Header Ads Widget

आगळ्यावेगळ्या म्हणी

मित्रांनो महाराष्ट्रात म्हणींना खुप महत्व असते. प्रत्येक म्हणीमागे एक अर्थ दडलेला असतो.

आगळ्यावेगळ्या म्हणी
आगळ्यावेगळ्या म्हणी


आपण अश्याच काही म्हणी आज पाहणार आहोत. 

तुमची आवडती म्हण कोणती हे मला कमेंट मध्ये कळवा.


1) अंग मेहनतीचं काम, ते ने मिळे आराम.

2) आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली.

3) आंधळ्यांनी पांगला वाहिला, पांगळ्या ने मार्ग दाखविला.

4) अभ्यास करेल त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी.

5) अरे चे उत्तर कारे, अहो चे उत्तर का हो.

6) अपकीर्ती झाली जनी, तो अर्धा मेला  मनी.

7) अग  अगं म्हशी, मला कुठे नेशी.

8) अडला नारायण, धरी गाढवाचे पाय.

9) अति तेथे माती.

10) अती राग ,भीक माग.

11) असतील शिते, तर जमतील भूते.

12) अन्स गाशी  संग ,प्राणाशी गाठ.

13) अति शहाणा त्याचा, बैल रिकामा.

14) असून अडचण, नसून खोळंबा.

15) अघटित वार्ता, कोल्हे गेले तीर्था.

16) असेल तेव्हा सोहळे, नसेल तेव्हा ओसरीत लोंळे.

17)  अडजीभ खाये, पडजिभ वाट पाहे.

18) आधी पोटोबा ,मग विठोबा.

19) आईचा हात, गोड लागे शिळा भात.

20) आगीतून निघाला, फुफाट्यात पडला.

21) आजा मेला नातू झाला.

22) आधी गुंतू नये आणि गुंतल्यावर  कुं थ  नये.

23) आळशाला आजाराचे निमंत्रण.

24) आधी देव मग जेव.

25) आप मेले ,जग बुडाले.

26) आपण हसतो लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला.

27) आपला तो बाळ्या दुसऱ्या चे ते कार्टे.

28) आपला हात जगन्नाथ.

29) आपलेच ओठ अन् आपलेच दात.

30) आपले ठेवायचे झाकून,दुसऱ्याचे पहायचे वाकून.

31) आपले ते गोजिरवाणे, दुसऱ्याचे ते लाजिरवाणे.

32) आपले मन जिंका तो धन्य म्हणावा तिन्ही लोकी.

33) आपल्या गणे, घोडा खाई दाणे.

34) आयत्या बिळात नागोबा.

35) आमंत्रण दिले सगळ्यां गावा, वादळ सुटले घरी जेवा.

36) आयत्या पिठावर रेघोट्या.

37) आयत खाऊन लांडग्याचा भाऊ.

38) आल्यावर विपत्ती, कवे मैत्री आहे की ती.

39) आवड असली की सवड मिळते.

40) आवडीने केला नवरा ,त्याच्या पायात भवरा.

41) आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना.

42) आधा दूध  आधा पाणी ,जादा डाले तो बेमानी.

43) आता चे व   अण केला देव.

44) अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.

45) इकडे आड तिकडे विहीर.

46) ईश्वराची करणी, नारळात पाणी.

47) उंदराचा जीव जातो आणि मांजराचा खेळ होतो.

48) उचलली जीभ लावली टाळ्याला.

49) उघड्या पाशी नागडे गेले ,सारी रात ही वाणे मेले.

50) उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

51) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.

52) उथळ पाण्याला ,खळखळाट फार.

53) उद्योगाचे घरी ,ऋद्धी-सिद्धी पाणी भरी.

54) ऊस गोड झाला म्हणून मुळासकट खाऊ नये.

55) एक गाव बारा भानगडी.

56) एक घाव दोन तुकडे ,काम करावे रोकडे.

57) एकटा जीव सदाशिव.

58) एक ना धड, भाराभर चिंध्या.

59) एक पट विद्या, दस पट गर्व.

60) एका हाताने दाळी कधी नवा जे  कोण्या काळी.

61) एकाची होळीतर दुसऱ्याची दिवाळी.

62) एकाने करायचे, साऱ्यांनी भरायचे.

63) एकादशी घरी शिवरात्र पाहुनी आली.

64) एवढीशी थट्टा भल्या भल्या ला लावी बट्टा.

65) एक्स देव पणाचे लक्षण वाया जाऊ देऊ नये एकही क्षण.

66) ऐकावे जनाचे करावे मनाचे

67) ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही.

68) कठीण समय येता कोण कामास येतो.

69) कर गया दाढीवाला पकडा गया  मुच्छी वाला.

70) कर नाही त्याला डर कशाला.

71) करावे तसे भरावे.

72) करुन करुन भागले अन देवपूजेला लागला.

73) कलाकौशल्य ज्याचे हाती, त्याची होई जगी  ख्याती.

74) कवळी चे ते ल कवळी ची वात, दिवा जळव  सारी रात.

75) कसायाच्या घरी सण आणि शेळ्या-मेंढ्यांचे मरण.

76) कशात काय आणि फाटक्यात पाय.

77) कशी मागावी भिक तर तंबाखू खायला शिक.

78) कहा राजा भोज ,कहा गंगू तेली.

79) कामापुरता मामा ,ताकापुरती आजी.

80) काखेत कळसा, गावाला वळसा.

81) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही त.

82) काळा आला होता पण वेळ आली नव्हती.

83) का ग बाई रोड, तर माने गावाची ओढ.

84) कुठे गेले तरी पळसाला पाणी तीनच.

85) कुत्ता  धोबिका घर का ना घाट का.

86) कुत्र्याचे जीने फजिती ला काय उणे.

87) कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.

88) केर डोळ्यात  नी  फुकार कानात.

89) कोकणात नारळ फुकट.

90) कोणाच्या संगतीने काशी नी कोणाच्या संगतीने फाशी.

91) कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा.

92) कोणाच्या म्हशी कोणाला उठाऊ शी.

93) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.

94) खऱ्या खोटे लबाडाचे तोंड मोठे.

95) खटपट करी, तोच पोटभरी.

96) खऱ्या चा दास  नी खोट्याचा  वस्ताद.

97) खानदेशी माती, गहू तशी रोटी.

98) खाणे थोडे मचमच फार.

99) खाऊन पिऊन सुखी हरिनाम मुखी.

100) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

101) खायला फार नि भुईला भार.

102) खाली मुंडी पाताळ धुंडी.

103) गरज सरो वैद्य मरो.

104) गरिबांचा वाली परमेश्वर.

105) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय.

106) गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

107) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.

108) गाव करी ते राव न करी.

109) गाढवाच काय ? गुळाची चव.

110) गाढ गाढवाबरोबर नळ्याची जत्रा.

111) गोगल गाय  पोटात पाय.

112) घटकेची फुर्सत नाही दमडीची मिळकत नाही.

113)  घरात घन म्हणे बायको माझी गोरी पान.

114) घरासारखा गुण सासू तशी सून.

115) घर जळाल्यावर बोंब नाटक संपल्यावर सॉंग.

116) घर धन्याचे हाल आणि फुकट याचे  वर गाल.

117) घर ना दार देवळी बिऱ्हाड.

118) घरचे झाले थोडेआणि व्या हानी धाडले  घोडे.

119) घरात दांडगाई, बाहेर कोरडे  खाई.

120) घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा.

121) घरात नाही लोटा अन दिमा ख मोठा.

122)  घरो ब्याला घर खा पण हिशोब आला चोख रहा.

123)घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून.

124) घाल पाणी कर , कालच्या वाणी.

125) घे मनी डोरले आणि तू हे मा हे सर ले.

126) घोडी मेली ओझाने व शिंगरू मेले हेल पा त्याने.

127) चढ णीस घोडा ,उत्तरणीस  रेडा.

129)  चव ना ढव, दडपून जेव.

130) चावल्याशिवाय गिळत नाही ,अनुभवल्याशिवाय कळत नाही.

131 चित्त नाही थांरी, 52 तिथे करी.

132) चोरत चोर आणि वर शिरजोर

133) चोरीची नाहीत चोराच्या हातची लंगोटी.

134) चोराच्या उलट्या बोंबा.

135) चोराच्या सुटका आणि सगळ्यांना फटका.

136) चोराच्या मनात चांदणं.

137) चोराला डसला विंचू तो करीना हु की चु.

138) चोराला सोडून संन्याशाला फाशी..

139) चोरीचा मामला हळूहळू बोंबला.

140) छडी लागे छम छम विद्या येई घम घम.

141) जगन्नाथाचा भात सर्व जग पसरे हात.

142) जावा तिथे दावा , सवती तेथे हेवा.

143) जसे दान तसे पुण्य.

144) जात कळते पण मत कळत नाही.

145) जातीची खावी लात पण पर जातीचा खाऊ नये भात.

146) ज्याचे जळ, त्याला कळे.

147) ज्याची करावी की  व , तोच घेतो जीव.

148) ज्याला नाही अक्कल ,त्याची घरोघरी नक्कल.

149) ज्याला नाही लाज,त्याला पृथ्वीचे राज.

150) जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.

151) जिकडे गेली वांज, तिकडे झालीस सांज.

152) जीव जावो पण जिलेबी खावो.

153) जुने ते सोने.

154) जुन्याला लाथा नवयाच्या चरणी माथा.

155) जो बायकोशी भला तो खाई दहीकाला.

156) जो बोलण्यात बोल का तो कृतीत हलका.

157) झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली म्हणजे  फुकाची.

158) झोपेला घोडा ,भुकेला कोंडा.

159) झोप ना मागे बिछाना, भूक ना मांगे छबिना.

160) ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला , वाण नाही पण गुण लागला.

161) ढो कणाच्या संगे ,हिरा ही  भंगे.

162) तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास  फळ.

163) तहान लागल्यावर, विहीर खोदणे.

164) तळहाताने सूर्य झाकत नाही.

165) ताकापुरती आजी.

166) ताकापुरते रामायण.

167) ताकाला जाऊन गाडगे लपविणे.

168) तुझे माझे पटेना, तुझ्या वाचून करमेना.

169) तुझे राहू दे तिकडे ,माझे घे कडे.

170) तुला ना मला ,घाल कुत्र्याला.

171) तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले.

172) तोंड चोपडा ,मनात वाकडा.

173) तोंड दाबून, बुक्क्यांचा मार.

174) तोंडावर गोड, मनात फोड.

175) तोंडावर हाजीहाजी ,आणि मागे दगलबाजी.

176) थोडे खाणे लज्ज तिचे, फार खाने फजिती  चे.

177) थोरा घरचे शरा न, त्या सर्व ही देती  मा न.

178) दमडीची कोंबडी ,चार आव्यांचा मसाला.

179) दात कोरल्या ने, पोट भरत नाही.

180) दाम करी काम, बीबी करी सलाम.

181) दिवसभर  च र ते ,मंगळवार धरते.

182) दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता.

183) दिव्याखाली अंधार.

184) दिवाळी दसरा, हात पाय पसरा.

185) दिसते तसे नसते, म्हणून जग फसते.

186) दिसतो मोठा ,अकलेचा तोटा.

187) दिसायला भोळा , मुदला वर डोळा.

188) दुष्काळात तेरावा महिना.

189) दुःख सांगावे  मना, सुख सांगावे जना.

190) दुनिया झुकती है ,झुकानेवाला चाहिए!

191) दुर्योधन कृष्णाच्या उशाशी, अर्जुन बसे पायापाशी.

192) दुर्गुण आणि विपत्ती, आळसापासून उत्पत्ती.

193) दुधाची तहान ता का ने भागविणे.

194) दुधात कालबी ते मीठ, हा स्वभाव नाही नीट.

195) दुरून डोंगर साजरा.

196) दुरून बगळा दिसतो साधा ,आ त कपाटाची बा धा.

197) देखला देवा दंडवत.

198) देव नाही  देव्हारी ,धूपाटणे उड्या मारी.

199) देह देवळात चित्त थेटरात.

200) दे दान सुटे गिरान.

201) दे रे हरी,  पलंगावरी.

202) देव तारी, त्याला कोण मारी.

203) देश तसा वेश.

204) दैव देते कर्म नेते.

205) दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ.

206) धटाई खाई मिठाई ,गरीब खाई ग चांड्या.

207) धनगर बसला जेवा या, ताकाबरोबर शेवाया.

208) धरले तर चावते ,सोड ले  तर पळते.

209) धर्माला सोडावा हत्ती, पण हिशे बाला सोडू नये रत्ती.

210) न खात्या देवाला ,नेवेद्य फार.

211) न पढा ना लिखा, नाम विद्यासागर.

212) न रहे बांस ,न बजे बासुरी.

213) नकटीच्या लग्नाला ,सतराशे विघ्न.

214) नकटे व्हावे पण ,धाकटे होऊ नये.

215) न ख भर सुख ,हात भर दु:ख.

216) नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कधी पाहू नये.

217) नमस्कार फुकाचा ,आशीर्वाद लाखाचा.

218) नशीब लागले द्यायला, पदर नाही घ्यायला.

219) न कर्त्याचा ,वार शनिवार.

220) नळी फुंकली सोना रे, इकडून तिकडे गेले वारे.

221) न बोलता दुःख फार ,बोलण्याने हलका भार.

222) नाक दाबले की तोंड उघडते.

223) नाकापेक्षा मोती जड, सासु पेक्षा सून अव जड.

224) नाकाच्या शेंड्याला जी भ पुरविणे.

225) नाकापर्यंत पदर अन वेशी पर्यंत नजर.

226) नाचता येईना, अंगण वाकडे.

227) नाव मोठे लक्षण खोटे.

228) नाव सद्गुणी पण करणी अवगुणी.

229)नाव सोनूबाई ,हाती कथलाचा वाडा नाई.

230)  नीत  मरे त्याले कोण रडे.

231) निंदकाचे घर, असावे शेजारी.

232) पाण्याची धाव समुद्राकडे ,बायकांची धाव सोन्याकडे.

233) पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही.

234) पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.

235) पी हळद आणि हो गोरी.

236) पुढच्यास ठेच ,मागचा शहाणा.

237) प्रकृती तितक्या विकृती.

238) प्रसंग पडे बाका, तो गधेकु कहे काका.

239) फाटके नेसावे पण स्वतंत्र असावे.

240) फुकटचे खा य, त्याला स्वस्त महा ग काय?

241) बगल मे बच्चा, गाव मे दिंडोरा.

242) बसे तो फसे फि रे तो  च रे.

243) बळी तो, कान पिळी.

244) बघायला पुढे आणि लढायला मागे.

245)  बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर.

246) बाप से बेटा सवाई.

247) बायकोचा भाऊ, लोन याहून मऊ.

248) बारा पिंपळावरचा  मुंजा.

249) बाराची माय खाटल्यावर जीव जाय.

250)  बुडत्याचे पाय डोहाकडे.

251) बुडत्याला काडीचा आधार.

252) बोलण्यात जोर , कामात अंग चोर.

253) बोलण्यात पट्ट राहो, कामाला  आग लागो.

254) भटाला दिली ओसरी, तो हात पाय पसरी.

255) भित्यापाठी ब्रह्मराक्षस.

256) भुकेले कोल्हे, काकडीला राजी.

257) मरावे परी कीर्तिरूपे उरावे.

258) मन नाही तीरी बहु तीर्थ करी.

259) मन सांगा जना,अपमान सांगावा  मना.

260) मामाच्या घरी भाचा कारभारी.

261) माय तसं लेकरू, गाय तसं वासरू.

262) मिया बिबी राजी तो काय करेल काजी.

263) मोहन मे राम  बगल मे  छोरी.

264) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

265) मूर्ख भांडती , वकील घरे बांध ती.

266) मुर्खा पुढे वाचली गीता, तो म्हणे राताचा गोंधळ बरा होता.

267) मेंढी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड होती.

268) मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

269) म्हातारी मेली हिवायात रड आला पावसायात.

270) यथा राजा, तथा प्रजा.

271) रात्र थोडी सोंग फार.

272) राजा बोले दाढी  हाले.

273) राम नाम जपणा ,पराया माल अपना.

274) रिकामा वाडी बोपले घडी.

275) लबाडाचे निमंत्रण, जेवल्यावर खरे.

276) लहान तोंडी, मोठा घास.

277) लाथ मारेन ,तिथे पाणी काढीन.

278) लाज ना अब्रू ,कशाला घाबरू.

279) लातो के भूत, बातों से नही मानते.

280) लेकीला तूप साखर, सुनेला मीठ भाकर.

281) लेकी बोले ,सुने लागे.

282) लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण.

283) लंगडी गाय, वासरात  शहाणी.

284) वड्याचे तेल ,वांग्यावर काढणे.

285) वराती मागून घोडे.

286) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.

287) वेड घेऊन पेडगा वा स जाणे.

288) वेश असावा बावळा, परि अंगी असावा नाना कला.

289) वेळ ना  व खत  आणि गाढव चालले  भुकत.

290) वेळीच  जो जागे  तो भीक ना मागे.

291) व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती.

292) शहाण्याला एक बात ,मूर्खाला सारी रात.

293) शितावरून ,भाताची परीक्षा करणे.

294) शीर सलामत ,तो पगडी पचास.

295) सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा.

296) सौ सोनार की एक लोहार की.

297) सर्व आहे घरी पण नी यत नाही बरी.

298) सोळा हात लुगडी आणि अर्धी तंगडी उघडी.

299) स्नान करून पुण्य घडे, तर  पाण्यात बेडूक काय  थोडे.

300) हसतील त्याचे, दात दिसतील.

301) हा पापा चा माल गपापा.

302) हाताचे सोडून पडत्या च्या पाठीमागे लागू नये.