Header Ads Widget

मकर संक्रांती सण | Information about Makar Sankranti in Marathi


मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा सण आहे ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सौर दिनदर्शिकेनुसार, तो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. हा सण हिवाळ्याचा शेवट आणि नवीन कापणीच्या हंगामाची सुरुवात देखील करतो.

 याला ऋतु आणि धार्मिक असे दोन्ही महत्त्व आहे. हा हिंदू धर्मामधील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो.

मकर संक्रांती हा सण भारतामध्ये विविध नावाने ओळखला जातो जसे केरळमध्ये मकर संक्रांती, आसाममध्ये माघ बिहू, जम्मूमध्ये माघी संग्रांद , हरियाणा,हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लोहरी या नावाने ओळखली जाते.


 मध्य भारतामध्ये सुकरात, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशामध्ये उत्तरायण, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल इथे पौष संक्रांती किंवा मकर संक्रांत,किंवा सरळ सांगायचे तर माघे संक्रांती (नेपाळ), सॉन्गक्रन (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान ( कंबोडिया),आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर) असे विविध नावे आहेत.

 मकर संक्रांतीच्या दिवशी, संपूर्ण भारतामध्ये विष्णू आणि देवी लक्ष्मीसह सूर्याची पूजा केली जाते.


तामिळनाडूमध्ये मकर संक्रांत, थाई पोंगल म्हणून साजरा केली जाते, जिथे हा सण चार दिवस साजरा केला जातो, पहिला दिवस भोगी पोंगल, दुसरा दिवस सूर्य पोंगल, तिसरा दिवस मट्टू पोंगल आणि चौथा दिवस कानुम पोंगल म्हणून साजरा करतात.

गुजरात आणि राजस्थानमध्ये, तो उत्तरायण म्हणून साजरा केला जातो आणि इथे लोक पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतात आणि सूर्याच्या उत्तर दिशेच्या प्रवासाची सुरूवात करण्यासाठी विधी करतात.

हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये, ही लोहरी म्हणून साजरी केली जाते, जिथे लोक शेकोटी पेटवतात आणि त्याच्याभोवती लोकनृत्य करतात.


आसाममध्ये, हा माघ बिहू किंवा भोगली बिहू म्हणून साजरा केला जातो, जेथे लोक आग लावतात आणि पारंपारिक अन्नाची मेजवानी देतात.

संक्रांती ही देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार संक्रांतीने शंकरासुर नावाच्या दैत्याचा वध केला. मकर संक्रांतच्या पुढच्या दिवसाला करीदिन किंवा किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकरासुर या राक्षसाचा वध केला होता.