाजले. आणि त्या गाण्याचे सर्वत्र कौतुक झाले.

     आज श्रेया घोषाल सिने जगातील प्रस्थापित पार्श्वगायिका समजली जाते.

    अनेक प्रांतीय भाषा शेतीची गाणी ध्वनिमुद्रित झालेली आहेत. हिंदी बरोबर तेलगू ,बेंगाली, कन्नड ,गुजराथी ,मराठी आणि भोजपुरी याशिवाय अमूल स्टार ऑफ इंडिया, छोटे उस्ताद परीक्षक म्हणून तिला संधी मिळाली आहे.

      श्रेयाने आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केले आहे. आता साहित्यात एम .ए करण्याची तिची इच्छा आहे. पाश्चिमात्य संगीतातील सिंफनी वाद्यवृंद संगीत यात तिला रस आहे. पण हिंदुस्तानी संगीत हा तिचा आत्मा आहे असे ती सांगते.

      श्रेया घोषाल हिच्या आवाजाचा पोत शृंगारिक गाण्यांना योग्य असा आहे. देवदास शिवाय आणखीन बऱ्याच सिनेमांना तिने आवाज दिला आहे उदाहरण जिस्म ,साया ,मुन्नाभाई एम .बी .बी .एस, धूम ,कुछ कहा आपने ,तुझे मेरी कसम ,गजनि ,कुर्बान, थ्री इडियट्स इत्यादी. श्रेया ही एकमेव ऐश्वर्य गायिका आहे की 2007 नो मिनिट्स झालेल्या पाच गाण्यांपैकी चार गाणी तिची होती.

        श्रेया ला मिळालेले राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड्स

2002 : नॅशनल फिल्म ॲवॉर्ड फॉर बेस्ट पार्श्वगायिका  सिनेमा देवदास

2006 : नॅशनल अवॉर्ड सिनेमा पहेली

2007 आणि 2008 : सिनेमा जोगवा

 फिल्मफेअर अवॉर्ड : 2007,2008 हे दक्षिणेकडील सिनेमाबद्दल आहेत.

2003 : एस .डी .बर्मन सन्मान नवा आवाज

आयफा सन्मान (IIFA Awards)

 2003 : उत्तम स्त्रीप पार्श्वगायिका, : देवदास (डोलारे )

 2008 : स्त्रीप पार्श्वगायिका : गुरु (बरसो रे )

2009 : ला पण तिसऱ्याँदा हा सन्मान तिला मिळाला.

स्टार स्क्रीन अवॉर्ड : 2004 ,2006 ,2008 जाडो हाय निशा , पियु बोले, आणि बरसो रे या श्रेया घोषाल हिला मिळाले आणि अन्य पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.

 स्टार डस्ट अवॉर्ड : 2003

 आंध्रप्रदेश स्टेट अवॉर्ड : 2005

तामिळनाडू स्टेट फिल्मअवॉर्ड : 2007

2008 ला अप्सरा अवॉर्ड हे चे अवॉर्ड2009 आणि 2010 ला पण मिळाले आहे.

      या सन्मानाच्या यादीकडे भक्तांना सहज मनात येते की श्रेया घोषाल च्या पुढच्या कारकिर्दीत सन्मानाची यादी वाढतच राहील कारण ती अजून लहान आहे.

    सन्मान देणाऱ्या संस्था पण वाढतच आहे, तिला मिळालेले राष्ट्रीय सन्मान 4 तर फिल्मफेअर नॉर्थ आणि साऊथ मिळून ऐकून 7 आय फाय अवॉर्ड्स 4 झी सिनेमा अवॉर्ड 3 स्टार स्क्रीन 2 आणि इतर 8.


जावेद अख्तर [ Javed Akhtar information in Marathi ]

 

Javed Akhtar Information in Marathi
Javed Akhtar Information in Marathi


जावेद यांचे वडील हे नामवंत उर्दू कवी होते. त्यांचे नाव जान निसार अख्तर.

    जावेद यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे झाला. ग्वालेर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध आहे. तेथेच जावेद यांचा जन्म झाला. हा योगायोग!

      1964 मध्ये भोपाळ येथील सोफिया कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

       जावेद यांचे ठेवलेले नाव ' जादो' हे नाव त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या कवितेच्या एका ओळीतून घेतले आहे.

       4 ऑक्टोबर 1964 मध्ये जावेद साब मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर पहिले काही दिवस ते छोट्या सिनेमांचे संवाद लिहून देण्याचे काम करीत होते. शंभर रुपये घेऊन संवाद लिहून द्यायचे हा त्यांचा व्यवसाय होता. मुंबईत नव्या माणसाला स्थिर व्हायला भरपूर श्रम घ्यावे लागतात. अंगाचे कौशल्य दाखवून स्वतःला सिद्ध करावे लागते. त्या नियमानुसार जावेद यांना पण खूप अडचणी आल्या. त्यावेळी त्यांनी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले ते संहिता (Script Writer ) लेखक म्हणून.

        जावेद त्यांच्या सिनेमाची संहिता प्रथम उर्दू भाषेत लिहून काढीत असत. उर्दूत संहिता तयार झाल्यानंतर त्या संहितेचे रूपांतर हिंदीत करण्याचे काम त्यांचे सहकारी होते त्यापैकी एक जण करीत असे. एवढ्याने संहिता पूर्ण होत नसे . तर कथेचे, संहितेचे सार ( ज्येष्ठ) इंग्रजीत एक दोन ओळीत लिहून काढले जात असे व नंतर ती संहिता पूर्ण होत असे.

        1980 पर्यंत जावेद यांनी सलीम बरोबर काम केले पण त्यानंतर जावेद यांनी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. काही संहिता स्वतः लिहिल्या. चित्रपट संहितांचे लेखन करण्यापेक्षा चित्रपटासाठी गाणी लिहिण्याकडे त्यांचा जास्त कल होता.

        त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. हा बदल त्यांना फार मोठे यश व नाव देऊन गेला. त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहिली त्यांतील काही गाण्यांनी तर इतिहास घडविला. गीत लेखक म्हणून सिनेक्षेत्रात त्यांचे नाव झाले. उदाहरण सिलसिला, मिस्टर इंडिया, तेजाब, 1942 अ लव स्टोरी इत्यादी तेजाब मधील माधुरी दीक्षित वर चित्रीत झालेली नृत्यगीत एक-दोन-तीन या गाण्यांनी इतिहास घडविला जागतिक रेकॉर्ड मोडले. जवळजवळ दोन वर्ष हे गाणे एखाद्या मंत्रा प्रमाणे हे गाणे प्रत्येकाच्या मुखी ऐकू येत होते.

        जावेद यांची बरीच गाणी गाजली. लोकप्रिय झाली त्यामागे काही खास कारणे होती पहिले कारण म्हणजे गाण्याचा ठेका, गाणे सुरू होताच त्या ठेक्यानी प्रेक्षक गडबडून जागा होतो एक चित्त होतो. गाण्यात बुडून जातो . दुसरे गाण्यातील मधुरता, प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचे कौशल्य व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जावेद यांनी सिने संगीताबरोबरच गंभीर प्रकृतीच्या उर्दू कविता पण लिहिल्या आहेत .

        जावेद यांना दहा वेळेला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. ती संगीतासाठी त्यांच्या गाण्यांसाठी कधीकधी त्यांच्या गाण्यात उदासिनतेचा भास होतो. पण तरी ती गाणी मनाला स्पर्श करून जातात.

       आफ्टर हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्त्व होय.

    जावेद हे उत्तम उर्दू कवी, संहिता लेखक, मेलेडी मेकर यादी करायची म्हटली तर ती संपणार नाही. दूरदर्शनवरील संगीताच्या कार्यक्रमात रियालिटी शोमध्ये संगीतातले आयडॉल शोधणारी जी स्पर्धा झाली तेथे सोनाली बेंद्रे, अनु मलिक, कैलास खेर, यांच्या बरोबर जावेद पण परीक्षक होते.

       ओरियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन या संस्थेच्या सल्लागार समितीचे ते एक सदस्य होते.

        1999 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या किताबाने त्यांना सन्मानित केले गेले.

 

पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा (संतूर वादक ) [ Pandit Shiv Kumar Sharma information in Marathi ]

 

Pandit Shivkumar Sharma Information in Marathi
Pandit Shivkumar Sharma Information in Marathi

      'संतूर' ह्या वाद्याचे नाव कानावर पडताच, चटकन डोळ्यासमोर नाव येते ते पंडित शिवकुमार शर्मा यांचे. पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म इ .स .1938 सालातला. पंडित शिवकुमार शर्मा यांचे व्यक्तिमत्त्व उमदे आणि प्रसन्न आहे.'संतूर' हे वाद्य मुळातले काश्मीरमधील समजले जाते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी 'संतूर 'या वाद्यास शततंत्रीविणा'असे म्हणत असत. हे वाद्य'सुफियाना मौसुकी' नावाची गानशैली सादर करताना गायक कलाकार आपल्या साथीस त्या काळात वापरत असत.

       बनारसचे पंडित बडे रामदासजी यांचे शिष्य पंडित उमादत्त शर्मा, हे जम्मूचे राहणारे होते. उमादत्त शर्मा यांनी या वाद्याचे सामर्थ्य जाणले. या वाद्यावर त्यांनी बरेच संशोधन केले, मुळवाद्यात काही बदल घडवून आणले आणि वाद्य लोकांसमोर आणले. वाद्य पुढे आणले म्हणजेच समाजाला माहीत करून दिले. पंडित उमा दत्त शर्मा यांनी या वाद्याला तू प्रतिष्ठा मिळवून दे असे सांगून त्यांनी ते शिवकुमार शर्मा यांच्या स्वाधीन केले.

      वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या सुपुत्राने म्हणजे शिवकुमार शर्मा यांनी बैठकीत वाजविण्याचे एकल वाद्य म्हणून या वाद्यास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सुरुवातीला पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादनाचे कार्यक्रम आकाशवाणीवर होऊ लागले. ते कार्यक्रम रसिकांना आवडू लागले. नव्या वाद्याची ओळख लोकांना झाली आणि पुढे पंडित संतूर वादनाचे नाव  झाले. पंडितजींचे नाव झाले.

    अशा या प्रतिष्ठा प्राप्त वाद्याचा आणि वादकाचा फायदा चित्रपट सृष्टीने घेतला.

    सिलसिला ,लम्हे, चांदणी हे अतिशय गाजलेले चित्रपट त्या चित्रपटातून पंडितजींच्या रचनांचा व वाद्याचा ठसा उमटला गेला

      शिव कुमार यांच्या पुढचा सांगितीक प्रवास पाहिला तर असे दिसून येते की विविध  रागांच्या एल पी रेकॉर्ड, सीडी तसेच ऑडिओ कॅसेटचे बरेच अल्बम निघाले व ते लोकप्रिय झाले. संतूर व संतूरवादक लोकप्रिय झाला.

     पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाची साठी ओलांडली तरी त्यांची वादन  साधना चालू आहे. रंगमंचावर पदार्पण करताच त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व रसिक मनाचा ताबा घेतो.

      युवा पिढीत एक तरुण संतूरवादक लोकप्रिय होत आहेत. ते म्हणजे श्री उल्हास बापट होय. त्यांच्या संतूरवादनाला अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

       1986 साली त्यांना 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार देऊन सन्मानित केले. 1990 चाली त्यांना महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने सन्मानित केले गेले. 1991 सालची जम्मू ची संगीतातील डॉक्टरेट ही पदवी त्यांना देण्यात आली. भारत सरकारची पद्मश्री 2009 सली पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना दिला गेला.


भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ  (सनई वादक ) [ Ustad Bismilla Khan information in Marathi ]

Ustad Bismilla Khan Information in Marathi
Ustad Bismilla Khan Information in Marathi


   नाव उच्चारताच सनईचे जिवंत आणि मंजुळ स्वर कानात घुमू लागतात, असे एकमेव नाव म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान. सनई वादनातील सर्वे सर्वा म्हणावयास हरकत नाही.

       शास्त्रीय वाद्य संगीतात सनईला आज सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय उस्ताद बिस्मिल्ला खान यांना द्यावे लागेल.

       15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. लाल किल्ल्यावर खान साहेबांचे सनईवादन झाले व स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद सोहळा संपन्न झाला.

       अशा या थोर सनईवादकाचा जन्म बिहारमधील डुमराव गावी 16 मार्च 1916 साली झाला. कुटुंब गरीब होते. त्यांच्या घरातच संगीताचा वारसा होता. त्यांचे गुरू म्हणजे बनारसचे अली बक्ष. ते नुसतेच गुरु नव्हते तर त्यांचे मामा होते. मामा बरोबरच वडिलांकडून पण त्यांना शिक्षण मिळाले.

       लहानपणापासूनच संगीताबरोबरच, भक्ती व आध्यात्मिक विचारांच्या संस्कारात ते वाढले. गुरुवर फार मोठी श्रद्धा. कुठल्याही धर्माशी त्यांचे देणे घेणे नव्हते. संगीत हाच त्यांचा धर्म. अल्ला, शंकर हे एकच मानणारे बिस्मिल्ला खाँ होते. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात परंपरेने सनईवादन करण्याची पद्धती त्यांच्यापर्यंत चालत आली.

       स्वभावाने अतिशय नम्र, साधी वेशभूषा व राहणी, निरपेक्ष बुद्धीने व वृत्तीने विद्यादान, अहंकार कुठेच नाही. हा त्यांचा स्वभाव त्यांच्या मनातले गाणे सनईतून बाहेर पडत असल्याने सनईच गाते आहे असे वाटते.

      त्यांचा नमाज म्हणजे सात शुद्ध आणि पाच कोमल स्वर. ते सरस्वतीचे भक्त, जिला संगीताची देवता मानतात. हिंदू देवतात सरस्वतीला विद्येची देवता मानतात.

     खाँसाहेबांच्या गुरुजींनी त्यांना जी शिकवण दिली ती फार मौल्यवान आहे ती अशी आहे. स्वर, ताल, राग हे एकच आहेत. फक्त त्यांच्या आविष्काराची पद्धती वेगळी, त्यातून घराण्यांचा जन्म झाला.  अनेक सन्मानातील पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री तानसेन असे अनेक सन्मान त्यांना दिले गेले.

       सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न सन्मानांनी त्यांना गौरविले गेले. निवृत्त, तृप्त जीवन घालविण्यासाठी गंगातीरी असलेले बनारस शहर निवडले.

 

आर .डी .बर्मन [ R. D. Berman information in Marathi ]

 

R D Burman Information in Marathi
R D Burman Information in Marathi

राहुल देव बर्मन, सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र, यांचा जन्म ई . स . 27 जून 1939 मध्ये कलकत्ता येथे झाला. एका हिंदू शत्रिय कुटुंबात ते जन्मले. संगीत आणि स्त्रर यांचे जन्मापासून नाते, यांचा जन्म राजघराण्यात झालेला, त्रिपुरा चे राजघराणे . आर. डी. बर्मन यांचे टोपण नाव ( Nickname ) पंचमदा हेच सिनेक्षेत्रात सर्व परिचित असलेले नाव. हे नाव कसे पडले यामागे एक रंजक कथा आहे.

     असे सांगतात की, राहुल देव बर्मन जन्माला आल्यानंतर प्रथम रडले ते रडणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ते सात स्वर आहेत त्यापैकी ' पा 'हा स्वर होता. बंगाली आणि संस्कृत भाषेत पंचम चा अर्थ पाच असाच आहे. आणखीन एक गमतीदार कथा सांगतात ती अशी, प्रख्यात हिंदी सिनेमा अशोक कुमार यांनी जेव्हा या नवजात अर्भकास पाहिले त्यावेळी त्यांच्या तोंडातून सप्तकाची पाचवी नोट (स्वर ) उच्चारली जात होती. पंचमदा हें त्यांचे नाव कायम झाले. यांच्यावरील दोन कारणे राहुल देव बर्मन यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्ता येथील बालीगंज गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये झाले.

     मुंबईला आल्यानंतर त्यांनी 'सरोद 'वादन शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे गुरू होते नामवंत सरोद वादक उस्ताद अली अकबर खान.

       आर डी बर्मन यांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिले गाणे रचले, जे गाणे त्यांच्या वडिलांनी 1956 साली फंटूश या सिनेमात वापरले. गाणे होते ' ए मेरे टोपी पलट के आ'लहान वयातील ' सर जो तेरा चक्रये'या गाण्याचे ट्युनस आर डी ह्यांचे होते. वडिलांना ते ट्यून्स आवडले आणि त्यांनीही ते गुरुदत्तच्या प्यासासाठी वापरले .

       प्यासाच्या साउंडट्रॅकची निवड एक उत्कृष्ट सिनेसंगीत म्हणून झाली होती.

       देवानंद नायक असलेला 1958 सालातला 'सोलवा साल 'या सिनेमातील गाजलेले गाणे 'हे अपना दिल तो आवारा' या गाण्यासाठी पंचमदा ने माउथ ऑर्गन वाजविला होता. तेव्हा त्यांचे वय लहानच होते.

       आर. डी. बर्मन ह्यांनी संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. ती वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे सहकारी म्हणून पडद्यावर आलेल्या त्यांच्या 331 सिनेमांचा मांडायचे तर 292 हिंदी, 31 बंगाली, तीन तेलगू , एक तामिळ, उरियाआणि एक मराठी.

       आर. डी. बर्मन यांनी फक्त सिनेमासाठी संगीत दिले नाही तर पाच दूरदर्शन वरील मालिकांसाठी पण संगीत दिले आहे. त्यात हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील मालिका आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने बांगला गाणी. ज्यांना पूजा गाणी म्हणता येईल म्हणजे भक्ती गीते असे वेगवेगळे अल्बम सापडतात. आर. डी. बर्मन यांनी संगीतकार म्हणून वडिलांच्या हाताखाली ज्या सिनेमातील गाणी केली ते सिनेमे 1958 मध्ये पडद्यावरच आलेला 'चलती का नाम गाडी' 1959 मधला 'कागज के फूल' संगीतकार म्हणून आलेला त्यांचा पहिला गुरुदत्त यांचा राझ 19 59 साली तयार झाला, पण पूर्ण झाला नाही. काही गाणी, चित्रीत झाली होती, पुढे बंद पडला. 1960 नंतर पडद्यावर आलेला पहिला सिनेमा 'छोटा नवाब 'हा 1961 मध्ये रिलीज झाला. संगीत होते बर्मन यांचे. त्यांतील पहिले गाणे 'घर आजा 'हे लतादीदींनी गायले होते, या गाण्यांनी लता आणि एस .डी .बर्मन हे परत मतभेद संपवून एकत्र काम करू लागले.

       1963 मधला 'बंदिनी '1965 मधला 'तीन देवीया 'आणि गाईड हे सिनेमे आर .डी .बर्मन यांनी आई-वडिलांच्या बरोबरच केले. मेहबूब यांनी त्यांचा भूत बंगला या सिनेमाचे संगीतकार म्हणून आणखीन एक सिनेमा 1965 मध्ये दिला.

      बर्मन यांचा पहिला गाजलेला सिनेमा होता तिसरी मंजिल.  त्यातील गाणी गाजली याचे श्रेय संगीतकाराला जेवढे दिले जाते तेवढ्याच वाटा गीतकाराचा पण असतो. ते तीसरी मंजिलचे गीतकार होते. 'मजरूह सुलतानपुरी ' यांनीच आर.डी.ची शिफारस निर्माते आणि लेखक असलेल्या नासिर हुसेन यांच्याकडे केली होती.

       संगीतकार म्हणून शम्मी कपूर यांना शंकर-जयकिशन हवे होते. परंतु आर .डी. बर्मन यांनी दिलेले संगीत ऐकल्यावर त्यांनी बर्मन यांना होकार दिला.

        ओ हसिना आणि आजा आजा या गाण्यांची शैली हिंदुस्तानी संगीताची होती. सिनेमातली गाणी मोहम्मद रफी व आशा भोसले यांनी गायलेली. 1975 मधला 'मिली ' सिनेमा एस .डी .बर्मन यांचे संगीत होते. पण त्यांच्या प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे ते पूर्ण झाले नव्हते. वडिलांच्यानंतर आर .डी .बर्मन यांनी ते पूर्ण केले.

     यावेळी संगीतकार म्हणून त्यांच्याकडे आठ सिनेमे होते.

   मेहबूबा (1976) पुनर्जन्मावर आधारित सिनेमा होता व राजेश खन्ना डबल रोल मध्ये होते.

      नऊ सिनेमे 1977 मध्ये पडद्यावर आले. पण म्हणावे तसे गाजले नाहीत. 1978 मध्ये आर .डी .बर्मन यांचे आणखी नऊ सिनेमे रिलीज झाले. शालिमार आणि कसमे वादे धरून शाली मार ने 'हम बेवफा हरगिज ना थे 'हे किशोर कुमार चे गाणे गाजले.

        1979 संपूर्ण वर्ष आर .डी .चे होते, असे म्हटले तरी चालेल. दहा सिनेमांचे संगीतकार म्हणून त्यांनी काम केले. या सर्व सिनेमात सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला सिनेमा होता 'गोलमाल 'व रसिक पसंत गाणी 'आनेवाला पल 'किशोर कुमार आणि शीर्षक गीत 'गोलमाल है भाई सब गोलमाल है 'आर .डी. बर्मन ची काही लोकप्रिय झालेली गाणी 'जीवन के हर मोड पे ' (झुटा काही का ) रिमझिम गिरे सावन (मंजिल) सावन ही झुले (जुर्माना)

        1980 मध्ये 10 सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी गाण्यांच्या दृष्टीने ' कुदरत 'हमे तुमसे प्यार कितना 'गीत दोनदा ध्वनीमुद्रित केले. पुरुष गायक किशोर कुमार व उत्कृष्ट गायिका परवीन सुलताना स्त्री पार्श्वगायिकेला उत्कृष्ट स्त्री पार्श्वगायिका सन्मान मिळाला.

      संगीत गाजलेले पण न चाललेले दोन सिनेमे एक बर्निंग ट्रेन आणि दुसरा 'शान'. बर्निंग ट्रेन या सिनेमात शाहिर लुधियानवी यांची आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी गायलेली कव्वाली पल दो पल का साथ हमारा ही बरीच गाजली .

    1981 मध्ये आर .डी. बर्मन यांनी पंधरा सिनेमे केले.

   1982 मध्ये 14 साउंडट्रॅक रिलीज झाले.

आर डी बर्मन यांना पहिले फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट म्यूझिक 1981 मध्ये मिळाले ते 'सनम तेरी कसम'या सिनेमाच्या संगीतासाठी बारा वर्ष नॉमिनेशन मिळत होते.  पण प्रत्यक्ष बक्षीस मात्र मिळाले नव्हते. 1983 मध्ये आर .डी .बर्मन यांचे 15 साउंडट्रॅक रिलीज झाले होते. त्यापैकी 'मासूम 'आणि 'अगर तुम ना होते 'हे चालले व दुसरे फिल्मफेअर ॲवॉर्ड फॉर बेस्ट म्यूझिक हे मासूम साठी मिळाले.

       1985 मध्ये 12 साऊंड ट्रॅक पैकी दोन फक्त गाजले.

    पुढे त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. शिवा का इंसाफ (1985 ) आर .डी .बर्मन आणि नासिर हुसेन 'जबरदस्त 'चांगलाच पडला. पुढे नासिर हुसेन यांनी सिनेमा डायरेक्शन सोडले आणि सर्व सूत्र आपल्या मुलाच्या हाती दिली. मन्सूर खानने नवा संगीतकार शोधण्यास सुरुवात केली. बोलताना मात्र असे भासवले की आम्ही पंचमदांनी यांना गाळणार नाही, पण त्यांनी संगीतकार म्हणून आपली शैली अथवा संगीत देण्याची पद्धती बदलावी. पंचमदाना हे मान्य झाले नाही आणि बरीच वर्ष यशस्वीपणे काम करीत असलेली हुसेन आणि पंच मदा यांची पार्टनरशिप मात्र संपली. जवळ जवळ वीस वर्ष 1966 ते 1985 मोठा कालखंड दोघांनी एकत्र काम करून क्षेत्राला कायम लक्षात राहील असे सिनेमे व संगीत दिले होते.

          1987 मध्ये गुलजार, आर .डी .बर्मन आणि आशा भोसले यांनी एकत्र येऊन अल्बम केले.

     1987 ते 1990 हा काळ आर.डी .साठी चांगला गेला नाही. सुभाष घईने त्यांना राम लखन चे संगीत देण्याचे वचन दिले होते परंतु तसे घडले नाही. ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे गेले. ही गोष्ट आर .डी .च्या करियरला धक्कादायक ठरली, ते नाराज झाले, अस्वस्थ झा ले.

        त्यांना हार्ट अटॅक आला. ऑपरेशन करावे लागले. या उदास काळात त्यांनी काही ट्यून्सची रचना केली पण ती प्रसिद्ध झाली नाही.

        1990मध्ये 2, 1991 मध्ये तीन, 1992 मध्ये सहा, 1994 मध्ये चार, अशा सिनेमांना त्यांनी संगीत दिले. त्यापैकी 1 942 मध्ये लव स्टोरी हा प्रचंड अविस्मरणीय असा गाजला आणि आर.डी .ना तिसरे व शेवटचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले पण तेव्हा ते नव्हते.

    आजही त्यांनी संगीत दिलेली काही गाणी ताजी वाटतात. ती गाणी अजरामर झाली आहेत. उदाहरण 1) जाने क्या तूने कहा 2) ओ हसीना 3) रेना बी ते जा 4) बुड्ढा मिल गया 5) दम मारो दम 6) महबूबा महबूबा 7) तेरे बिना जिंदगी 8) इस मोड से 9) पुछो ना यार 10) अगर तुम ना होते.


अनु मलिक [ Anu Malik information in Marathi ]

Anu Malik Information in Marathi
Anu Malik Information in Marathi

सिने विश्वातील एक महान , दहाडी चे संगीत दिग्दर्शक अन्नू मलिक यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1960 मधला. जुने जाणते संगीतकार सरदार मलिक यांचा मुलगा आणि अबु मलिक व डेबू मलिक यांचा भाऊ. अनु मलिक यांनी संगीताचे शिक्षण पंडित राम प्रसाद शर्मा यांच्याकडून घेतले( बाबाजी ).

          1981 साला सिनेक्षेत्रात त्यांनी प्रथम पदार्पण केले त्या सिनेमाचे नाव 'पुनम ' असे होते.

         सोनी महिवाल आणि गंगा जमुना सरस्वतीया सिनेमाच्यासाठीपण संगीतकार म्हणून काम केले. परंतु या सिनेमांनी त्यांना म्हणावे अशी ओळख मिळाली नाही. फारसे नाव व यश मिळाले नाही. असे असून सुद्धा ' एक सी मेहे राज ' ईगल फिल्मचे निर्माते मात्र परत त्यांच्याकडे येत असत. चांगले यश मिळण्याचा एक काळ असतो. योग्य वेळ यावी लागते हे खरे आणि ती वेळ 1993 मध्ये आली. फिर तेरी कहानी , जनम, सर आणि बाजीगर या सिनेमांनी अनु मलिक पुढे आले. नुसते पुढे आले नाही तर बाजीगर या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाले.

         2001 सालात त्यांनी आपले कौशल्य दाखविले ते अक्स, फिजा, फिल्हाल आणि मुझे कुछ कहना है हे सिनेमे पडद्यावर आले. या सिनेमांनी त्यांचे कर्तृत्व आणि कौशल्य रसिकांच्या समोर आणले.

         अनु मलिक यांचे नवे जे सिनेमे गाजले त्यात लव स्टोरी 2050, जानेमन आणि उमराव जान यांचा उल्लेख करावा लागेल.

          भारतीय संगीत दिग्दर्शकात एक अष्टपैलू संगीतकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जे सर्व प्रकारचे संगीत देऊ शकतात असे अनु मलिक आहेत. त्यांना घवघवीत यश मिळते ते प्रयत्न करतात रसिकांना नावीन्य हवे असते हे त्यांना समजले आहे.

           दरवेळी काहीतरी नवे देणे या त्यांच्या वेगळेपणा बरोबरच आणखीन एक त्यांची खासियत आहे ती म्हणजे गीतकार आणि गायक यांची अचूक निवड. संगीतात व गायकांत तोच तोच पणा आणणे त्यांना आवडत नाही,  बदल हवा असतो. अनु मलिक नव्या सिनेमासाठी नवा गीतकार व नवा गायक यांना संधी देताना दिसून येतो. बॉर्डर सिनेमा मधील 'घर कब आओगे 'या गाण्यासाठी सोनू निगम सारखा गायक निवडला. अनु मलिक यांच्या सिनेमात महत्त्वाचे गायक म्हणून के. के आणि कुणाल गांजा वाला यांचा बराच वेळा समावेश असतो. अनु मलिक यांचे जे अल्बम गाजले आहेत त्यात एकच गीतकार नसतो.

          अनु मलिक काही वेळेला दक्षिणेकडील गायक पण गाण्यास वापरतो उदाहरण बालसुब्रमण्यम आणि चित्रा.

          गुलजार आणि 2001 मध्ये त्यांनी रिफ्यूजी, जोश , हर दिल जो प्यार करेगा, फिजा, अक्स, अशोका, फिल्हाल आणि मुझे कुछ कहना है हे सिनेमे केले.

         संगीत दिग्दर्शनाचे फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना बाजीगर साठी मिळाले. अलिषा चीनाई आणि अनु मलिक यांचे एकत्र येऊन काम करणे हे अनु मलिकला यशाकडे घेऊन गेले. तिने अनेक हिट्स दिले. उदाहरण सेक्सी सेक्सी, रुक रुक रुक.

       जे. पी. दत्ता प्रसिद्ध सिने दिग्दर्शक यांनी उत्तम सिनेमे दिले. यात अनु मलिक यांचा महत्त्वाचा सहभाग होता.उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम संगीतकार एकत्र आल्यामुळे बॉर्डर 1997, रेफ्युजी 2000, लॉ कारगिल 2003 हे सिनेमे आणि उमराव जान 2006 हे सिनेमे खूपच गाजले.

         मलिक यांनी अनेक पार्श्व गायक यांच्याबरोबर काम केले आहे. उदाहरण कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, शान, अभिजीत, के. के आणि सुनीती चव्हाण.

     ई. स. 2006 मध्ये मलिक यांनी गायिका म्हणून आपल्या मुलीला प्रथम संधी दिली.

      ' इंडियन आयडॉल' या स्पर्धेचे जेवढे भाग झाले त्यांत अगदी सुरुवातीच्या शोपासून मलिक हे परीक्षक म्हणून काम करीत आहेत. पहिल्या दोन शोजमध्ये सोनू निगम आणि फरा खान त्यांच्याबरोबर परीक्षक म्हणून होते. आणि तिसऱ्या वेळी आलिशा चिनॉय, उदित नारायण, आणि जावेद अख्तर हे त्यांच्या बरोबर होते.

      पहिले ओरियन आयडॉल इंडोनेशियामध्ये झाले त्यावेळी पण मलिक एक परीक्षक म्हणून होते.

  

बप्पी लाहिरी [ Bappi Leheri information in Marathi ]

 

Bappi Lahiri Information in Marathi
Bappi Lahiri Information in Marathi

बप्पी लाहिरी यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. जन्मल्याबरोबर बाळाने काय ऐकले? आपल्या वडिलांचे गाणे ऐकले. आणि आईचा शास्त्रीय संगीताचा सूर ऐकला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन काही भाग्यवान मुले जन्माला येतात. त्याच प्रमाणे काही मुले जन्माला आल्यावर रडतात ते सुद्धा सुरांत. त्यांचे वडील अपरेश लाहिरी हे एक नामवंत गायक होते. त्यांची आई बनसारी लाहिरी या भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यास गायिका होत्या. घरात स्वरांचे राज्य होते. त्यामुळे तो संस्कार नकळत झाला.

        बप्पी लाहिरी यांना अगदी लहान वयापासूनच संगीताचे वेड होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते आपल्या वडिलांच्या स्टेजशोना त्यांच्या बरोबर जात असत. आणि वडिलांच्या गाण्याला तबलासाथ करीत असत.

       संगीत क्षेत्रातच करिअर करायचे हे ठरलेलेच होते. बप्पी लाहिरी यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा केला तो बंगाली सिनेमा होता. सिनेमाचे नाव ' दादू ' असे होते. त्यावेळी संगीत दिग्दर्शकाचे वय होते फक्त सोळा वर्ष.

       अनेक बंगाली निर्माते आणि संगीत दिग्दर्शक शेवटी करिअर साठी मुंबई गाठतात. कारण प्रांतिक भाषांमधल्या करियरला मर्यादा असतात. या करियर भोवती एक चौकट निर्माण होते व प्रगतीचा मार्ग खुंटतो.

        बप्पी लाहिरी त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईला आले.

         बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले. या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव होते ' नन्ना शिकारी '.

         हिंदी सिनेमात प्रथम 'डिस्कोची 'ओळख करून दिली ती त्यांनी आणि त्यामुळे प्रथम पदार्पणानंतर त्यांचे नाव झाले. त्यांना चांगले यश प्राप्त झाले. ' सुरक्षा' या सिनेमासाठी त्यांनी प्रथम डिस्कोचा संगीत प्रकार वापरला. जुन्या नृत्य प्रकाराला डिस्को नृत्यप्रकाराने  हादरा दिला असे म्हणायला हरकत नाही.

            संगीत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आलेले बप्पी लाहिरी क्वचित प्रसंगी आवाज पण देतात.

            बप्पी लाहिरी यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीत काही दुषणे पण सहन केलेली आहेत असे दिसून येते. एका वर्षात एकाच वेळी तीस सिनेमांना संगीत देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे आणि त्या विक्रमाची नोंद ' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड' यात झालेली आहे.


ए. आर. रहमान [ A. R. Rehman information in Marathi ]

 

A R Rehman Information in Marathi
A R Rehman Information in Marathi

भारतीय संगीतकार, गायक, संगीत रचनाकार आणि निर्माता-सिने जगातील एक आश्चर्य, मद्रास चा मोझार्ट -(मोझार्ट-जग प्रसिद्ध इटालियन सं.) यांचा जन्म 6 जानेवारी 1966 मध्ये तामिळनाडू चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील सिनेक्षेत्रातलेच होते. रहमानला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. त्यांच्या तरुणपणीच ते गेले. परिस्थिती अगदी बेताची होती. पैसे मिळविण्यासाठी घरात असलेली संगीताची सर्व साधने भाड्याने देऊन जगण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या आईने कस्तुरी ने (करीमा) त्याला मोठे केले.

      आज जरी ए. आर. रहमान या नावाने जगप्रसिद्ध झाला असला तरी त्याचे मूळचे नाव ए.एस.दिलीप कुमार होते.

       पडत्या काळात रहिमान यांचे यांचे ' रुट्स' (Roots) नावाच्या बँड मध्ये कीबोर्ड वाजविण्याची नोकरी केली. संगीत आणि वादन हे त्याच्याकडे वडिलांकडून आले असावे. रहमान हे सर्व कीबोर्ड पियानो, सिंथेसाइजर आणि हार्मोनियम ही सर्व वाद्य अगदी सफाईने वाजवीत असे.

       सिंथेसायझर बद्दलचे त्यांचे औत्सुक्य लक्ष वेधून घेणारे होते. त्यांच्या मते 'संगीत आणि तंत्रज्ञान'या दोन्ही चे उत्तम एकत्रीकरण म्हणजे सिंथसाईझर होय. आणि हा संयोग अनोखा आहे.असे त्यांना वाटत असे.

      वयाच्या अकराव्या वर्षी ए. आर. रहमान याने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली ती गुरु मास्टर धनराज यांच्याकडे. त्याच वयात त्यांनी एका वादकाच्या गटात कीबोर्ड वादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच ग्रुपला त्याच्या वडिलांनी भाड्याने वाद्य दिली होती.

        ऑर्केस्ट्रा मध्ये काम करून त्याने जगभर प्रवास केला. 'ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक'ची स्कॉलरशिप मिळाली व तेथे त्याने 'पाश्चिमात्य शास्त्रोक्त' संगीताची पदवी मिळविली. 1992 मध्ये त्यांनी स्वतःचा स्टुडिओ सुरू केला आणि तेथे रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग सुरू केले.

      अगदी सुरुवातीला छोट्या छोट्या जिंगल्स कंपोज केल्या. त्या जाहिरातींच्या साठी. (जिंगल्स-चार ओळींची लहान कविता) 1992 मध्ये रहमान प्रख्यात सिनेदिग्दर्शक 'मणिरत्नम'यांना भेटला व त्याची तामिल फिल्म ' रोझा'यासाठी ते रोझाचे स्कोर दोन आणि कंपोजर या कामासाठी. पहिल्या पदार्पणातूनच त्याला उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचे नॅशनल अवॉर्ड मिळाले. रजत कमळ अवॉर्ड पण मिळाले. यानंतर तीन वेळा 1997, 2002, आणि 003 हेच अवॉर्ड मिळाले.

        रोझाच्या संगीताने सिने संगीताचा चेहेरा-मोहरा बदलला. रहमानला एका यशस्वी संगीतकाराचे स्थान मिळाले. त्यानंतर तामिळ सिनेजगत आणि चेन्नई फिल्म इंडस्ट्रीत रहमान स्थिर झाला. त्याच्या साउंडट्रॅक ने त्याला ओळख, नाव, प्राप्त करून दिले.

         राम गोपाल वर्मा दिग्दर्शित'रंगीला 'या सिनेमाचे संगीत करून रहमान याने हिंदी सिनेजगतात पहिले पाऊल टाकले. आणि यानंतर आणि गाजलेल्या सिनेमाचे स्कॉर्स दिले. (Scores-संगीत लिपी. वृंद वादकांना गीत वादनासाठी मार्गदर्शन देणारी वाद्य लिपी) उदाहरण आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेस आणि रंग दे बसंती ही त्यांची उत्तम उदाहरणे आहेत. ए . आर. रहमान यांनी अनेक भारतीय कवी आणि गीतकार यांच्याबरोबर काम केले आहे. त्यातील काहीचा उल्लेख करायलाच हवा. जावेद अख्तर , गुलजार, आनंद बक्षी, पी. के. मेहरा, महबूब विरमुथ्थु.

       ए. आर. रहमान यांनी काही सिने दिग्दर्शकांच्या बरोबर एकत्र येऊन काम केले आणि त्यांच्या साऊंड ट्रॅकने त्या सिनेमांना यशस्वीतेकडे नेण्यास मोलाचे सहाय्य केले हे नाकारता येणार नाही. खासकरून उदाहरणादाखल नाम निर्देश करायचा तो मणिरत्नम या सिने दिग्दर्शकांबरोबरचे काम. मनी कांचन योग. 2005 साली ए. आर. रहमान यांनी आपल्या जुन्या स्टुडिओचे नूतनीकरण केले व त्याचबरोबर जुन्या स्टुडिओचे विस्तारीकरण पण केले.

       2005 सालातला चेन्नईमधला ' कोडंबकम' स्टुडिओ आशियामधला सर्व साधनांनी युक्त आणि प्रगत असा समजला जातो.

        2006 शालांत ए. आर. रहमान यांनी आपल्या संगीताला लेबलिंग केले ते ( K.M.Music) असे होत. सिनेक्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी बरेच काम केलेले आहे. 1997 मध्ये भारताच्या 50व्या स्वातंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 'वंदे मातरम 'हा अल्बम केला आहे व त्या अल्बमला बरेच आर्थिक यश प्राप्त झाले.

      त्या अल्बम च्या नंतर 'भारतबाला' साठी अल्बम काढला. जनगणमन त्यात भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या जाणकार कलावंतांचा सहभाग होता.

      1999 मध्ये कोरिओग्राफर शोभना आणि प्रभूदेव सुंदरम आणि तामिळ सिनेमा मृत्य गट यांच्यासह मायकल जॅक्सन बरोबर  म्यूनिच जर्मन दौरा केला. रहमान यांची संगीत शैली बनली ती अनेक संगीतातून असे म्हणावयास हरकत नाही.

       कर्नाटक संगीत, पाश्चिमात्य, शास्त्रीय संगीत, हिंदुस्तानी संगीत आणि कवाली ढंग तोसुद्धा नसरत फच अली खान यांचा.

        ए. आर. रहमान यांनी ' फ्यूजिंग' प्रकारात बरेच प्रयोग केलेले दिसतात व त्यावर काम पण केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या बरोबर नवीन इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि नवे तंत्रज्ञान यांचे एकत्रीकरण करून काही वेगळे निर्माण करणे शक्य आहे का ? याचा सतत विचार डोक्यात असे.

       संगीत निर्माता (Ron Fair ) यांच्या मते जगातील उत्तमातील एक संगीतकार आहे.

      त्यांना मिळालेले काही सन्मान : चार वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड, भारत सरकारचे 'पद्मश्री 'हा किताब सहा वेळा तामिळनाडू राज्य पुरस्कार तेरा फिल्म फेअर अवॉर्ड (दक्षिण ) हे त्यांच्या संगीतासाठी व स्कोरसाठी मिळाले आहेत.

       2006 मध्ये सेंडफोर्ड युनिव्हर्सिटी अवॉर्ड मिळाले ते जागतिक (Global music contribution ) संगीत सहकारासाठी .

       2009 मध्ये 'स्लम डॉग मिलेनियर 'या सिनेमासाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन.

 

शंकर - जयकिशन   [ Shankar Jaykishan information in Marathi ]

 

Shankar Jaykishan Information in Marathi
Shankar Jaykishan Information in Marathi

शंकर सिंग रघुवंशी यांचा जन्म 25 ऑक्टोंबर 1922 रोजी झाला. त्यांचे मूळचे गाव हैदराबाद होते. आपण म्हणतो ना लहान वयातच मूल घडत असते. संस्कार होत असतात त्याच वयात शंकर तबला वाजवत होता आणि तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बाबा नसीर खान साहेब यांच्याकडे घेण्यास सुरुवात केली.व बरेच वर्ष तबल्याचे शिक्षण घेतले. नंतर परमेश्‍वरी देणगी ज्याला प्राप्त झाली आहे अशा कानजी खुर्शीद अन्वर या महान संगीतकाराच्या सहवासात राहून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि नंतर त्यांच्याच ऑर्केस्ट्रात काम करण्यास सुरुवात केली.

       जयकिशन डायाभाई पांचाल हे जोडीतले दुसरे कलावंत यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी गुजरात मधील एका छोट्या गावात झाला. जय किशन हार्मोनियम (पेटी) वाजवित असत. त्यांनी संगीताचे शिक्षण वाडीलालजी यांच्याकडे घेतले. प्राथमिक शिक्षण वाडीलालजी यांच्याकडे घेतल्यानंतर पुढे त्यांनी प्रेम शंकर नायक यांचे शिष्यत्व पत्करले. पुढे मुंबईत आल्यानंतर श्री विनायक तांबे यांचे शिष्यत्व पत्करले.

        सत्यनारायण आणि हेमावती यांचा एक थिएटर ग्रुप होता . त्या ग्रुपमध्ये शंकरने आपल्या करिअरची सुरुवात केली. तबला वाजविणे आणि छोट्या छोट्या भूमिका करणे हे काम तिथे करीत असत. नंतर ते पृथ्वी थिएटरमधे तबला वाजवणे व छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली. हुस्नलाल भगत राम हे त्यावेळी आघाडीचे संगीतकार म्हणून काम करीत होते. त्यांचे मदतनिस म्हणून काम करण्यास शंकर यांनी सुरुवात केली. पृथ्वी थिएटर मध्ये काम करीत असताना सुद्धा चंद्रवदन भट्ट एक गुजराती डायरेक्टर यांच्या ऑफिसला शंकर वारंवार भेट देत असत. कारण चंद्रवदन भट यांनी शंकरला संगीत दिग्दर्शक म्हणून काम देण्याचे वचन दिले होते. फक्त सिनेमा निघण्याची शंकर वाट बघत होते.

        जय किशन- श्री भट्ट तिच्या ऑफिसच्या बाहेर बसलेला एक बार कुडा मुलगा एकदा शंकरने पाहिला पुढे तो अनेक वेळा तेथे बसलेला पाहून शंकरने त्याचा परिचय आपण होऊन करून घेतला तेव्हा त्याला कळले की आपण ज्या कामासाठी या निर्मात्याकडे वारंवार येतो त्याचं कामासाठी हा पण येतो. जय किशन त्याचे नाव व तो हार्मोनियम वादक आहे. आणि तेव्हापासून तबलावादक असलेले शंकर आणि पेटीवादक असलेले जयकिशन दोघे एकत्र आले आणि शंकर-जयकिशन ही एक प्रख्यात जोडी सिनेक्षेत्रात गाजली. पृथ्वी थिएटर मध्ये हर्मोनियम वादक म्हणून काम मिळण्यासाठी पृथ्वीराज कपूर, पप्पा यांच्याकडे जयकिशनसाठी शब्द पण शंकरने टाकला होता. पृथ्वीराज कपूर यांना शंकरची ही निवड आवडली आणि पृथ्वी थिएटरमध्ये पेटीवादक म्हणून जय किशन ला काम मिळाले.

     योगायोगाने दोघे एकत्र काम करू लागले. घट्ट मित्र झाले व प्रेक्षक त्यांचा उल्लेख शंकर-जयकिशन असा करू लागले. एकमेकांना समजून घेणे व एकमेकांच्या बद्दल आदर ठेवणे हे त्यांचे वेगळेपण होते. त्यामुळे त्या दोघांची संगीत जोडी तयार झाली.

        संगीत विभागात दोघे काम करू लागले. वादनाबरोबर ट्यून्स कंपोज करणे हे पण करू लागले. ते राज कपूर च्या संपर्कात सतत राहू लागले आणि दैवाने जबरदस्त हात दिला 1948 मध्ये राज कपूरने दिग्दर्शन क्षेत्रात प्रथम पदार्पण केले. व 'आग 'सिनेमा काढला. सिनेमा फार चालला नाही पण संगीत दिग्दर्शक राम गांगुली यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करण्याची पहिली संधी शंकर-जयकिशन यांना मिळाली. व आग चे संगीत मात्र लोकप्रिय झाले.

      राज कपूर चा दुसरा सिनेमा 'बरसात 'यावेळी राज कपूर व गांगुली यांच्यामध्ये वाद झाले आणि त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शनाचा योग शंकर ला मिळाला. शंकरने जय किशन ला पार्टनर म्हणून द्यावे असा आग्रह धरला व ही जोडी सिनेक्षेत्रात आली.

        1949 साली यांनी कारकिर्दीला सुरुवात केली तेच फार मोठी यशदाई ठरली. आर. के. प्रोडक्शन चा बरसात आणि संगीतकार दोन्ही एकदमच पुढे आले . बरसातची पूर्ण संगीत टीमच नवी तयार झाली. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी. पूर्वीचा बस कंडक्टर शंकरच्या आग्रहाखातर नुकताच उद्याला येणारा एक नवा आवाज लता मंगेशकर आणि मुकेश यांनी बरसातची सर्व गाणी गायली. त्या काळातले संगीतातले ते एकत्रीकरण होते.  पुढे हेच एकत्रीकरण एकमेव ठरले असते पण तसे घडले नाही महंमद रफी पण त्या एकत्रीकरणाचा एक उत्तम घटक बनला .

        'बरसात 'सिनेमा आणि संगीत प्रचंड गाजला भरपूर पैसा मिळाला. व सर्व उत्कृष्ट संगीतासाठी पण नाव मिळाले.

        लता मंगेशकर यांना फार मोठे नाव मिळाले. प्रस्थापित पार्श्वगायिकेचे स्थान प्रथम पदार्पणातच प्राप्त झाले. सिनेमाने शंकर-जयकिशन संगीतकार म्हणून सुपरस्टार ठरले त्यांना दुसरी स्पर्धाच नव्हती.

        बरसातने शंकर-जयकिशन यांच्यासाठी यशाची दारे खुली केली ती बंद झालीच नाही. त्यांत सुधारणा होत गेली. त्यांचा संगीत सहभाग सिनेमाच्या यशाचा मोठा वाटा ठरू लागला.

        सुरुवातीलाच त्यांनी जे हिट दिले ते : आवारा, आह, श्री 420, बसंत बहार, पतीता, कठपुतली, अनाडी, चोरी चोरी, बूट पॉलिश आणि उजाला.

         आवारा हू आणि मेरा जूता है जपानी ही दोन गाणी सोविएत युनियन पूर्व युरोपीयन देशात फारच गाजली. ही सर्व गाणी राज कपूर वर चित्रीत झालेली होती. त्यामुळे त्या भागात राज कपूर लोकप्रिय झाला.

        एस जे म्हणजेच शंकर-जयकिशन यांनी जवळजवळ सर्व गायकांच्या बरोबर काम केलेले दिसून येते. मन्ना डे, मुकेश, शैलेंद्र बरोबर काम करताना त्यांनी गीतकार म्हणून निरज वर्मा मलिक मजरूह सुलतान पुरी, विठ्ठलभाई पटेल आणि राजेंद्रकृष्ण राजेंद्रकुमार या सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या नटांच्या सिनेमांना ही यांनी संगीत दिले आहे.

      आर के चे संगीत म्हणजे एस. जे. करता घरचेच काम होते परंतु त्या शिवाय दुसरीकडे त्यांनी जे संगीतकार म्हणून काम केले ते तितकेच उत्तम केले आहे.

         राजकपुरने म्युझिक बँक तयार करून त्यात एस. जे. यांचे संगीत जतन करून ठेवलेले आहे. आजही त्यातले संगीत जे फार वापरले जाते .

      शंकर-जयकिशन यांच्या संगीताने हिंदी सिने संगीताचा चेहरा मोहराच बदलला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जानकारी बरोबरच, पाश्चिमात्य बिट्स व वाद्यवृंद पद्धती त्यात आली.

        सिनेमाच्या गाड्यांसाठी ऑर्केस्ट्रा वापरण्याची सुरुवात करणारे पहिले संगीतकार शंकर जयकिशन होते. सिने संगीतात ऑर्केस्ट्रा चा योग्य उपयोग कसा करावा त्याचबरोबर वाद्यांचा योग्य वापर कसा करावा व त्यांच्या मदतीने संगीत कसे सजवावे. ते त्यांनी दाखवून दिले असे म्हणतात की शंकर-जयकिशन were the pioneers in establishing the role of orchestra in song वाद्य दहा असावीत अथवा शंभर ही चालतील हे त्यांची मत. एस . जे. यांनी सिनेसंगीत जगतावर दोन दशकांपेक्षा जास्त काळ राज्य केले आहे. सतत काहीतरी नवी शैली व नवा फॉर्मेट ते शोधत असत.

       एस. जे. यांच्या वेळचे संगीतकार आणि त्यांच्यानंतर आलेले संगीतकार सुद्धा संगीत देताना त्यांनी जी चौकट ( फॉर्मेट) तयार केला. त्याचाच वापर करताना दिसतात. एस. जे. यांनी संगीतात बदल घडवून आणले, ध्वनीमुद्रणात आत वेगळेपणा आणला. मोठ्या प्रमाणात वाद्यांचा समावेश संगीतात केला. त्याच बरोबर ऐकणाऱ्या रसिकांच्या आवडी पण बद्दल नवे ऐकायला शिकवले. एस. जे. यांनी दुखी गाणी सादर करण्यासाठी वेगळी शैली वापरलेली दिसून येते.

         1960 नंतर शंकर-जयकिशन यांनी करिअर मध्ये खूप उंची गाठली होती. संगीत दिग्दर्शक म्हणून सर्वात जास्त किंमत या दोघांची होती. दुर्दैवाने दोघे अलग झाले व वेगवेगळे संगीत देऊ लागले तरी ते एकमेकांच्या बरोबर होते.

       सिने संगीताचा चेहरा-मो होरा बदलण्यासाठी त्याला नवे रूप देण्यासाठी वेग वेगळे प्रयोग करणारे दोन वेगळ्या राज्यातील वेगळी भाषा बोलणारे वेगळी वाद्ये वाजविणारे हे दोन संगीतकार दोघांनी इतिहास निर्माण केला.