Header Ads Widget

घरून ऑनलाईन काम करून पैसे कसे कमवायचे? | How to make money online in marathi?

आपण ऑनलाइन खरेदी (online shopping)करतो. आणि भरपूर पैसे घालवतो.

पण स्वतः ऑनलाईन काम देऊन पैसे कमावले जाऊ शकतात याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. त्याच महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला माहिती नसते की ऑनलाइन पैसे कसे कमावले जाऊ शकतात.

जर तुम्हाला online पैसे कसे कमवायचे हे शिकायचे असेल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

तुम्हाला कोणतीही गोष्ट येत असेल तरीही तुम्हाला online पैसे कमावता येऊ शकतात आणि जर तुम्हाला काहीच येत नसेल असे तुम्हाला वाटत असेल तर मला comment करून सांगा. मी तुमच्यासाठी नवनविन कोर्सेस बनवेल.

तुमच्याकडे जर काही कौशल्य असतील तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन सर्व्हिसेस देऊन पैसे कमावू शकतात. कशा प्रकारचे कौशल्य असल्यावर तुम्हाला फायदा होईल आणि ऑनलाईन सेवा काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.


घरून ऑनलाईन काम करून पैसे कसे कमवायचे?
घरून ऑनलाईन काम करून पैसे कसे कमवायचे?


ऑनलाइन सर्विसेस काय आहेत?

सर्विसेस ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही दुसऱ्याला पुरवतात आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही एखाद्यासाठी काम करतात आणि ते तुम्हाला पैसे देतात.


पण त्यासाठी तुम्ही कोणतीही वस्तू म्हणजेच फिजिकल प्रॉडक्ट विकत नाही. तुम्ही इंटरनेट द्वारे ऑनलाइन सेवा देऊ शकतात आणि पैसे कमवू शकतात.



सर्विसेस ऑनलाइन का विकायची?

पॅसिव्ह इन्कम साठी ब्लॉगिंग हा एक सर्वोत्तम उपाय आहे. परंतु ब्लॉगिंग मधून पैसे यायला वेळ लागतो. आणि जर तुमच्यामध्ये तेवढी संयमता नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेवा देऊन पैसे कमवू शकतात.


ऑनलाइन काय विकले जाऊ शकते?

जवळजवळ ऑनलाईन आपण काहीही विकू शकतो परंतु काही अशा स्किल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही अधिक कमाई करू शकतात, त्यामुळे प्रॉफिटेबल स्किल्स वर लक्ष देणे गरजेचे आहे.


तुम्ही ऑनलाईन कोण कोणत्या सर्विसेस करू शकतात?

सोशल मीडिया मॅनेजमेंट
कन्टेन्ट रायटिंग
ग्राफिक डिझाइन
एस सी ओ
इत्यादी.


कोणत्या सर्विसेस ऑनलाइन विकल्या जाऊ शकत नाहीत?

काही सर्विसेस ऑनलाईन विकल्या जाऊ शकत नाही. जसे मी कधीही ऑनलाईन केस कापले नाही आणि माझ्यामते तुम्हीही कापलेले नसतील. काही सर्विसेस ऑनलाईन दिल्या जाऊ शकत नाही पण ज्या सर्विसेस ऑनलाईन दिल्या जाऊ शकतात त्यामधून भरपूर नफा मिळू शकतो.


ऑनलाइन सर्विसेस देण्याचे काही फायदे :

ऑनलाइन सर्विसेस देताना तुम्हाला कोणासोबत काम करायचे आहे हे तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला जर एकाच बरोबर काम करायचे असेल तर तुम्ही ते निवडू शकतात किंवा तुम्हाला अनेक व्यक्तींबरोबर काम करायचे असेल तर तुम्ही तसेही निवडू शकतात.

हा एक पटकन पैसे कमावण्याचा चांगला मार्ग असू शकतो. सर्विसेस तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून द्यायला सुरुवात करू शकतात त्यामुळे इथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून पैसे मिळायला सुरुवात होते.

इथे तुम्ही स्वतःचे बॉस आहात. इथे तुम्हाला शिस्तीने स्वतःचे काम स्वतः करावे लागते म्हणून या गोष्टीचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहे.

इथे तुम्हाला ठराविक वेळेत काम करणे गरजेचे नसते. इथे तुम्हाला वेळेचे बंधन नसते आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थी असाल, तर तुम्ही तुमचा उरलेला वेळ या कामासाठी देऊ शकतात. मी अशा खूप व्यक्ती बघितल्या आहे, ज्या कॉलेज करून हे काम करतात.


आजच्या ऑनलाइन जगात, अशा अनेक सर्विसेस आहेत ज्या तुम्ही इंटरनेटवरील लोकांसाठी करू शकता.  यासारख्या गोष्टी असू शकतात:

  •  ब्लॉग पोस्ट लिहिणे
  •  ग्राहक सेवा ईमेलला प्रतिसाद देणे
  •  सोशल मीडिया कन्टेन्ट 
  •  व्हिडिओ एडिट करणे
  •  Pinterest वर पोस्ट बनवणे
  •  वेबसाइट डिझाइन करणे
  •  ईमेल लिहिणे
  •  सेल्स फनेल सेट करणे
  •  एखाद्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम विकणे
  •  एफिलिएट मार्केटिंग करणे
  •  कोचिंग
  •  ग्राफिक डिझाइन
  • आणि बरेच काही!  विशेष म्हणजे हे सगळे तुम्ही शिकू शकतात.


मग नेमकी कोणती सर्विस पुरवायची ह्याची माहिती कशी मिळवायची?

सर्विसेस ऑनलाइन विक्री कशी करायची याचा विचार करताना तुम्हाला पहिली गोष्ट माहित असणे आवश्यक आहे ती म्हणजे ऑफर करण्यासाठी योग्य सर्विसेस शोधणे.

तुम्ही कशात चांगले आहात, तुम्हाला काय करायला आवडते आणि तुम्हाला कशात पैसे मिळू शकतात याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.

असे येऊ शकता की तुम्हाला सुरुवातीला लिखाण आवडू शकते आणि पुढे जाऊन एडिटिंग आवडू शकते यामध्ये वाईट काहीही नाही एकाच गोष्टीच्या मागे लागणे नेहमी चांगले असते पण जर तुम्हाला पाच गोष्टी एकाच वेळेस येत असतील तर तुम्ही जास्त सर्विसेस पुरवू शकतात आणि जास्त नफा कमवू शकतात. म्हणून सुरुवातीला स्वतःवर ताण देऊ नका की मला हेच करायचे आहे किंवा तेच करायचे आहे.


तुमच्या सर्विसेससाठी क्लाइंट कसे शोधायचे ? 

तुम्ही सर्विसेस ऑनलाईन विकताना पैसे कमावण्यासाठी सर्विसेस विकत घेणारा सगळ्यात गरजेचा आहे. त्यामुळे पुढील प्रकारे आपण क्लाइंट शोधू शकतो.

  1.  कन्टेन्ट रायटिंग
  2.  ऑनलाइन किंवा ऑफलाइन नेटवर्किंग
  3.  ईमेल्स
  4.  गेस्ट पोस्ट
  5.  इतर क्लायंटकडून रेफरल्ससाठी विचारा
  6.  फ्रीलान्स जॉब बोर्ड शोधा

53% लोक कोणतीही गोष्ट खरेदी करण्याआधी त्याबद्दल इंटरनेटवरून माहिती मिळवतात. 

तुम्ही युट्युब व्हिडिओ, ब्लॉग पोस्ट, पॉडकास्ट, किंवा कोणतीही सोशल मीडिया साईट वापरून ट्राफिक गोळा करू शकतात.

जेव्हा तुमच्या कंटेंट मुळे तुम्हाला क्लाइंट मिळतात तेव्हा तुमच्या ब्लॉग पोस्ट, युट्युब व्हिडिओ किंवा इतर कंटेंट मुळे त्यांना तुमच्यावर पहिल्यापासून विश्वास असतो. 

असे क्लाइंट तुम्हाला चांगले पेमेंट देऊ शकतात आणि तुमच्या सोबत long term काम करू शकतात.

पण सगळ्यात आधी नेमकी कोणती सर्विस तुम्हाला लोकांना द्यायचे आहे याबद्दल विचार करायला सुरुवात करून द्या. 


जर तुम्हाला सर्विसेस बद्दल जास्त माहिती हवी असेल तर खालील पोस्ट वाचा.