Header Ads Widget

ब्लॉग म्हणजे काय आहे? | Blogging In Marathi Meaning

जसे आपण गुगलवर काही सर्च करतो. तर आपल्याला काही रिझल्ट दिसतात. यामध्ये काही वेबसाईट्स असतात तर काही ब्लॉग्स असतात. 

ब्लॉग म्हणजे अशी वेबसाईट जिथे रेग्युलर कंटेंट अपडेट केले जाते. हे कन्टेन्ट एका विषयाशी संबंधित असते. आपण विषयाला "निष" (Niche) असे म्हणतो. हा शब्द लक्षात राहू द्या. कारण पुढे आपण निष हाच शब्द वापरणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय आहे?
ब्लॉग म्हणजे काय आहे? 


ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमावता येऊ शकतात?

ब्लॉगिंग मधून पुढील गोष्टी वापरून पैसे कमावले जाऊ शकतात.


१)गुगल एड्स (Google ads)

हा 90% ब्लॉगर्ससाठी रेवेन्यूचा मार्ग असतो. जास्तीत जास्त ब्लॉगर्स याने भरपूर पैसे कमावतात. फक्त गुगल एड्स वापरणं हाच एक पर्याय नसतो. आपण दुसऱ्याही एड्स वापरू शकतो. गुगल एडसेन्स अप्रुव्हल कसं मिळवायचं याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत.


२) एफिलिएट मार्केटिंग (Affiliate marketing)

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तू तुम्ही विकतात आणि त्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळतात. समजा जर तुम्ही ॲमेझॉनच्या एखाद्या प्रॉडक्टचे प्रमोशन तुमच्या ब्लॉग वर केलं आणि तुमच्या ब्लॉग वरून कोणी ते प्रॉडक्ट विकत घेतलं तर त्याबद्दल तुम्हाला काही कमिशन मिळेल. आपल्याला जर कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर आपण पहिल्यांदा गुगलवर त्याची माहिती बघतो.


समजा आपल्याला हेडफोन घ्यायचे आहेत आणि आपण गुगल वर सर्च केलं "बेस्ट हेडफोन्स अंडर 500 रुपीज" (Best headphone under 500 rupees) तर आपल्याला काही रिझल्ट दिसतात. जेव्हा आपण त्या साईटला ओपन करतो आणि त्या साइटवर जातो.  आणि हेडफोन्स वर क्लिक करतो आणि जर त्या लिंक वरून आपण परचेस केलं तर त्यांना काही पैसे भेटतात. याला म्हणतात अफिलिएट मार्केटिंग.


आपण ॲमेझॉन अफिलिएट मार्केटिंग करू शकतो. ॲमेझॉन हे फक्त एकच एफिलिएट मार्केटिंगचं नेटवर्क नाही, खूप ठिकाणी अफिलिएट मार्केटिंगचे नेटवर्क आहेत. हे पण आपण पुढे बघणार आहोत सध्या बेसिक माहिती घेऊयात.


डिजिटल प्रॉडक्ट्स (Digital products)

आता मी इथे तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल कोर्स फ्री मध्ये देत आहे. पण असच जर तुम्हाला योगा येत असेल, डान्स येत असेल, किंवा काहीही येत असेल त्याबद्दल जर तुम्ही पुस्तक लिहिले किंवा कोर्स बनवला तर त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकतात. डिजिटल प्रॉडक्ट सध्या खूप जास्त वापरले जातात आणि त्यांचं कमिशन सुद्धा चांगलं मिळतं आपण याबद्दल सुद्धा पुढे बघूया.


स्पॉन्सर पोस्ट (Sponsor post)

समजा  काहीतरी नवीन बाजारात आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण पोस्ट लिहिण्यासाठी सुद्धा खूप खूप पैसे मिळतात. जसे आपण बघतो एखादं नवीन प्रॉडक्ट् आलं की युट्युबर्स त्याची विडिओ बनवतात त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. तुम्हालाही अशीच पोस्ट लिहायला पैसे मिळतील. (ह्यासाठी ब्लॉगिंगची ट्रॅफिक जास्त लागते)


ब्लॉगिंग मध्ये आपण किती पैसे कमवू शकतो?

पुढचा प्रश्न असा येतो की ब्लॉगिंग मध्ये आपण नक्की पैसे कमवू शकतो की नाही? किंवा जर कमवू शकतो तर किती कमवू शकतो? त्याच उत्तर असा आहे की ब्लॉगिंग मध्ये आपण अनलिमिटेड पैसे कमवू शकतो. इथे कोणतही लिमिट नाही.

इथे फक्त तुमचं काम, तुमची नीष महत्त्वाची आहे. काही ब्लॉगर्स महिन्याला एक करोड सुद्धा कमवतात. आणि काही ब्लॉगर्स एक डॉलरही कमवत नाही.

जो काम करतो तो कमवतो, जो काम करत नाही तो काहीच कमवत नाही.

 तुम्हाला कोणता ब्लॉगर बनवायचा आहे हे तुम्ही आताच ठरवा.

 

या कोर्सची स्ट्रॅटेजी काय असणार आहे?

या कोर्समध्ये आपण एकाच ब्लॉगवर फोकस करूयात.

 त्या ब्लॉग मध्ये सगळं सेटअप करून लिहायला सुरुवात करूया.

 काही पैसे कमावुयात आणि पैसे मिळाले की दुसरा ब्लॉग सुरू करूया.

 दुसरा ब्लॉग सुरू केल्याच्यानंतर आपण रायटर hire करू शकतो किंवा आपण सुद्धा रायटर म्हणून दुसऱ्यांना मदत करू शकतो. याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन पुढे मिळेल.


या ब्लॉग मध्ये आपण बेसिक माहिती बघितली जसे की ब्लॉग म्हणजे नेमकं काय असतं? ब्लॉगमधून आपण पैसे कसे कमवू शकतो? ब्लॉगमधून किती पैसे कमवू शकतो? आणि या कोर्सची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? 


पुढील ब्लॉग : click here