Header Ads Widget

Step by step guide about blogging in Marathi

 ब्लॉगिंग हा विषय काही जणांसाठी खूपच नवीन आहे तर काहीजणांसाठी हा एकमेव पैशांचा माध्यम आहे.


जर तुम्ही youtube वर सर्च केले "How to make money online?" , युट्युब वर तुम्हाला सगळ्यात आधी ब्लॉगिंग बद्दल माहीती मिळेल.


आणि फक्त माहितीच नाही तर काही युट्युबर यांनी प्रूफ सुद्धा केलेला आहे की त्यांनी ब्लॉगिंग मधून लाखो, करोडो रुपये कमावले आहेत.


ब्लॉगिंग हा कोणा कोणासाठी पैसे कमावण्याचं एक शस्त्र असतं, तर कुणाकुणासाठी एक आवड असते.


तुम्ही नेमकी ब्लॉगिंग कोणत्या गोष्टीसाठी करत आहात हे माहिती करून घ्या. ब्लॉगिंग करताना या दोन्हीही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार ब्लॉगिंग सुरू करणे गरजेचे आहे.


कोणतीही गोष्ट शिकण्याच्या तीन स्टेजेस असतात.

पहिली बेसिक 

दुसरी इंटरमिजिएट 

तिसरी एडवांस 

आणि हा कोर्स सुद्धा अशाच प्रकारे असणार आहे.


या कोर्समध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग कशी केली जाते आणि त्यामधून तुम्हाला कसा फायदा होईल याबद्दल माहिती देणार आहे. जर तुम्हाला माहिती आवडली तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा.



त्याआधी थोडी माहिती माझ्याबद्दल :

माझे नाव दिशा आहे. मी एक फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि कंटेंट रायटर आहे. मी ब्लॉगिंग मधून लाखो रुपये कमवलेले नाही. आणि तुम्ही पहिल्याच महिन्यात लाखो रुपये कमवाल असे आमिष मी दाखवू शकत नाही. कारण ही गोष्ट खरी नाही.


जी लोक कोर्स बनवतात आणि त्या कोर्सेस मधून पैसे कमावतात, ती लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही पंधरा दिवसांमध्ये लाखो कमवाल किंवा एका महिन्यामध्ये करोडो कमवाल. आणि ही सगळी लोक तुम्हाला वेड्यात काढत आहेत. आणि तुमचे पैसे घेत आहे.


यामध्ये मी तुम्हाला ती सगळी माहिती सांगत आहे जी मी हजारो रुपये खर्च करून कोर्सेस विकत घेऊन शिकले आहे जी माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉगला अप्लाय करून चांगली इन्कम मिळवू शकतात.


ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला किमान सहा महिने वेड्यासारखी मेहनत करावी लागेल. त्याच्या नंतर तुम्ही त्याचा रिझल्ट बघून तुम्हाला continue करायचे आहे की नाही हे ठरवा. सुरुवातीला पैशांच्या मागे लागू नका फक्त आणि फक्त कामाकडे लक्ष द्या.


ब्लॉगिंग पार्ट टाइम करावी की फुल टाइम?

ब्लॉगिंग पार्ट टाइम करावी की फुल टाइम?

ब्लॉगिंग पार्ट टाइम करावी की फुल टाइम?



सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की ब्लॉगिंग ही पार्ट टाइम करावी की फुल टाइम याचा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर आहे. पण जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेल की ब्लॉगिंग हे पार्ट टाईम असू द्या. कारण पहिल्या सहा महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसेलच असं नाही.


तुमच्याकडे दुसरा जॉब असणं गरजेचं आहे. दुसरा जॉब तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकतात. तुम्ही माझ्यासारखी फ्रिलांसिंग देखील करू शकतात. जर याबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर मला कमेंट्स मध्ये कळवा. दिवसातून तीन ते चार तास ब्लॉगिंग द्या. उरलेला वेळ तुमचा अभ्यास, कॉलेज किंवा काम करा. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण ब्लॉगिंग बद्दल बेसिक माहिती बघणार आहोत. : Click here