Header Ads Widget

ब्लॉगचा विषय कसा निवडायचा? | How to select a niche for a blog in marathi?

बहुतांशी लोक ब्लॉगचा विषय निवडताना असा विषय निवडतात, ज्यामध्ये खूप पैसे आहेत. आणि मग ब्लॉग सुरु करतात. ब्लॉग लिहायला सुरू करतात. आणि काही दिवसांमध्ये त्यांना कंटाळा येतो. त्यांना तो विषय आवडत नाही. त्यांना वीट यायला लागतो आणि मग ते ब्लॉगिंग पासून दूर दूर निघून जातात. त्यामुळे ब्लॉगिंग चा विषय निवडणे आणि योग्य तो विषय निवडणे हे महत्त्वाचं आहे.


आपण या ब्लॉगमध्ये हे बघणार आहोत, की आपण आपल्यासाठी योग्य असा ब्लॉगिंगचा विषय कसा निवडू शकतो. विषय निवडण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

१)ज्या टॉपिक्स मध्ये तुमचं इंटरेस्ट राहील.

२)जी टॉपिक्स लोक सर्च करतात.


हे कसं कळेल की तुम्हाला नक्की काय आवडते?

असे असेल की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आवडत असतील आणि असेही होऊ शकते की तुम्हाला काहीच आवडत नाही. 

सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींबद्दल माहिती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा.

आता अशा गोष्टी लिहून काढा ज्या गोष्टी तुम्हाला वाचायला आवडतात किंवा ज्या गोष्टींवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात.

जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग लिहू शकतात. जर तुम्हाला गाड्या आवडत असतील तर तुम्ही गाड्यांवर ब्लॉग लिहू शकतात.

जो टॉपिक तुम्ही निवडलाय तो लोक सर्च करत आहे का नाही हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आपण गुगल ट्रेंड्स मध्ये जाऊयात. पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.google.com/trends/. आणि तुमचा विषय लिहा.


रेशो 50% पेक्षा वर असेल तर तुम्ही तो ब्लॉग टॉपिक निवडा. आणि लिहायला सुरुवात करा.


जर कुणाला ब्लॉगिंग साठी विषय हवे असतील, तर खाली काही विषय मी नमूद करून देत आहे.

  • हेल्थ 
  • बिझनेस आयडियाज 
  • लॉयर्स 
  • इन्शुरन्स 
  • एक्सीडेंट 
  • मोबाईल अँड गॅजेट्स 
  • जॉब वेकेन्सी 
  • करिअर ॲडव्हाइस इत्यादी.

हे विषय खूप लोक सर्च करत असतात. तुम्ही याबद्दल लिहू शकतात.


 
कोणत्या भाषेत ब्लॉग लिहावा?

तुम्ही अशा भाषेत लिहा, ज्या भाषेमध्ये तुम्ही कंफर्टेबल असाल. तुम्ही मराठी मध्ये लिहू शकता, तुम्ही हिंदीमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही इंग्लिश मध्ये लिहू शकतात. 


इंग्लिश वर्डवाईड वापरण्यात येणारी भाषा आहे. जर तुम्ही इंग्लिश मध्ये ब्लॉग लिहू शकाल, तर ती अतिउत्तम गोष्ट आहे.


पण जर तुम्ही इंग्लिश मध्ये ब्लॉग लिहिला तर तो रँक व्हायला भरपूर वेळ लागतो, कारण वर्ल्ड वाईड भाषा असल्यामुळे सगळेच लोक इंग्लिश मध्ये लिहितात.


हिंदी मध्ये किंवा मराठी मध्ये ब्लॉग लिहला तर त्यासाठी कॉम्पिटिशन खूपच कमी आहे आणि त्यामुळे रँकिंगच्या चान्सेस जास्त आहे. तुम्ही लवकरात लवकर रँक होऊ शकतात. तुमची सर्चिंग वाढू शकते आणि तुम्हाला गुगल एडसेन्स लवकर मिळू शकते.


 सध्या एक भाषा निवडा आणि ब्लॉग लिहायला सुरुवात करा. जर तुम्ही शेवटपर्यंत वाचत असाल तर आत्ता तुम्हाला एक वही आणि एक पेन घेऊन बसण्याची गरज आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला नेमके कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीवर लिहायला तयार आहात याबद्दल नोट्स लिहिण्याची गरज आहे.

 

हे केल्याशिवाय पुढच्या ब्लॉगकडे जाऊ नका. कारण फक्त वाचून कुणीही पैसे कमवू शकणार नाही. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ब्लॉग सेटअप कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत. : Click here