Header Ads Widget

कुकीज कशी बनवतात? | कुकीजचे प्रकार कोणते? | Cookies Recipe In Marathi

 कुकीज म्हटलं की लहानापासून तर मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.

कुकीजचे अनेक प्रकार येतात पण आज आपण मुख्य १० प्रकार बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया.
1. कोकोनट कुकीज [ Coconut Cookies Recipe In Marathi ]


कोकोनट कुकीज
कोकोनट कुकीज

साहित्य : 100 ग्रॅम लोणी, दोन अंडी, 120 ग्रॅम साखर, 200 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम नारळाचे सुके खोबरे, एक चमचा बेकिंग पावडर, दोन-दोन थेंब बदामाचे व रोज इसेन्स, लागल्यास दूध.

कृती : मैदा आणि बेकिंग पावडर चाळावी. लोणी, साखर एकत्र घोटावे. त्यात फेटलेले अंडे थोडे थोडे घालावे व फेटत राहावे. इसेन्स घालावे व थोडा मैदा व थोडे खोबरे घालून पीठ मऊसर भिजवावे. नंतर मिश्रणातील लिंबाएवढा गोळा करून हाताने किंचित दाबून ग्रीस केलेल्या ट्रेवर लांब लांब लावा व बेक करा. थंड झाल्यावर डब्यात भरावे.


2. चॉकलेट ओट क्रंच [ Chocolate Oat Crunch Cookies Recipe In Marathi ]


चॉकलेट ओट क्रंच
चॉकलेट ओट क्रंच


साहित्य : 100ग्राम लोणी, 50 ग्रॅम ब्राऊन शुगर, 100 ग्रॅम मैदा, बेकिंग पावडर, 50 ग्रॅम ओट्स, दोन टीस्पून कोको. कृती : प्रथम लोणी आणि साखर एकत्र घोटावे. नंतर त्यात वाळलेला मैदा हळूहळू घालून घोटत राहावे. नंतर त्यात ओट्स आणि कोको घालून मिश्रण करावे व ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये घालून हाताने मिश्रण प्रेस करावे व गरम ओव्हनमध्ये तीस मिनिटे भाजावे.

 आइसिंग : 100 ग्राम आईसिंग शुगर, एक चमचा कोको पावडर व पाच चमचे गरम पाणी हे सर्व एकत्र करून घोटावे व क्रंस ट्रेमध्ये गरम असताना त्यावर ओतावे. आइसिंग सारखे पसरावे व सेट झाल्यावर त्याच्या पट्ट्या कापाव्यात. साधारणतः सोळा ते अठरा फिंगर्स तयार होतात.

 

3. कॉर्नफ्लेक्स कुकीज :  [ Cornflakes Cookies Recipe In Marathi ]


कॉर्नफ्लेक्स कुकीज

                                                    कॉर्नफ्लेक्स कुकीज 


 साहित्य : एक अंड्याचे पांढरे, अर्धा कप नारळाचे खोबरे, अर्धा कप साखर, किंचित मीठ, एक कप कॉर्नफ्लेक्स.

कृती : अंडे खूप फेटावे. नंतर त्यात साखर घोळावी व फेटत रहावे. त्यात मीठ व वेनिला इसेन्स घालावे व फेटत राहावे. हे मिश्रण चमच्याने पडेल असे झाले पाहिजे. शेवटी नारळाचे खोबरे व कॉर्नफ्लेक्स घाला व मिश्रण तयार करा. ग्रीस केलेल्या ट्रेवर चमच्याने गोळे घाला व गरम ओव्हनमध्ये भाजून थंड झाले कि काढून घ्या. 4. ब्राऊनीज : [ Brownies Recipe In Marathi ]


ब्राऊनीज
ब्राऊनीज

साहित्य : अर्धा कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा कप साखर, एक कप बारीक केलेले मिक्स नट्स.

कृती : मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र चाळावे. लोणी आणि चॉकलेट बार एका पातेल्यात घालून डबल बॉयलर मधून वितळून घ्यावे. चांगले एकत्र विरघळले की खाली उतरवून घ्यावे. नंतर त्यात अंडी फेटलेली व व्हेनिला इसेन्स व साखर घालावी व पुन्हा घोटत रहावे. नंतर त्यात मैदा घालून लगेच त्यात बारीक केलेले नट्स हलक्या हाताने मिक्स करावे. ग्रीस केलेल्या ट्रेवर दूर दूर लावून 25 ते 30 मिनिटे भाजावे किंवा सर्व मिश्रण लहानशा ट्रे मध्ये घालून बेक करावे व बेक नंतर थंड झाल्यावर हलकेच चौकोनी आकाराचे तुकडे कापावेत.
5. ओट्स कुकीज [ Oats Cookies Recipe In Marathi ]


ओट्स कुकीज
ओट्स कुकीज 

साहित्य : अर्धा कप लोणी, एक कप ब्राऊन शुगर, दोन अंडी चांगली फेटलेली,अर्धा कप दूध, दोन कप मैदा, बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक कप बेदाणे, अर्धा कप बारीक केलेले खजुराचे तुकडे,

कृती : लोणी आणि साखर एकत्र करून घ्यावे. नंतर त्यात फेटलेले अंडे थोडे थोडे घालून घोटत राहावे. मैद्यामध्ये मीठ, सोडा, बेकिंग पावडर घालून चाळावे. मिश्रणात थोडा थोडा मैदा घाला व घोटत राहा. त्यातच ओट्स घालून मिक्स करा. शेवटी थोडा मैदा घाला व घोटत राहा. दूध घालून कुकीजचे मिश्रण नेहमीप्रमाणे वरून ग्रीस केलेल्या ट्रॅवर सारखे लावा व गरम ओव्हनमध्ये वीस मिनिटे किंवा ब्राऊन होईपर्यंत भाजा. थंड झाल्यावर ट्रेवरून काढून डब्यात भरा.


6. पीनट बटर कुकीज [ Peanut Butter Cookies Recipe In Marathi ]


पीनट बटर कुकीज
पीनट बटर कुकीज


साहित्य : दोन कप मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा कप पीनट बटर, दोन मोठे चमचे लोणी, एक कप साखर, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप दूध, वरून घालण्याकरता पीनट चे तुकडे.

कृती : मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र चाळावे. लोणी चांगले फेटावे. त्यात पीनट बटर घाला व पुन्हा सारखे घोटावे. नंतर त्यात साखर व मीठ घालावे व घोटत राहावे. मैदा व दुध आलटून-पालटून घाला व मिश्रण सारखे तयार करा. या मिश्रणाचा घट्ट गोळा होतो. तो ग्रीस पेपरमध्ये गुंडाळून फ्रिज मध्ये थोडा वेळ ठेवा. चांगले घट्ट झाले की काढून घ्या व गोळा लाटावा व कुकीज च्या कटरने वेगवेगळ्या आकाराचे कापा. ट्रॅवर सारखे लावून त्यावर नट्स लावून ओव्हन मध्ये आठ ते दहा मिनिटे भाजावे. थंड झाल्यावर काढून घ्या. या कुकीजला ट्रे ग्रीस करू नये. कारण मिश्रणात भरपूर लोणी असल्यामुळे कुकीज चिकटत नाहीत.7. चॉकलेट व बदामाचे कुकीज : [ Chocolate & Almond Cookies Recipe In Marathi ]


चॉकलेट व बदामाचे कुकीज
चॉकलेट व बदामाचे कुकीज

साहित्य : 100ग्राम उरलेल्या टोस्ट चे तुकडे, शंभर ग्राम कुटलेली तुटलेली बिस्किट, 75 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम कस्टर शुगर, पन्नास ग्राम ड्रिंकिंग चॉकलेट, 50 ग्रॅम काजू चुरा किंवा बदामाचा चूरा, 175 ग्राम लोण, दोन थेंब अलमंड इसेन्स.

कृती : ब्रेडचे तुकडे मिक्सी मधून घाला. व त्याचा चुरा करून एका बाऊल मध्ये काढा. त्यात मैदा, साखर, चॉकलेट व बदाम किंवा काजूचा चुरा घाला व लाकडी चमच्याने मिक्स करा. शेवटी त्यात लोणी घाला व चांगले एकत्र करा. म्हणजे मिश्रण चांगले घुसळून तयार होईल. मिश्रणातून लिंबाएवढे गोळे काढा व गोल सारखे करून ग्रीस केलेल्या ट्रेवर लावा. वरून किंचित पाणी बोटाने दाबा. व गरम ओव्हन 325° वर 15 ते 20 मिनिटे भाजा. थंड झाल्यावर ट्रेवरून काढा व थंड होण्यासाठी ठेवा. एवढा मिश्रणातून साधारणतः 36 नग होतील.
8. चॉकलेट कुकीज [ Chocolate Cookies Recipe In Marathi ]


चॉकलेट कुकीज

                                                          चॉकलेट कुकीज 


साहित्य : 100ग्राम लोणी, पन्नास ग्राम दळलेली ब्राऊन साखर, अर्धे अंडे, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 225 ग्रॅम मैदा, अर्धा चमचा सोडा, 50 ते 75 ग्रॅम लोणी, चॉकलेट चिप्स.

कृती : लोणी आणि साखर एकत्र करून घोटावे. अगदी मऊ व छान झाले पाहिजे. नंतर उरलेले सर्व साहित्य त्यात घाला व सारखे करून गोळा करा. त्यातून लहान-लहान पिसेस करा व ग्रीस केलेल्या ट्रॅव्हल सारखे लावा व किंचित हाताने प्रेस करा. गरम ओव्हन 375° वर दहा ते पंधरा मिनिटे किंचित गुलाबी होईपर्यंत भाजा.
9. ईस्टर कुकीज [ Easter Cookies Recipe In Marathi ]


ईस्टर कुकीज
ईस्टर कुकीज


साहित्य : 175 ग्राम लोणी, 100 ग्रॅम साखर, एक लिंबाची साल, दोन अंड्याचे पिवळे, दोनशे पंचवीस ग्रॅम मैदा, पन्नास ग्राम करंट्स, अंड्याचे पांढरे आणि थोडी कष्ट शुगर ग्लेझ देण्याकरता.

कृती : लोणी आणि साखर एकत्र करा. त्यात लिंबाची साल घाला व घोटत राहा. नंतर त्यात अंड्याचे पिवळे घाला व मिश्रण घोटत राहा. शेवटी थोडा मैदा लावलेली करंट्स व थोडा मैदा असे आलटून पालटून घाला व मिश्रण सारखे करावे. नंतर मिश्रण साधारणतः एक तास फ्रीजमध्ये ठेवा व थोड्या वेळाने काढा व त्याची जाड पोळी लाटून घ्या व त्यातून कटरने गोल कुकीज कापा. ग्रीस केलेल्या ट्रेवर सारखे लावा व ओव्हन मध्ये दहा ते बारा मिनिटे भाजावे. ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर अंड्याचे पांढरे किंचित लावा व वरून कस्टर शुगर भुरभुरवा व मग बेक करा.
10. बोरबॉन कुकीज  [ Bourbon Cookies Recipe In Marathi ]


ईस्टर कुकीज
ईस्टर कुकीज


साहित्य : 115 ग्रॅम मैदा, 55 ग्राम लोणी, 55 ग्रॅम साखर, व्हॅनिला इसेंस, एक टेबलस्पून गोल्डन सिरप व किवा ब्राउन शुगर, दोन मोठे चमचे कोको पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चॉकलेट बटर आइसिंग.

कृती : मैदा आणि बेकिंग पावडर व कोको एकत्र चाळावे. लोणी आणि साखर एकत्र घोटावा. इसेन्स घाला व मिश्रण सारखे करावे. त्यात पीठ घाला मऊसर पीठ भिजवून गोळा करावा. चांगला मळून घ्यावा. ग्रीस पेपर वर साखर पेरावी व त्यावर पीठाचा गोळा हलक्या हाताने लाटावा म्हणजे खालील बाजू साखरेची राहील. त्यापासून एक जाड पोळी लाटा व त्याच्या कुकीज कटरने कापा. ग्रीस केलेल्या ट्रेवर लावावे. 150 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटे भाजावे. थंड झाल्यावर दोन्ही मध्ये आइसिंगने चिटकवा.